Current affairs | Evening News Marathi
Current affairs 8 December 2019 Marathi |
8 डिसेंबर 2019 मराठी करेंट अफेयर्स
गिरीश चंद्र चतुर्वेदी: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) याचे नवे अध्यक्ष
गिरीश चंद्र चतुर्वेदी ह्यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) याच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. जानेवारीत अशोक चावला यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)
मुंबई येथे मुख्यालय असलेली नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) भारतामधले आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे. 27 नोव्हेंबर 1992 रोजी NSEची स्थापना झाली. हे देशातले पहिले डिमॅट्युअलाइज्ड इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज आहे.
आधुनिक आणि पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने चालणारी इलेक्ट्रॉनिक व्यापार व्यवस्था उपलब्ध करुन देणारे NSE हे देशातले पहिले एक्सचेंज आहे.
चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ नवी दिल्लीत संपन्न
नवी दिल्लीत 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात 'व्हॅल्यूइंग वॉटर - ट्रान्सफॉर्मिंग गंगा' या विषयाखाली चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ पार पडली. या कार्यक्रमाचे उद्घाटन जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते झाले.
IIT कानपूरच्या नेतृत्वात भारत सरकारचे जल शक्ती मंत्रालय आणि सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (cGanga) या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमातल्या ठळक बाबी
- पाणीपुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर आणि त्याच्या संवर्धनाबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
- कार्यक्रमादरम्यान, 'रिव्हर रिस्टोरेशन अँड कन्झर्वेशन - ए कॉन्सिस मॅन्युअल अँड गाईड' यासंबंधीचा अहवाल तसेच आतापर्यंत विकसित केलेल्या 'गंगा हब' यांचा हवाला जाहीर करण्यात आला.
- बैठकीत ग्रामीण व शहरी भागातल्या जलसंपत्तीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर देण्यात आला.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment