असतील शिते तर जमतील भूते | एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात |
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ | दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो |
अडला हरी गाढवाचे पाय धरी | एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते |
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा | जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही |
अति तेथे माती | कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो |
अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे | दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे. |
अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज | गरजवंताला अक्कल नसते |
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे | दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे. |
अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण | मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. |
अंधारात केले, पण उजेडात आले | कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच |
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे | नाव मोठे लक्षण खोटे |
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था | अशक्यकोटीतील गोष्टी |
अती झाले अन आसू आले | एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते |
अतिपरिचयात अवज्ञा | जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो |
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे | कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच |
अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास | अन्न न खाणे;पण त्यात मन असणे |
अपापाचा माल गपापा | लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. |
अर्थी दान महापुण्य | गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. |
आईची माया अन् पोर जाईल वाया | फार लाड केले तर मुले बिघडतात |
आधी पोटोबा मग विठोबा | प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देव – धर्म करणे |
आपलेच दात आपलेच ओठ | आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. |
आयत्या बिळावर नागोबा | एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. |
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे | अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे |
आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकाला | ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो, तो दोष आपल्या अंगी असणे |
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास | मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे. |
आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं | एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. |
आंधळ्या बहिर्यांची गाठ | एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणार्या दोन माणसांची गाठ पडणे. |
अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी ? | चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही, उलटी ती दुसऱ्याच्या माथी मारून मारून मोकळे व्हायचे. |
अडली गाय फटके खाय | एखादा माणूस अडचणीत सापडला, की त्याला हैराण केले जाते. |
आपला हात जगन्नाथ | आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. |
असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा | अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. |
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? | कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. |
अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप | अतिशय उतावळेपणाची कृती. |
अती खाणे मसणात जाणे | अति खाणे नुकसानकारक असते. |
अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी | मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. |
अवचित पडे, नि दंडवत घडे | स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. |
अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे | एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू. |
अंथरूण पाहून पाय पसरावे | आपली ऐपत, वकूब पाहून वागावे. |
अंगापेक्षा बोंगा मोठा | मूळ गोष्टींपेक्षा अनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. |
आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे | स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. |
आपली पाठ आपणास दिसत नाही | स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत. |
आजा मेला नातू झाला | एखादे नुकसान झाले असता, त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे. |
आत्याबाईला जर मिशा असत्या तर | नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे. |
आपल्याच पोळीवर तूप ओढणे | फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. |
आलिया भोगासी असावे सादर | तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. |
आवळा देऊन कोहळा काढणे | आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे. |
आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही | अनुभवाशिवाय शहाणपण नसते. |
आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन | दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. |
आधीच तारे, त्यात गेले वारे | विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. |
आधीच मर्कट तशातही मद्य प्याला | आधीच करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते. |
अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा | मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचाच खर्च जास्त असणे. |
आग रामेश्वरी, बंब सोमेश्वर | रोग एकीकडे, उपाय भलतीकडे. |
आयजीच्या जीवावर बायजी उदार | दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. |
आग खाईल तो कोळसे ओकेल | जशी करणी तसे फळ |
आठ पूरभय्ये नऊ चौबे | खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे. |
आधणातले रडतात व सुपातले हसतात | संंकटात असतानाही दुसर्याचे दुःख पाहून हसू येते. |
इकडे आड तिकडे विहीर | दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. |
इच्छा परा ते येई घरा | आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे. |
इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते | इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. |
इन मीन साडेतीन | एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. |
ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो | जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. |
उथळ पाण्याला खळखळाट फार | अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. |
उंदराला मांजर साक्ष | ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. |
