Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, January 1, 2017

    इंटरनेट - विविध प्रकारचे जॉब

    Views
      इंटरनेट - विविध प्रकारचे जॉब  

          सध्याचा जमाना इंटरनेटचा आहे. याच इंटरनेटच्या मदतीतून तुम्ही घर बसल्या विविध प्रकारचे जॉब करून पैसे मिळवू शकता. या ऑनलाईन जॉब्सचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारच्या भांडवलाशिवाय हे जॉब आपणास करता येतात...

    यू ट्युब - :
    हि जगातली सर्वात मोठी ऑनलाईन व्हिडीओ शेअरिंगची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जगातले विविध प्रकारचे व्हिडीओ शेअर केले जातात. आपण जेव्हा यू ट्युबवर व्हिडीओ टाकतो तेव्हा जगभरातून विविध लोक ते व्हिडीओ पाहत असतात. ठराविक व्ह्यू झाल्यानंतर यू ट्युबवर व्हिडीओ शेअर करणारा अकाऊंट होल्डर यू ट्युबच्या पार्टनर प्रोग्रॅमला जॉईन होऊन उत्पन्न प्राप्त करायला सुरुवात करू शकतो. यू ट्युब या वाढत जाणार्‍या व्ह्यू मुळे त्या व्हिडीओपूर्वी जाहिराती टाकून उत्पन्न मिळविते आणि त्याचा फायदा व्हिडीओ टाकणार्‍याला मिळतो आणि त्यापासून तो प्रत्येक वाढत जाणार्‍या व्ह्यू बरोबर उत्पन्न मिळवू लागतो.

      फोटोग्राफ्स विक्री - :
    आपण काढलेले चांगल्या दर्जाचे फोटो विकूनही आपणाला उत्पन्न मिळवता येते. हे फोटो फोटोबकेट (Photobucket), शटरस्टॉक (Shutterstock), आयस्टॉक (istock),  अशाप्रकारच्या वेबसाईटला विकता येतात. या आणि अशा प्रकारच्या कितीतरी वेबसाईटस् विविध प्रकारच्या फोटोंच्या शोधात असतात. निसर्ग, व्यक्तिचित्रण, प्राणी, विविध स्थाने, साहसी प्रसंग यासारख्या कित्येक प्रकारातील फोटो या वेबसाईटस् विकत घेतात. या फोटोचा वापर या वेबसाईटस् स्क्रीनसेव्हर बनविण्यासाठी, जाहिरातीसाठी करत असतात. त्यामुळे ज्यांना फोटोग्राफीची चांगली आवड आहे त्यांनी उत्पन्नाचा हा मार्ग आजमवायला हरकत नाही.

    डोमेन (Domain) खरेदी-विक्री -:
    डोमेन म्हणजे इंटरनेटवर अशी जागा जी वेबसाईट बनविण्यासाठी बुक करता येते. अशी डोमेन इंटरनेटवरील Godaddy सारख्या  कित्येक डोमेन रजिस्टाराकडून विकत घेता येणे किंवा विकणे शक्य असते. ऑनलाईन जॉबमधील चांगल्या पद्धतीचे उत्पन्न मिळवून देणारा हा एक महत्त्वपूर्ण असा मार्ग आहे. डोमेन विक्रीकर्त्यांकडून डोमेन विकत घेतल्यानंतर ते स्पेसिफीक डोमेन गरजू कंपन्यांना विकत घेता येते. सध्याच्या जाहिरातीच्या युगात नावाला खूप महत्त्व आहे. अशावेळी ठराविक डोेमेनअ‍‍ॅड्रेस उपलब्ध करून घेणे हे खूप महत्त्वपूर्ण ठरते. हे डोमेन अ‍‍ॅड्रेस उपलब्ध नसेल तर ते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून ते विकत घ्यावे लागते. अशावेळी खरेदी केलेल्या किंमतीच्या दहापट किंमतीने ते विकता येते. काहीवेळा तर या डोमेनचा भाव शेकडोपट नव्हे तर हजारोपटही मिळू शकतो.

    ऑनलाईन सर्व्हे -:
    आज इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे विविध कंपन्यांचे सर्व्हे हे ऑनलाईन पद्धतीने केले जातात. या सर्व्हेमध्ये जगभरातील विविध कंपन्या प्रॉडक्टविषयी मत मागतात. यामध्ये प्रॉडक्ट किंवा सेवा दोहोंचाही समावेश होतो. या मताच्या आधारे कंपन्यांना आपली मार्केटिंग स्ट्रॅटॅजी ठरविणे शक्य होते. या मताविषयी जाणून घेण्यासाठी कंपनी एक प्रकारची प्रश्नसूची बनविते आणि त्या प्रश्न सूचीची उत्तरे आपणास द्यावी लागतात. यासाठी त्या कंपनीच्या ऑनलाईन सर्व्हेसाठी रजिस्ट्रेशन करून आपणाला ते करणे शक्य होते. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर कंपनी/विविध कंपन्या प्रत्येक वेळी ही प्रश्नसूची पाठवून देते आणि आपणाला ती प्रश्नसूची भरून द्यावयाची असते.

    इंटरनेटच्या माध्यमातून आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो. पण हे सर्व करत असताना एका गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचे ठरते ते म्हणजे ज्या कंपनीसाठी आपण काम करणार आहोत त्या कंपनीची विश्वासार्हता तपासणे, इंटरनेटवर अशा शेकडो कंपन्या आहेत की, ज्या नकली आहेत. या कंपन्या काम करून घेतात पण त्याचा परतावा देत नाहीत. यासाठी सर्वप्रथम या कंपन्यांची विश्वासार्हता चेक करा, म्हणजे झालं... 
    संदर्भ -तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक
    सोलापूर

    No comments:

    Post a Comment