Current affairs | Evening News Marathi
Current affairs 1 May 2020 Marathi |
1 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा
Celebrating the 60th Anniversary of the Establishment of the State of Maharashtra
कोविड-19 महमारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ साधेपणानेच साजरा केला गेला. हा दिन गुजरात राज्याचा देखील स्थापना दिन आहे.
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा व नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य केली आणि 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन: 1 मे
International Labor Day: May 1
दरवर्षीप्रमाणे 1 मे 2020 रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) नेतृत्वात ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा ‘आंतरराष्ट्रीय श्रम दिन’ किंवा ‘मे दिन’ म्हणूनही ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जगभरात 1 मे रोजी कामगार दिन पळाला जातो.
आर्थिक आणि सामाजिक हक्क साध्य करण्यासाठी बलिदान दिलेल्या जगभरातल्या कामगारांना श्रद्धांजली अर्पण करणे हा या दिनाचा उद्देश आहे. कामगार स्त्री-पुरुषांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
No comments:
Post a Comment