उचलली जीभ लावली टाळ्याला | दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे |
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग | अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे. |
उठता लाथ बसता बुक्की | प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हापुन्हा शिक्षा करणे. |
उडत्या पाखराची पिसे मोजणे | अगदी सहज चालता – चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. |
उतावळी बावरी (नवरी) म्हातार्याची नवरी | अति उतावळेपणा नुकसान कारक असतो. |
उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरी | जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. |
उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले | फायद्याची वेळी येणे; पण लाभ न घेता येणे. |
ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे | अतिशय हलाखीची स्थिती. |
उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी | प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. |
उकराल माती तर पिकतील मोती | मशागत केल्यास चांगले पीक येते. |
उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला? | एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. |
उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती? | जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे. |
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक | एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते. |
उधारीची पोते, सव्वा हात रिते | उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. |
उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे | श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच. |
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे | येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे. |
उसाच्या पोटी कापूस | सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती. |
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये | कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. |
एका माळेचे मणी | सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे. |
एका हाताने टाळी वाजत नाही | दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. |
एक ना धड भाराभर चिंध्या | एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. |
एकावे जनाचे करावे मनाचे | लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे. |
एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी | दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. |
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये | दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. |
एका पिसाने मोर होत नाही | थोड्याश्या यशाने हुरळून जाणे |
एका खांबावर द्वारका | एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. |
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला | एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. |
एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी | बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य |
एका मान्यात दोन तलवारी राहात नाहीत | दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत. |
ऐंशी तेथे पंचाऐंशी | अतिशय उधळेपणाची कृती. |
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार | | मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात. |
ओळखीचा चोर जीवे न सोडली | ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. |
ओढ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो/ शेंडी तुटो की तारंबी तुटो | कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे. |
ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे? | सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे. |
औटघटकेचे राज्य | अल्पकाळ टिकणारी गोष्ट. |
करावे तसे भरावे | जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे. |
कर नाही त्याला डर कशाला ? | ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे ? |
करीन ते पूर्व | मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे. |
करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते | काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते. |
करुन करुन भागला, देवध्यानी लागला | भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे. |
कणगीत दाणा तर भिल उताणा | गरजेपुरते जवळ असले, कि लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत. |
कधी तुपाशी तर कधी उपाशी | सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही. |
कशात-काय-अन-फाटक्यात-पाय | वाईटात आणखी वाईट घडणे |
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही | रक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही. |
काडीचोर तो माडीचोर | एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाची संबंध जोडणे. |
काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती | गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो. |
का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढ | निरर्थक गोष्टींची काळजी करणे. |
कानात बुगडी, गावात फुगडी | आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. |
काल महिला आणि आज पितर झाला | अतिशय उतावळेपणाची वृत्ती. |
काकडीची चोरी फाशीची शिक्षा | अपराध खूप लहान; पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे. |
काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही | जे काम भरपूर पैसा आणि होत नाही, ते थोड्याश्या अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते. |
कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते | पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे. |
मल्हारी माहात्म्य | नको तिथे नको ती गोष्ट करणे. |
काना मागुन आली आणि तिखट झाली | श्रेष्ठ पेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. |
कामापुरता मामा | आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. |
कावळा बसला आणि फांदी तुटली | परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे |
काखेत कळसा गावाला वळसा | जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे |
काप गेले नी भोके राहिली | वैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या |
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही | शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते. |
काळ आला; पण वेळ आली नव्हती | नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. |
कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात | चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. |
कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा | दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. |
कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे | मूळचा स्वभाव बदलत नाही. |
कुडी तशी फोडी | देहा प्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. |
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ | स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. |
केळीला नारळी अन घर चंद्रमौळी | अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे. |
केस उपटल्याने का मढे हलके होते ? | जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही. |
केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले | एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. |
कोळसा उगाळावा तितका काळाच | वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते. |
कोल्हा काकडीला राजी | लहान लहान गोष्टींनी खुश होतात. |
कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी | चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला |
कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी | महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे. |
खऱ्याला मरण नाही | खरे कधीच लपत नाही. |
खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते | खर्च करणार्याचा खर्च होतो ; तो त्याला मान्य ही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. |
खाऊ जाणे तो पचवू जाणे | एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही समर्थ असतो. |
खान तशी माती | आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. |
खायला काळ भुईला भार | निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. |
खाई त्याला खवखवे | जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. |
खाऊन माजावे टाकून माजू नये | पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये. |
खोट्याच्या कपाळी गोटा | खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. |
गरज सरो, वैद्य मरो | एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे. |
गळ्यात पडले झुंड हसून केले गोड | गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते. |
ग ची बाधा झाली | गर्व चढणे |
गरजेल तो पडेल काय | केवळ बडबडणार्या माणसाकडून काही घडत नाही. |
गरजवंताला अक्कल नसते | गरजेमुळे अडणार्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते. |
गर्वाचे घर खाली | गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. |
गळ्यातले तुटले ओटीत पडले | नुकसान होता होता टळणे. |
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता | मुर्खाला कितीही उद्देश केला तरी त्याचा उपयोग नसतो. |
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा | मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. |
गाढवाला गुळाची चव काय ? | ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. |
गाढवाच्या पाठीवर गोणी | एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा. |
गाव करी ते राव न करी | श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. |
गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ | मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो. |
गाय व्याली, शिंगी झाली | अघटित घटना घडणे. |
जळे आणि हनुमान बेंबी चोळे | दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे |
गोगलगाय न पोटात पाय | बाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती. |
घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे | अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे |
घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात | एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. |
घरोघरी मातीच्या चुली | एखाद्या बाबतीत सामान्यता सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. |
घर ना दार देवळी बिर्हाड | शिरावर कोणती जबाबदारी नसलेली व्यक्ती. |
घडाई परिस मडाई जास्त | मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे. |
घेता दिवाळी देता शिमगा | घ्यायला आनंद वाटतो तर द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब. |
घोडे कमावते आणि गाढव खाते | एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा. |
चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ | मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे. |
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे | प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच. |
चार जणांची आई बाजेवर जीव जाई | जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही. |
चिंता परा येई घरा | दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले, कि ते आपल्यावरच उलटते. |
चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला | स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे. |
चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई | घरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे. |
चोर सोडून संन्याशालाच फाशी | खर्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. |
चोराच्या उलट्या बोंबा | स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. |
चोरावर मोर | एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. |
चोरांच्या हातची लंगोटी | ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेतरी मिळणे. |
चोराची पावली चोराला ठाऊक | वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. |
चोराच्या मनात चांदणे | वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते. |
चालत्या गाडीला खीळ | व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे. |
जशी देणावळ तशी धुणावळ | मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. |
जलात राहून माशाशी वैर करू नये | ज्यांच्या सहवासात रहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये. |
जळतं घर भाड्याने कोण घेणार ? | नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार ? बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार ? |
जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही | बाह्य देखाव्याने माणूस ज्ञान होत नाही. |
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे | दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते. |
जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले | जितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोड कौतुक करायचे. |
जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशी | अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाची वागणे. |
जे न देखे रवि ते देखे कवी | जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो. |
जो गुळाने मरतो त्याला विष कशास ? | जिथे गोड बोलून काम होते तिथे जालीम उपायांची गरज नसते. |
