Current affairs | Evening News Marathi
Current affairs 3 January 2020 Marathi |
3 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
जी. बबीता रायुडू: SEBI याचे नवे कार्यकारी संचालक
बाजारपेठेवर नियंत्रण ठेवणारी भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) यांनी जी. बबिता रायुडू ह्यांची कार्यकारी संचालकपदी निवड केली आहे. 1 जानेवारी 2020 रोजी रायुडू ह्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. रायुडू व्यतिरिक्त SEBIमध्ये आणखी आठ कार्यकारी संचालक कार्यरत आहेत.
रायुडू नव्या पदभारासह कायदेशीर व्यवहार विभाग, अंमलबजावणी विभाग आणि विशेष अंमलबजावणी कक्ष सांभाळणार आहेत.
SEBI विषयी
भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) हे भारतामध्ये समभाग बाजारपेठेमधील सुरक्षा बंध/कर्जरोखे/रोखे/किंवा अन्य उत्पादने यांच्या संदर्भात होणार्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारे विभाग आहे. 1988 साली या संस्थेची स्थापना झाली आणि ‘SEBI अधिनियम-1992’ अन्वये दि. 30 जानेवारी 1992 रोजी त्याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. मुंबईत त्या मंडळाचे मुख्यालय आहे.
प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकर्यांना 12,000 कोटी रुपयांची मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 2 जानेवारी 2020 रोजी कर्नाटक राज्यातल्या तुमकूर या गावात केंद्र सरकारच्या नव्या ‘प्रधान मंत्री किसान सम्मान निधी’ (पीएम-किसान) योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेमधून देशातल्या जवळपास 6 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 12,000 कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे.
डिसेंबर महिन्यातला 2000 रुपयांचा हप्ता नव्या वर्षात उरलेल्या रकमेसह शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
योजनेचे स्वरूप
- ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यासोबत संलग्न आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आधार बँक खात्यासोबत जोडण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत देण्यात आली आहे.
- या योजनेच्या अंतर्गत दर चार महिन्यांनी याप्रमाणे वर्षाकाठी 6,000 रुपयांची रक्कम तीन हप्त्यात (2,000 रुपये या प्रमाणे) लघू व सीमांत शेतकर्यांना (ज्यांची 2 हेक्टरपेक्षा कमी भूमी आहे) देण्याची योजना आहे.
- केंद्र सरकारने या योजनेसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातले 45 हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून, आता जानेवारीत 12 हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त, 21 राज्यांमधल्या प्रगतीशील शेतकर्यांचा ‘कृषी कर्मण पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला आहे.
तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करता यावी यासाठी नौका आणि सुचालन यंत्रणेसाठी ट्रान्सपोंडर या उपकरणांचे देखील वाटप करण्यात आले.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment