Current affairs | Evening News Marathi
Current affairs 3 May 2020 Marathi |
3 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन: 3 मे
World Press Freedom Day: May 3
जगभरात दरवर्षी 3 मे रोजी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन पाळला जातो. 2020 साली हा दिवस “जर्नलिजम विदाउट फियर ऑर फेवर” या विषयाखाली पाळला गेला.
पत्रकारिता, त्याचे महत्त्व आणि त्याबाबतची जनमानसात जागृती निर्माण करणे हा या दिनाचा हेतू आहे. तसेच, पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे याबाबत जगभरातल्या देशांच्या प्रत्येक सरकारला आठवण करुन देणे हा प्रमुख उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे.
राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचा ‘नदी व्यवस्थापनाचे भविष्य’ विषयक ‘आयडियाथॉन’ कार्यक्रम
‘Ideathon’ program on ‘Future of River Management’ of National Clean Ganga Campaign
राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (NIUA) या संस्थांनी कोविड-19 महामारीमुळे नदी व्यवस्थापन धोरणे भविष्यात कशा प्रकारे आकाराला येऊ शकतात याचा मागोवा घेण्यासाठी “नदी व्यवस्थापनाचे भविष्य” विषयक ‘आयडियाथॉन’ आयोजित केले. आयडियाथॉनमुळे नदी व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली.
या कार्यक्रमाच्या अंतर्गत 2 मे 2020 रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये सुमारे 500 जण सहभागी झाले होते. विविध देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमधील तज्ञ यात सहभागी झाले होते. नदी व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष वेधण्यासाठी तसेच नदीशी शहरांची आंतरजोडणी अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता.
No comments:
Post a Comment