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी | एकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणची असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. |
ज्याच्या हाती ससा, तो पारधी | ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. |
ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे | एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो. |
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी | जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे. |
झाकली मूठ सव्वा लाखाची | व्यंग नेहमी झाकून ठेवावे. |
टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही | कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण येत नाही. |
डोळ्यात केर आणि कानात फुंकर | रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी. |
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही, पण गुण लागला | वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. |
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा | वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात. |
तळे राखील तो पाणी चाखील | ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घेणारच. |
तरण्याचे कोळसे, म्हातार्याला बाळसे | अगदी उलट गुणधर्म दिसणे. |
तट्टाला टूमणी, तेजीला इशारत | जी गोष्ट मूर्खाला शिक्षेने ही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते. |
ताकापुरते रामायण | एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे. |
तीन दगडात त्रिभुवन आठवते | संसार केल्यावरच खरे मर्म कळते. |
तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही | चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत. |
तुकारामबुवांची मेख | न सुटणारी गोष्ट |
तू दळ माझे आणि मी दळण गावच्या पाटलाचे | आपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात. |
तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले | मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. |
तेरड्याचा रंग तीन दिवस | कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते. |
तोंड दाबून बुक्क्यांचा मार | एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे. |
तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे | खायला पुढे कामाला मागे. |
थेंबे थेंबे तळे साचे | दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो. |
थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान | मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. |
दगडापेक्षा वीट मऊ | मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो. |
दस की लकडी एक्का बोजा | प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते. |
दहा गेले, पाच उरले | आयुष्य कमी उरणे. |
दात कोरून पोट भरत नाही | मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही. |
दाम करी काम, बिवी करी सलाम | पैसे खर्च केले की कोणतेही काम होते. |
दाखविलं सोनं हसे मुल तान्हं | पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात. |
दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत | एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूलन नसणे. |
दिल चंगा तो कथौटी में गंगा | आपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याजवळ असते. |
दिव्याखाली अंधार | मोठ्या माणसातदेखील दोष असतो. |
दिल्ली तो बहुत दूर है | झालेल्या कामाचा मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे. |
दिवस बुडाला मजूर उडाला | रोजाने व मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार. |
दुरून डोंगर साजरे | कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते. |
दुभत्या गाईच्या लाथा गोड | ज्याच्या पासून काही लाभ होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो. |
दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही | दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही. |
दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागते | एखाद्या बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे. |
देश तसा वेश | परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन. |
देव तारी त्याला कोण मारी ? | देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही. |
देखल्या देवा दंडवत | सहज दिसले म्हणून चौकशी करणे. |
देणे कुसळांचे घेणे मुसळाचे | पैसे कमी आणि काम जास्त. |
देवा दंडवत | एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे. |
दैव देते आणि कर्म नेते | नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते. |
दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी | नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते. |
दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला | नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे |
दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई | नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात. |
दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी | दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या चे काम होत नाही. |
दृष्टीआड सृष्टी | आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. |
धर्म करता कर्म उभे राहते | एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते. |
धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी | कोणत्याच कामाचे नसणे. |
धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा | छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठी कडे दुर्लक्ष करणे. |
धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या | गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते. |
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने | दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात |
नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये | नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच. |
न कर्त्याचा वार शनिवार | एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो. |
नऊ दिवस | कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे. |
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे | केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार. उपदेशाचा शून्य परिणाम होणे. |
नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे | एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे |
नाकापेक्षा मोती जड | मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे |
नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा | नाव मोठे लक्षण खोटे. |
नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे | देवाच्या नावाने स्वार्थ जपणे. |
नाक दाबले, की तोंड उघडते | एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला, की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते. |
नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला | आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे. |
नागिन पोसली आणि पोसणाराला डसली | वाईट गोष्ट जवळ बाळगल्या वर ती कधी ना कधी उलटतेच |
नाकापेक्षा मोती जड | मालकापेक्षा नोकराचे प्रतिष्ठा वाढणे |
नाचता येईना अंगण वाकडे | आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे |
नावडतीचे मीठ आळणी | आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते |
निंदकाचे घर असावे शेजारी | निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात |
नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेन | अतिशय हटवादीपणाची वर्तन करणे |
पळसाला पाने तीनच | सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे |
पडलेले शेण माती घेऊन उठते | एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने किती जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच |
पदरी पडले पवित्र झाले | कोणती गोष्ट एकदा स्वीकारली कितीला नाव ठेवणे उपयोगाचे नसते |
पायाची वाहन पायीच बरी | मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो. |
पाचामुखी परमेश्वर | बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे |
पाप आढ्यावर बोंबलते | पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही |
पाची बोटे सारखी नसतात | सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात |
पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम | जिथे मोठी शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो |
पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे | अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही |
पाहुनी आली आणि म्होतुर लावून गेली | पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे |
पी हळद नि हो गोरी | कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे |
पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली | फायदा होईल म्हणून जाणे परंतु नुकसान होणे |
पुढच्याच ठेच मागचा शहाणा | दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो |
पुढे तिखट मागे पोचट | दिसायला फार मोठी पण प्रत्यक्षात तसे नसणारे |
पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा | पैसा कमी काम जास्त |
पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी | स्वतः जवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे |
पोर होईल ना व सवत साहिना | आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही |
फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय | राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावा लागतो |
फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे | जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे |
फुल ना फुलाची पाकळी | वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे |
फुटका डोळा काजळाने साजरा करावा | आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा |
बडा घर पोकळ वासा | दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव |
बळी तो कान पिळी | बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवितो |
बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना | निरुपयोगी गोष्ट |
बाप से बेटा सवाई | वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार |
बाप तसा बेटा | बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे |
बावळी मुद्रा देवळी निद्रा | दिसण्यास बावळट पण व्यवहारचतुर माणूस |
जारात तुरी भट भटणीला मारी | काल्पनिक गोष्टीवरुन भांडण करणे |
बारक्या फणसाला म्हैस राखण | ज्याच्या पासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपविणे |
बुडत्याला काडीचा आधार | घोर संकट काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची ठरते |
बैल गेला आणि झोपा केला | एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते |
बोलेल तो करेल | काय केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही |
बोडकी आली व केस कर झाली | विधवा आली अन लग्न लावून गेली |
भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी | एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो |
भरवशाच्या म्हशीला टोणगा | ज्या व्यक्तीवर अति विश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होणे |
भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री | व्यक्ती काही कारण नसताना भीत असते |
भिंतीला कान असतात | गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहात नाही |
भीड भिकेची बहीण | उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे |
भीक नको पण कुत्रा आवर | एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती |
भागीचे घोडे की किवणाने मेले | भागीदारीतील या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही |
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये | कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये |
मनात मांडे पदरात धोंडे | केवळ मोठ मोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती |
मनी वसे ते स्वप्नी दिसे | ज्या गोष्टींचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे |
नाही पण जण्याची तरी असावी | एखादी वाईट कृत्य करताना म्हणाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करावा |
मन जाणे पाप आपण | केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असतेच |
मन राजा मन प्रजा | हुकुम करणारे आपले मनच ते पाळणारे ही आपली मनच असते |
माणकीस बोललं, झुणकीस लागलं | एकाला बोलणे अन् दुसऱ्या लागणे |
मामुजी मेला अन् गांव गोळा झाला | क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे |
मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही | आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते |
मानेवर गळू आणि पायाला जळू | रोग एकीकडे उपाय भलतीकडे |
मारुतीची शेपूट | लांबत जाणारे काम |
मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू | छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे |
मुंगीला मुताचा पूर | लोकांना लहान संकट ही डोंगराएवढी वाटते |
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात | लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते |
मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते | मूर्खांचे भांड अन् तिसऱ्याचा लाभ |
म्हशीला मणभर दूध | मेल्यावर गुणगान करणे |
म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाही | निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच म्हशीचे दुध काढतांना आधी आचळाला दूध लागावे लागते फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते |
