Current affairs | Evening News Marathi
Current affairs 12 April 2020 Marathi |
12 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन: 11 एप्रिल
दरवर्षी 11 एप्रिल या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन’ साजरा केला जातो. 2020 या वर्षांची संकल्पना ‘सेफ मदरहूड इन टाइम्स ऑफ कोविड-19’ ही होती.
भारत सरकारने 2003 साली दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करण्याची घोषणा केली. अशी घोषणा करणारा भारत हा पहिला देश होता. राष्ट्रीय मातृत्व दिन दरवर्षी कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, त्या राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या पत्नी होत्या.
आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन: 12 एप्रिल
दरवर्षी 12 एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन साजरा केला जातो. शांततेच्या उद्देशाने बाह्य अंतराळाचा वापर करण्याचा संदेश जगाला देण्यासाठी हा दिन साजरा करतात.
1961 साली या दिवशी सोव्हियत अंतराळवीर युरी गागारिन यांनी अंतराळात भरारी घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment