Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, May 15, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 15 May 2020 Marathi | 15 मे मराठी करेंट अफेयर्स

    Views

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 15 May 2020  Marathi |
       15 मे  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स


    आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन: 15 मे

    जगात कुटूंब, लोक, समाज आणि संस्कृती यांचे महत्त्व पटवून देण्याकरिता दरवर्षी 15 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. हा दिवस कुटुंबांचे महत्त्व आणि कुटुंबांच्या विकासात आंतरराष्ट्रीय समुदायाच्या भूमिकेबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आहे.
    यावर्षी म्हणजेच वर्ष 2020 मधला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन “फॅमिलीज इन डेव्हलपमेंट: कोपेनहेगन अँड बिजींग + 25” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे.

    वर्ष 2015-2020 या कालावधीत जंगलतोडीचे प्रमाण कमी झाले

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्यान्न व कृषी संघटनेनी (FAO) 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अॅसेसमेंट रिपोर्ट, 2020' अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी वर्ष 1990 ते वर्ष 2020 या कालावधीत 236 देश आणि प्रांतांमध्ये असलेल्या वनांच्या संबंधित स्थितीचा अभ्यास केला गेला आहे.
    गेल्या 30 वर्षांत सुमारे 178 दशलक्ष हेक्टर जंगले नष्ट झाली आहेत. शाश्वत व्यवस्थापनाच्या वाढीमुळे जंगले नष्ट होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. वर्ष 2015-2020 या कालावधीमध्ये जंगले नष्ट होण्याचे प्रमाण अंदाजे 10 दशलक्ष हेक्टर (mha) पर्यंत घसरले आहे, जे वर्ष 2010-2015 या कालावधीमध्ये 12 दशलक्ष हेक्टर एवढे होते.

    No comments:

    Post a Comment