Current affairs | Evening News Marathi
Current affairs 3 April 2020 Marathi |
3 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
IISc बंगळुरूमध्ये ‘प्रोजेक्ट प्राण’ अंतर्गत स्वदेशी व्हेंटिलेटर विकसित केले
बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमधल्या वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांनी ‘प्रोजेक्ट प्राण’ अंतर्गत स्वदेशी व्हेंटिलेटर उपकरण तयार केले आहे. त्यासाठी लागणारे सुटे भाग वाहननिर्मिती उद्योग आणि RO वॉटर फिल्टर उद्योगांकडून घेतले गेले आहेत.
कोविड-19 महामारीसाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने व्हेंटिलेटर उपकरणांची अत्याधिक गरज भासत आहे. आयात केलेल्या सुटे भागांची कमतरता दूर करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणात उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे.
व्हेंटिलेटरमध्ये वाहनामध्ये वापरल्या जाणारे प्रेशर सेन्सर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस वॉटर फिल्टर हे भाग महत्त्वाचे असतात.
मुंबईच्या नवल डॉकयार्डने स्वतःसाठी ‘तापमान मापक यंत्र’ तयार केले
मुंबईच्या वेस्टर्न नेव्हल कमांडचे नेव्हल डॉकयार्ड इथल्या अभियंत्यांनी स्वतःसाठी कमी किंमतीचे ‘तापमान मापक यंत्र’ तयार केले. कोविड-19 संक्रमणाचा प्रसार टाळण्याच्या उद्देशाने हे उपकरण तयार करण्यात आले आहे.
बंदुकीसारखा आकार असलेले ‘तापमान मापक यंत्र’ यामध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. उपकरणाच्या उत्पादनाची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे, जे बाजारात उपलब्ध असलेल्या उपकरणांपेक्षा खूपच कमी आहे.
No comments:
Post a Comment