यथा राजा तथा प्रजा | सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात |
या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे | बनवाबनवी करणे |
रे माझ्या मागल्या | ताक कण्या चांगल्या एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे |
ये रे कुत्र्या खा माझा पाय | आपण होऊन संकट ओढवून घेणे |
रंग जाणे रंगारी | ज्याची विद्या त्यालाच माहीत |
रात्र थोडी सोंगे फार | कामे भरपूर पण वेळ थोडा असणे |
रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार | इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे |
रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत | मुख्य गोष्टीचा अभाव |
राईचा पर्वत करणे | मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे |
राज्याचे घोडे आणि खासदार उडे | वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची |
रोज मरे त्याला कोण रडे | तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही |
लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस | मुख्य कार्य पेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक लष्कराच्या भाकर्या भाजणे बिन फायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे |
लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही | धाका शिवाय शिस्त नाही |
लग्नाला गेली आणि बारशाला आली | अतिशय उशिराने पोहोचणे |
लंकेत सोन्याच्या विटा | दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो |
लाज नाही मला कोणी काही म्हणा | निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही |
लेकी बोले सुने लागे | एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे |
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण | लोकांना उपदेश करायचा पण स्वता मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही |
वळणाचे पाणी वळणावर जाणे | निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार |
वरातीमागून घोडे | योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे |
वारा पाहून पाठ फिरविणे | परिस्थिती पाहून वर्तन करणे |
वाहत्या गंगेत हात हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे | सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे |
वासरात लंगडी गाय शहाणी | मूर्ख माणसा अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ असतो |
वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच | वाईट व्यक्तीला चांगली म्हंटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच |
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर | गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे |
विशी विद्या तिशी धन | योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो |
विचाराची तूट तेथे भाषणाला उत | मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते |
विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी | विश्वासघात करणे |
तितका संताप | कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असणे |
शहाण्याला शब्दाचा मार | शहाण्या माणसाला त्याच्या चुकी बाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते |
शितावरून भाताची परीक्षा | वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती |
शेरास सव्वाशेर | चोरावर मोर एकाला दुसरा वरचढ भेटणे |
शेजी देईल काय आणि मन धायेल काय ? | शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही |
शेजीबाईची कढी, धावधाव वाढी | एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे |
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी | चांगल्या च्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात |
सगळेच मुसळ केरात | मुख्य महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे |
सरड्याची धाव कुंपणापर्यंतच | प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते |
समर्थाघरचे श्वान त्याला सर्व देती मान | मोठा च्या घरच्या शूद्रालाही मान द्यावा लागतो |
संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात | एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे |
संग तसा रंग | संगती प्रमाणे वर्तन असणे |
सारा गांव मामाचा एक नाही कामाचा | जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे |
साप साप म्हणून भुई धोपटणे | संकट नसताना त्याचा अभ्यास निर्माण करणे |
सात हात लाकुड नऊ हात ढलपी | एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे |
सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी | एकदम अशक्य कोटीतील गोष्ट करणे |
सुरुवातीलाच माशी शिंकली | आरंभालाच अपशकून |
सुंभ जळाला तरी पीळ जात नाही | वैभव गेले तरी ताठा जात नाही |
स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे | वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही |
हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते | आजार, संकटे येतात ती लवकर आणि मोठ्या प्रमाणावर येतात पण कमी होताना हळूहळू कमी होतात |
हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांच्या पावसाळा | खोटे अश्रू ढाळणे |
हत्तीच्या दाढे मध्ये मिऱ्याचा दाणा | मोठ्या उपायांची गरज असताना अतिशय छोटे उपाय करावे |
हत्ती गेला पण शेपूट राहिले | कामाच्या बहुतेक भाग पूर्ण झालं आणि फक्त थोडे शिल्लक राहिला |
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र | परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसर्याला देणे स्वतःला झीज लागू न देणे |
हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते | जेथे भलेभले हात टेकतात तेथे लहान बडेजाव दाखवितात |
हात ओला तर मित्र भला | म्हणजेच तुमच्या पासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात |
हात फिरे तिथे लक्ष्मी वसे | उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते |
हातच्या काकणाला आरसा कशाला | स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको |
हाजिर तो वजीर | जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो |
हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे | जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातली सोडण्याची पाळी येणे |
हिरा तो हिरा गार तो गार | गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत |
हिऱ्या पोटी गारगोटी | चांगल्या च्या पोटी नाठाळ |
होळी जळाली आणि थंडी पळाली | होळीनंतर थंडी कमी होते |
श्रीच्या मागोमाग ग येतो | संपत्तीबरोबर गर्व येतो |
Online Admission
Translate
Tuesday, December 3, 2019
मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ
Tags
# Mhani | म्हणी
# मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ
About Padvi
मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment