ICC महिलांचे विश्वचषक 2017 चा विजेता: इंग्लंड
गुजरात विधानसभेतले विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांचा राजीनामा
- लंडन (इंग्लंड) येथे खेळल्या गेलेल्या ICC महिलांचे विश्वचषक 2017 स्पर्धेचे विजेतेपद इंग्लंडने जिंकले आहे. स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान खेळण्यात आला. हे इंग्लंडचे चौथे विश्वविजेतेपद आहे.
- सहा बळी घेणार्या अन्या श्रुबसोल (इंग्लंड) ला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ तर टॅमी बेउमोंट (इंग्लंड) ला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ घोषित करण्यात आले.
- महिलांचे विश्वचषक ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडून आयोजित केले जात आहे. पहिला विश्वचषक 1973 साली इंग्लंडमध्ये खेळला गेला.
गुजरात विधानसभेतले विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांचा राजीनामा
- ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून असलेल्या त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
- वाघेला 1998 सालापासून कॉंग्रेस पक्षात आहेत. ते सध्या कापडवंज मतदारसंघातले आमदार आहेत.
- प्रख्यात अंतराळ वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे माजी चेअरमन उडुपी रामचंद्रा राव यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.
- प्रा. राव सन 1984-1994 या काळात दहा वर्षे ISRO चे चेअरमनपद सांभाळले होते. त्यांना 1976 साली पद्मभूषण आणि 2017 साली पद्मविभूषण सन्मान देऊन गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment