Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 April 2020 Marathi |
20 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
“कोविड वॉरियर्स”: महामारी परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाची माहिती प्रदान करणारे व्यासपीठ"
Covid Warriors": platform to provide manpower information to deal with epidemic situations
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महामारीमुळे उभावलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची माहिती प्रदान करणारे “कोविड वॉरियर्स” या नावाने एक व्यासपीठ तयार केले आहे.
संकेतस्थळावर चिकित्सक, परिचारिका आणि इतर आरोग्य सेवा व्यवसायिक तसेच स्वइच्छेनी मदत करणारे NCC, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, राष्ट्रीय युवा केंद्र यांमधील स्वयंसेवक आणि माजी सैनिक यांची माहिती उपलब्ध आहे. या माहितीचा उपयोग राज्य, जिल्हा किंवा महानगरपालिका स्तरावर प्रशासनाद्वारे करता येऊ शकणार आहे.
उत्तरप्रदेश: ‘जियोटॅग’ प्राप्त समुदायिक स्वयंपाकगृहे असणारे देशातले पहिले राज्य
Uttar Pradesh: the first state in the country to have 'Geotag' community kitchens
उत्तरप्रदेशातल्या समुदायिक स्वयंपाकगृहांना ‘जियोटॅग’ प्रदान करण्यात आले आहे, ज्यामुळे तयार झालेले अन्न कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आले आहे त्याविषयी माहिती उपलब्ध होते. ‘जियोटॅग’ सेवा मिळविण्यासाठी राज्य सरकारने गुगलकंपनीसोबत करार केला आहे.
राज्यातल्या 75 जिल्ह्यातल्या 7,368 स्वयंपाकगृहांमध्ये दिवसाला सुमारे 12 लक्ष डब्बे तयार केले जात आहेत. एकूण समुदायिक स्वयंपाकगृहांपैकी 668 धार्मिक संस्था आणि अशासकीय संस्था चालवित आहेत.
No comments:
Post a Comment