Current affairs | Evening News Marathi
Current affairs 10 April 2020 Marathi |
10 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
द्वितीय तिमाहीत CPI आधारित महागाई दर 4.4 टक्क्यांवर घसरणार: RBI
कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) बाजारपेठाच्या दरांविषयी अंदाज व्यक्त केला आहे. जो ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई दर 2020-21 या आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत 4.8 टक्के होता तो द्वितीय तिमाहीत 4.4 टक्क्यांवर राहण्याचे अपेक्षित आहे.
CPI आधारित महागाई दरात घट होणे म्हणजे घटणारी एकूण मागणी दर्शवते, जी पुढे आणखीनच कमकुवत होणार.
इंटरपोलने रुग्णालयांवर सायबर हल्ल्याबद्दल धोक्याची सूचना देण्यासाठी ‘पर्पल नोटिस’ जाहीर केली
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (इंटरपोल) यांनी आपल्या सर्व 194 सदस्य देशांना रुग्णालयांवर होणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्याबद्दल धोक्याची सूचना दिली आणि त्यासाठी ‘पर्पल नोटिस’ जाहीर केली आहे. रुग्णालयात वापरली जाणारी अत्याधुनिक यंत्रे रॅन्समवेअर या तंत्राच्या माध्यमातून हॅक करून खंडणी मागितली जाते.
गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरल्या जाणार्या ‘मोडस ऑपरेंडी’ संबंधीची माहिती मिळविण्यासाठी किंवा ती देण्यासाठी ‘पर्पल नोटिस’ जाहीर केली जाते.
No comments:
Post a Comment