Current affairs | Evening News Marathi
Current affairs 24 April 2020 Marathi |
24 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
कोविड-19 नमुने गोळा करण्यासाठी DRDOने विकसित केली फिरती प्रयोगशाळा
DRDO developed a mobile laboratory to collect Covid-19 samples
हैद्राबादमधले ESIC रुग्णालय आणि खाजगी उद्योगांच्या संयुक्त विद्यमाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) रिसर्च सेंटर इमारत येथील संशोधकांनी एक मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी (MVRDL) विकसित केली आणि त्याला हैदराबादमध्ये तैनात केली आहे. 6 महिन्यांचा कालावधी आवश्यक असलेल्या फिरत्या जैव-सुरक्षा श्रेणी-2 आणि श्रेणी-3 प्रयोगशाळांची स्थापना 15 दिवसांच्या विक्रमी कालवधीत पूर्ण केली गेली आहे.
या चाचणी सुविधेत दिवसाला 1000 हून अधिक नमुन्यांची चाचणी होऊ शकते ज्यामुळे कोविड-19 विरुद्धच्या लढाईत क्षमता अधिक वृद्धिंगत होणार.
संयुक्त राष्ट्रसंघ ‘इंग्रजी’ आणि ‘स्पॅनिश’ भाषा दिन: 23 एप्रिल
United Nations ‘English’ and ‘Spanish’ Language Day: 23 April
दरवर्षी 23 एप्रिल या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘इंग्रजी भाषा दिन’ आणि ‘स्पॅनिश भाषा दिन’ पाळला जातो. बहुभाषिक आणि सांस्कृतिक विविधता पाळणे तसेच संघटनेत सर्व सहा अधिकृत भाषेचा समान वापर होण्यास प्रोत्साहन देणे हा भाषा दिनाचा उद्देश आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाची 6 भाषांना मान्यता आहे. या सहाही भाषांना समान रूपाने उपयोगात आणण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी प्रत्येकी एक दिन पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत – अरबी (18 डिसेंबर), फ्रेंच (20 मार्च), चीनी (20 एप्रिल), इंग्रजी (23 एप्रिल), स्पॅनिश (23 एप्रिल), रशियन (6 जून).
No comments:
Post a Comment