Current affairs | Evening News Marathi
Current affairs 29 November Marathi |
29 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
वैश्विक मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019
सिडनीच्या लोवी इंस्टीट्यूट या संस्थेनी नुकताच ‘वैश्विक मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019’ (Diplomacy Index) प्रसिद्ध केला आहे. या यादीत 61 देशांना क्रम दिला आहे.
यादीत भारत 12 व्या क्रमांकावर आहे. 2019 साली भारताचे जागतिक पातळीवर 123 दूतावास आणि उच्च आयोग आणि 54 वाणिज्य दूतावास आहेत.
अन्य ठळक बाबी
- वर्ष 2019 मध्ये, चीनचे जगात 276 दूतावास आणि वाणिज्य दूतावास असून हा देश या यादीत प्रथम स्थानी आहे तर द्वितीय क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत तीन दूतावास कमी आहेत.
- या देशांच्या पाठोपाठ पहिल्या पाचमध्ये फ्रान्स, जापान आणि रशिया यांचा क्रमांक लागला आहे.
- तैवानच्या मुत्सद्दी पदांमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे, जी 2016 सालाच्या 22 दूतावासांवरून यावर्षी 15 वर आहे.
भारतीय खाद्यान्न महामंडळाचे अधिकृत भांडवल वाढविण्यात आले
27 नोव्हेंबर 2019 रोजी अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय खाद्यान्न महामंडळाचे (FCI) अधिकृत भांडवल विद्यमान 3500 कोटी रुपयांवरून 10 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
हे भांडवल भारतीय खाद्यान्न महामंडळाकडे (FCI) असणार्या अन्नधान्याच्या साठ्यामध्ये वृद्धी करण्यासाठी वापरले जाणार आहे. यासाठी लागणारा निधी केंद्रीय अर्थसंकल्पातून पुरविला जाणार आहे.
या गुंतवणुकीमुळे FCI वर असलेले कर्ज कमी होण्यास मदत होणार, ज्यामुळे त्याचा व्याज खर्च वाचणार आणि परिणामी अन्नधान्यावरील अनुदान कमी होणार.
FCI विषयी
भारतीय खाद्यान्न महामंडळ (FCI) याची स्थापना सन 1965 मध्ये झाली. सरकारचे खाद्यान्न धोरण राबवविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘खाद्यान्न महामंडळ कायदा-2019’ अंतर्गत महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
No comments:
Post a Comment