Current affairs | Evening News Marathi
Current affairs 2 April 2020 Marathi |
2 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
विम्बल्डन टेनिस स्पर्धा द्वितीय महायुद्धानंतर प्रथमच रद्द करण्यात आली. | The Wimbledon tennis tournament was canceled for the first time since World War II
चार ग्रँडस्लॅमपैकी एक असलेली विम्बल्डन टेनिस स्पर्धा या वर्षी रद्द करण्यात आली असून द्वितीय महायुद्धानंतर पहिल्यांदाच म्हणजेच 75 वर्षांनंतर स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली आहे. पुढील वर्षीची स्पर्धा 28 जून ते 11 जुलै या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याविषयीची घोषणा ऑल इंग्लंड क्लबने केली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नियोजित असलेल्या अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. विम्बल्डन स्पर्धा 28 जून 2020 पासून सुरू होणार होती.
विम्बल्डन अंतिम स्पर्धा ही टेनिस क्रिडाप्रकारातली सर्वात जुनी (सन 1877 सालापासून) आणि सर्वोच्च मानांकित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा लंडन (इंग्लंड) येथील ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोकुएट क्लब येथे खेळली जाते.
‘रीड द वर्ल्ड’: वाचनाला प्रोत्साहन देणारा IPA, WHO आणि UNICEF या संस्थांचा संयुक्त उपक्रम | 'Read the World': a joint venture between IPA, WHO and UNICEF promoting reading.
कोविड-19 महामारीमुळे जगभरात लागू केलेल्या संचारबंदीमुळे घरातच अडकलेल्या लोकांना तसेच लहान मुला-मुलींना वाचनाची आवड लागावी यासाठी प्रोत्साहन देणारा ‘रीड द वर्ल्ड’ उपक्रम आंतरराष्ट्रीय प्रकाशक संघ (IPA), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या संस्थांच्या पुढाकाराने राबविला जात आहे.
2 एप्रिल 2020 रोजी आंतरराष्ट्रीय बाल पुस्तके दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन इटलीच्या ‘गेरोनिमो स्टिल्टन’ या मुलांच्या पुस्तकांची मालिकेच्या लेखकांनी केले. लेखक एलिसाबेटा डॅमी यांनी ‘गेरोनिमो स्टिल्टन’ या लोकप्रिय पात्राची रचना केली.
No comments:
Post a Comment