Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, July 15, 2017

    चालू घडामोडी (15 जुलै 2017)

    Views
    चालू घडामोडी (15 जुलै 2017)

    राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन होणार :

    • मुक्त विद्यापीठांच्या धर्तीवर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या आबालवृद्धांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला.
       
    • तसेच या मंडळांतर्गत होणाऱ्या परीक्षांना नियमितपणे घेण्यात येणाऱ्या पाचवी, आठवी, दहावी आणि बारावी इयत्तेच्या परीक्षांची समकक्षता असेल. या मंडळाच्या माध्यमातून औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी शिक्षण पद्धती लागू केली जाणार आहे.
       
    • मुलामुलींसह शिक्षण घेऊ इच्छिणारे प्रौढ व्यक्ती, गृहिणी, कामगार या सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाईल. त्यात सोयीनुसार अध्ययनाची सवलत असेल.
       
    • अभ्यासक्रमात लवचितकता राहील. व्यावसायिक शिक्षण दिले जाईल. दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था असेल. इयत्ता पाचवीच्या समकक्ष शिक्षणासाठी विद्यार्थ्याचे वय किमान दहा वर्षे असावे, पूर्वी औपचारिक शाळेत गेला असल्यास तेथील शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे, अशा शाळेत गेलाच नसेल तर स्वयंघोषित प्रमाणपत्र द्यावे अशा अटी असतील.

    बालाजी मुळे यांना विशेष पुरस्कार :

    • काशीपीठाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांनी केली.
       
    • लोकमतच्या मनुष्यबळ विकास विभागाचे सहायक उपाध्यक्ष बालाजी मुळे (औरंगाबाद) यांच्यासह सहा जणांची निवड झाली आहे.
       
    • समाजसेवेसाठी गिरीश प्रभुणे (पुणे), ज्येष्ठ साहित्यिकडॉ. शोभा कराळे यांच्यासह उजमा अख्तर मुछाले,रेवणसिध्द वाडकरस्वाती कराळे यांची निवड झाली आहे.

    राज्यात विभागीय नेत्रशास्त्र संस्था स्थापन होणार :

    • नेत्ररुग्णांना सर्व प्रकारचे उपचार एकत्रित मिळावेत, यासाठी विभागीय नेत्रशास्त्र संस्था स्थापन करण्यात येणार आहे, तसेच वैद्यकीय शिक्षण संचालनालयात एक संचालक व सात उपसंचालकांची पदे निर्माण करण्यात येत आहेत, अशी माहितीवैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
       
    • सार्वजनिक आरोग्य विभागात संचालकांची दोन पदे निर्माण केली गेली, पण कामाचे वाटप करण्यास गेल्या आठ महिन्यांपासून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंतआणि प्रधान सचिवांना वेळ मिळालेला नाही.
       
    • मात्र, त्याच वेळी वैद्यकीय शिक्षण संचालनालयात नेत्रसंचालकाचे एक व उपसंचालकांची सात पदे निर्माण करण्यात येत आहेत.
       
    • राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमधून डोळ्यांवर केले जाणारे उपचार, नेत्रविभागातून पदव्युत्तर व पदवीपूर्व नेत्रशास्त्रातील अभ्यासक्रमासंबंधीचे आयोजन, जागा वाढविणे, तसेच केंद्र व राज्य शासनातर्फे अंधत्व निवारणाच्या अनुषंगाने राबविण्यात येणारे प्रकल्प, जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकल्प व योजना यांची योग्य रितीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी विभागीय नेत्रशास्त्र संस्था कार्य करेल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.

    भारतीय रेल्वेने लाँच केली सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन :

    • भारतीय रेल्वेने प्रथमच सौरऊर्जेवर चालणा-या डिझेल ट्रेनचा वापर सुरु केला आहे. 14 जुलै रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकात या ट्रेनचे उदघाटन झाले.
       
    • दिल्लीच्या सराई रोहिला ते हरयाणाच्या फारुख नगर या मार्गावर ही ट्रेन धावेल. ट्रेनच्या एकूण सहा डब्ब्यांवर सौर ऊर्जेचे 16 पॅनल बसवण्यात आले आहेत.
       
    • मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत या सोलार पॅनलची निर्मिती करण्यात आली असून, त्यासाठी 54 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
       
    • जगात प्रथमच रेल्वेमध्ये सोलार पॅनलचा विद्युत ग्रीड म्हणून वापर करण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये पावर बॅकअपची सुविधा असून, ही ट्रेन 72 तास बॅटरीवर चालू शकते.
       
    • मागच्यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढच्या पाचवर्षात रेल्वे हजार मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करेल अशी घोषणा केली होती.
       
    • सोलार पॅनलवर चालणा-या डिझेल इलेक्ट्रीकल युनिटच्या ट्रेन या योजनेचा एक भाग आहे.

    दिनविशेष :

    • सन 1927 मध्ये 15 जुलै रोजी 'कुटुंबनियोजन' या विषयावर लेख लिहून त्याचा जोरदार प्रसार करणारेरघुनाथ धोंडो कर्वे यांचा 'समाजस्वास्थ'चा पहिला अंक प्रकाशित झाला.
       
    • 15 जुलै 1967 हा दिवस रंगभूमीवर 'गंधर्वयुग' निर्माण करणारे थोर कलावंत नारायण श्रीपाद राजहंस उर्फ'बालगंधर्व' यांचा स्मृतीदिन आहे.

    No comments:

    Post a Comment