Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 April 2020 Marathi |
11 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
कोविड-19 महामारीशी लढा देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे नवीन धोरण
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) बाधित क्षेत्रांमध्ये तसेच स्थलांतर करणाऱ्या जनसमुदायांमध्ये किंवा त्यांच्या शरणार्थी केंद्रांमध्ये कोविड-19 रुग्णांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यासाठी एक नवीन धोरण तयार केले आहे.
नवीन धोरणानुसार, गेल्या 14 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या आणि प्रयोगशाळेनी पुष्टी केलेल्या प्रकरणांमध्ये रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तपासणी केली जाणार आहे.
तसेच कोविड-19 ची लक्षणे दर्शवित असलेले सर्व आरोग्य कर्मचारी आणि खोकला, ताप, श्वास लागणे आणि छातीत दुखणे यासारखी लक्षणे असणाऱ्या सर्व रुग्णांची देखील तपासणी केली जाणार आहे.
G2G तरतुदीनुसार अफगाणिस्तान आणि लेबनॉनकडे गहूची निर्यात केली जाणार
गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट (G2G) तरतुदीनुसार भारताने सुमारे एक लक्ष टन गहू लेबनॉन व अफगाणिस्तान या देशांकडे निर्यात करणार असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) लेबनॉनकडे 40 हजार टन गहू तर अफगाणिस्तानकडे 50 हजार टन गहू निर्यात करणार.
2020 साली भारतात 106.21 दशलक्ष टन एवढे गहूचे विक्रमी उत्पन्न घेतले जाण्याचे अपेक्षित आहे. भारत सरकार मानवतावादी कार्याच्या आधारावर आशियाई आणि आफ्रिकी देशांकडे गहू निर्यात करीत आहे.
No comments:
Post a Comment