Current affairs | Evening News Marathi
Current affairs 1 April 2020 Marathi |
1 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
NASAची ‘सनराइज' मोहीम NASA's 'Sunrise' campaign
सौर कणांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेनी ‘सन रेडिओ इंटरफेरोमीटर स्पेस एक्सपेरिमेंट’ (सनराइज / SunRISE) मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. ही मोहीम कॅलिफोर्नियाच्या पासाडेना येथे असलेल्या NASAच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीद्वारे व्यवस्थापित केले जात आहे.
ही मोहीम वैज्ञानिकांना सूर्यापासून निघणार्या सौर कणांच्या वादळाची कारणे अभ्यासण्यास मदत करणार. या अभ्यासामुळे सूर्याच्या किरणोत्सर्गामुळे अंतराळ वातावरणावर कसा परिणाम होतो याविषयी अधिक माहिती मिळवून सौर वादळातून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांचे संरक्षण करण्यात मदत होणार.
सौदी अरबच्या अध्यक्षतेखाली द्वितीय जी-20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची आभासी बैठक संपन्न A झाली | virtual meeting of the Second G20 Finance Minister and the Governor of the Central Banks under the chairmanship of Saudi Arabia concludes
31 मार्च 2020 रोजी सौदी अरबच्या अध्यक्षतेखाली द्वितीय जी-20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची आभासी बैठक संपन्न झाली. बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सहभाग घेतला होता.
आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि वित्तीय ध्येयाच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूंसंदर्भात आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी ‘ग्रुप ऑफ ट्वेंटी’ (किंवा जी-20) हा प्रमुख मंच आहे. या समूहात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, युरोपीय संघ (EU), फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, टर्की, ब्रिटन (UK) आणि संयुक्त राज्ये अमेरिका (USA) या देशांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment