Current affairs | Evening News Marathi
Current affairs 7 December 2019 Marathi |
7 डिसेंबर 2019 मराठी करेंट अफेयर्स
राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कारांचे वितरण
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 5 डिसेंबर 2019 रोजी एका समारंभात ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार देऊन 36 जणांचा सन्मान करण्यात आला.
त्यामध्ये, केरळच्या कोझिकोड येथल्या दिवंगत लिनी साजीश ह्यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे. कर्तव्य बजावत असताना त्यांना निपाह रोगाची लागण होऊन त्या मरण पावल्या.
पुरस्काराविषयी
‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार भारत सरकारच्या वतीने दिला जातो. हा पुरस्कार देशभरातल्या उत्कृष्ट काम करणार्या सहाय्यक नर्स मिडवाइव (सुइणी / ANM), लेडी हेल्थ व्हिजिटर (LHV) आणि परिचारिकांना दिला जातो. हा पुरस्कार फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या स्मृतीत दिला जातो.
ब्रिटिश फ्लॉरेन्स नाईटिंगेल (1820-1910) ह्यांना आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक तसेच “लेडी विथ द लॅम्प” म्हणून देखील ओळखले जाते. 2020 साली फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांची 200 वी जयंती साजरी केली जाणार आहे.
खासगी लघू वित्त बँकांसाठी कधीही परवाना मिळावा त्यासाठी RBIची नवी मार्गदर्शके
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘खासगी क्षेत्रातल्या लघू वित्त बँकांचा (SFB) परवाना’ याच्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
नवीन मार्गदर्शके पुढीलप्रमाणे आहेत,
- सर्व पात्रता निकष पूर्ण केल्यास पेमेंट्स (देयक) बँकांना पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर लघू वित्त बँकेमध्ये रूपांतरीत होण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
- किमान पेड-अप व्होटिंग इक्विटी कॅपिटल म्हणजेच आवश्यक असलेले भांडवल 200 कोटी रुपये असावे.
- परवाना मिळविण्यासाठी RBI कडील सुविधा मुक्तपणे उघडली जाणार आहे. मुक्तपणाच्या सुविधेमुळे RBI वर्षभर बँकांचे अर्ज स्वीकारू शकणार आणि परवाना देणार आहे.
- याव्यतिरिक्त, विशिष्ट अटी पूर्ण केल्यास इच्छुकांना कोणत्याही वेळी सार्वत्रिक बँकेसाठी परवाना मिळविण्यासाठी अर्ज करण्याची मुभा आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment