Current affairs | Evening News Marathi
Current affairs 4 April 2020 Marathi |
4 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
ओडिशा सरकारचा ‘मो प्रतिवा’ कार्यक्रम
संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यांच्या सहकार्याने ओडिशा सरकारने 'मो प्रतिभा' नावाचा एक नवा कार्यक्रम सादर केला आहे. हा ऑनलाईन स्पर्धा कार्यक्रम आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर घरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना विविध कल्पनात्मक कार्यांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
स्पर्धांमध्ये घोषवाक्य लेखन, विविध कला, लघुकथा लेखन, भित्तिपत्रिका आणि काव्य लेखन अश्या कला-कौशल्यांचा समावेश आहे. या स्पर्धांमध्ये 5 ते 18 वर्ष या वयोगटातले विद्यार्थी भाग घेऊ शकतात.
IRDAI संस्थेनी ‘आरोग्य संजीवनी विमा’मध्ये कोविड-19 खर्चाला समाविष्ट केले
भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरणाने (IRDAI) “आरोग्य संजीवनी” या मानक आरोग्य विम्याच्या अंतर्गत कोविड-19 मुळे येणारा रुग्णालयाचा खर्च आता समाविष्ट करण्यात येणार आहे असे निर्देश सर्व 29 सामान्य / आरोग्य विमा कंपन्यांना दिलेत. तसेच IRDAIने सर्व 29 सामान्य / आरोग्य विमा कंपन्यांसाठी संजीवनी उत्पादनाला मान्यता दिली आहे.
1 लक्ष ते 5 लक्ष रुपयांपर्यंत आरोग्य कवच प्रदान करण्यासाठी जानेवारी 2020 या मदहिन्यात ‘आरोग्य संजीवनी’ नावाच्या नवीन प्रमाणित आरोग्य विम्याची
घोषणा करण्यात आली होती. 1 एप्रिल 2020 पासून सुरू झालेल्या या नवीन योजनेचे उद्दीष्ट म्हणजे वेगवेगळ्या विमा कंपन्यांनी सुरू केलेल्या बहुविध विमा उत्पादनांच्या अस्तित्वामुळे ग्राहकांमधील संभ्रम दूर करणे आहे.
No comments:
Post a Comment