Current affairs | Evening News Marathi
Current affairs 4 May 2020 Marathi |
4 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्थेनी ‘ईकोवसेन्स’ उपकरण विकसित केले
The National Institute of Animal Biotechnology developed the ‘EcoSense’ device
हैदराबादच्या राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्था (NIAB) येथील संशोधकांनी एक उपकरण विकसित केले, ज्याला त्यांनी ‘ईकोवसेन्स’ (eCovSens) हे नाव दिले आहे. हे एक बायोसेन्सर (जैवसंवेदक) आहे, ज्यामुळे पशूच्या लाळेची तपासणी कोविड-19 रोगासाठी केली जाऊ शकते.
हे उपकरण केवळ 20 मायक्रोलिटर एवढ्या प्रमाणात नमुन्याचा वापर 30 सेकंदात आपला अहवाल देते. हे उपकरण ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने संगणक किंवा दूरध्वनी संचाशी देखील जोडले जाऊ शकते आणि ज्यामुळे प्राप्त माहितीचा अभ्यास केला जाऊ शकतो.
नवी दिल्लीमध्ये संसदेच्या नव्या इमारतीला पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी
Environment Ministry approves new Parliament building in New Delhi
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने संसद भावनाच्या शेजारी नवीन संसद भवनाची उभारणी करण्यास मंजूरी दिली आहे. हा प्रकल्प राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेट पर्यंत 3 किलोमीटर लांबीच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनेचा एक भाग आहे.
इमारत 10.5 एकर भूखंडावर 65,000 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात येणार. इमारतीची उंची 42 मीटर असणार. बांधकाम प्रकल्पाला येणारा खर्च 922 कोटी रुपये एवढा आहे. हा प्रकल्प 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे
No comments:
Post a Comment