Current affairs | Evening News Marathi
Current affairs 6 May 2020 Marathi |
6 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
तीन भारतीय छायापत्रकारांना पुलित्झर पुरस्कार जाहीर
Pulitzer Prize announced for three Indian photojournalists
अनुच्छेद 370 हटवल्यानंतरचे जम्मू व काश्मीर टिपणाऱ्या दार यासीन, मुख्तार खान आणि चान्नी आनंद या तीन भारतीय छायापत्रकारांना जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. तिघांनी जम्मू व काश्मीरचे कलम 370 हटवल्यानंतरचे लक्षवेधी चित्र मांडले; त्याबद्दल त्यांना जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.
पुरस्काराविषयी
पुलित्झर पुरस्कार हा पुरस्कार वृत्तपत्र, मासिकपत्र आणि ऑनलाइन पत्रकारिता, साहित्य आणि संगीत रचना या क्षेत्रातल्या उत्तम कामगिरीसाठी दिला जातो. हा अमेरिकेचा पुरस्कार आहे. पुलित्झर पुरस्कार 21 गटांतर्गत सर्वोत्तम सेवांना पुरस्कार दिला जातो.
1917 साली अमेरिकेचे प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांनी या पुरस्काराची स्थापना केली. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे. दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाचे ‘ऑपरेशन समुद्र सेतू’
Indian Navy's 'Operation Sea Bridge' to bring back Indians
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतात परत येऊ पाहणाऱ्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ या नावाची एक मोहीम चालवली आहे.
8 मे 2020 रोजी सुरू होणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात भारतीय नौदल मालदीव देशात असलेल्या भारतीयांना परत आणणार. मालदीवमधून एकूण 1000 व्यक्ती हलविण्याची ही योजना आहे.
ठळक बाबी
- या मोहिमेसाठी नौदलाचे INS जलश्व आणि INS मगर ही दोन जहाजे मालदीवकडे पाठविण्यात आली आहेत.
- लोकांना परत आणून केरळच्या कोची या शहरात उतरविण्यात येणार. तिथे त्यांना विलगीकरणासाठी राज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार.
- ही संपूर्ण मोहीम संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र कल्याण मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि इतर केंद्र व राज्य सरकारच्या इतर संस्थांच्या समन्वयाने चालवली जात आहे.
No comments:
Post a Comment