गणित प्रगल्भीकरण प्रशिक्षण
आज सोलापूर जिल्हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात अग्रेसर असतानाही गणित विषय प्रशिक्षणात कुठेतरी अनास्था असल्याचे जाणवत आहे. विद्या प्राधिकरण गेल्या अनेक दिवसांपासून गणित प्रगल्भीकरण संदर्भात लिंक देऊन सुद्धा त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये.
कृपया सर्व शाळांना, मुख्याध्यापकांना विनंती की, आपल्या शाळेतील किमान एक तरी शिक्षकांस ही गणित प्रगल्भीकरण प्रशिक्षणाची लिंक भरण्यासाठी सांगावे.
राज्यातील १ ली ते ५ वी ला अध्यापन करणाऱ्या शासकीय ( जि.प./स्थानिक स्वराज्य संस्था) व खाजगी अनुदानित शाळामधील २५ % शिक्षकांना गणित विषयात प्रगल्भ करणेबाबत प्रशिक्षणासाठीची गुगल फॉर्म लिंक आहे . या लिंकच्या मदतीने आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त संबंधित शिक्षकांकडून मागणी पत्र भरून द्यावे. ही लिंक विदया प्राधिकरणाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या लिंकचे नाव गणित प्रगल्भीकरण प्रशिक्षण मागणी प्रपत्र असून विदया प्राधिकरणच्या वेबसाईटवर यापूर्वी गणित व भाषा प्रशिक्षणापेक्षाही लिंक भिन्न असून या लिंकवरील मागणी पत्रात माहीती भरलेल्या शिक्षकांनाच २५ % प्रशिक्षणासाठी गृहीत धरण्यात येईल. ही बाब संबंधित शिक्षकांच्या निदर्शनात आणून द्यावी. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत या लिंकचा प्रसारमाध्यमांद्वारे प्रसार करावा.
प्रशिक्षण फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्रशिक्षण फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
No comments:
Post a Comment