Current affairs | Evening News Marathi
Current affairs 27 November Marathi |
27 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
छत्तीसगडचे गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान ‘व्याघ्र प्रकल्प’ घोषित करण्याचा निर्णय
छत्तीसगड राज्य सरकारने कोरीया जिल्ह्यातल्या गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यानाला राज्यातला चौथा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात आधीच तीन व्याघ्र प्रकल्प आहेत, ते म्हणजे - उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प, इंद्रावती व्याघ्र प्रकल्प व अचानकमार व्याघ्र प्रकल्प.
बैठकीत याव्यतिरिक्त लेमरू हत्ती संरक्षण प्रकल्प तयार करण्याचा निर्णय देखील घेतला गेला. या प्रकल्पात कटघोरा, कोरबा, रायगड आणि सुरगुजा जिल्ह्यातला वन प्रदेश आणि कोरबाचा धरमजीगड व सुरगुजा वनविभाग हा भूप्रदेश एकत्र केला जाणार आहे.
काही तथ्ये
- 'अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल 2018' याच्यानुसार, देशात 2,967 वाघ आहेत. आजच्या घडीला जागतिक पातळीवर तीन चतुर्थांश वाघांचा अधिवास भारतात आहे.
- 2006 सालाच्या व्याघ्रगणनेनुसार देशभरात 1,411 वाघ आढळून आले होते. 2010नुसार 1,706 वाघ होते. त्यात वाघांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ होत 2014 साली 2,226 वाघ आढळून आले होते. आता वाघांची संख्या वाढून ती सुमारे 2500 ते 2600 वर पोहचल्याची माहिती आहे.
- वाघांच्या संख्येनुसार पहिल्या तीन राज्यात अनुक्रमे कर्नाटक, उत्तराखंड व मध्यप्रदेशचा समावेश आहे.
भारतातली व्याघ्र प्रकल्पे
- बांदीपूर, कर्नाटक
- कॉर्बेट, उत्तराखंड
- कान्हा, मध्यप्रदेश
- मानस, आसाम
- मेळघाट, महाराष्ट्र
- पलमाऊ, झारखंड
- रणथंबोर, राजस्थान
- सिमिलीपाल, ओडिशा
- सुंदरबन्स, पश्चिम बंगाल
- पेरियार, केरळ
- सरिस्का, राजस्थान
- बक्सा, पश्चिम बंगाल
- इंद्रावती, छत्तीसगड
- नामदाफा, अरुणाचल प्रदेश
- दुधवा, उत्तरप्रदेश
- कलकड-मुंडनथुरै, तामिळनाडू
- वाल्मिकी, बिहार
- पेंच, मध्यप्रदेश
- ताडोबा-अंधारी, महाराष्ट्र
- बांधवगड, मध्यप्रदेश
- पन्ना, मध्यप्रदेश
- दंपा, मिझोरम
- भद्रा, कर्नाटक
- पेंच, महाराष्ट्र
- पक्के किंवा पाखूई, अरुणाचल प्रदेश
- नामेरी, आसाम
- सातपुडा, मध्यप्रदेश
- अण्णामलाई, तामिळनाडू
- उदंती-सीतानदी, छत्तीसगड
- सतकोसिया, ओडिशा
- काझीरंगा, आसाम
- अचानकमार, छत्तीसगड
- दांडेली-अंशी (काली), कर्नाटक
- संजय-दुबरी, मध्यप्रदेश
- मुदुमलाई, तामिळनाडू
- नागरहोले, कर्नाटक
- परमबीकुलम, केरळ
- सह्याद्री, महाराष्ट्र
- बिलीगिरी रंगनाथ मंदिर, कर्नाटक
- कावळ, तेलंगणा
- सत्यमंगलम, तामिळनाडू
- मुकंद्रा हिल्स, राजस्थान
- नवेगाव-नागझिरा, महाराष्ट्र
- नागार्जुनसागर श्रीशैलम, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा
- अमराबाद, तेलंगणा
- पिलीभीत, उत्तरप्रदेश
- बोर, महाराष्ट्र
- राजाजी, उत्तराखंड
- ओरंग, आसाम
- कमलांग, अरुणाचल प्रदेश
भारताचा संविधान दिन : 26 नोव्हेंबर
दरवर्षी 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन / राज्यघटना दिन) भारतभर साजरा केला जातो. यावर्षी भारत 70 वे वर्ष साजरे करीत आहे.
इतिहास
दि. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली आणि अंतिम मसुदा दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने स्वीकारला. या संविधनाचे राष्ट्रार्पण दि. 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आले. दि. 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारने एका अधिसूचनेद्वारे 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून घोषित केले. त्याआधी, 1979 सालापर्यंत हा दिन ‘राष्ट्रीय विधी दिन’ म्हणून पाळला जात होता.
संविधानाविषयी
भारत हा सरकारच्या एक संसदीय प्रणाली सह एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे. संविधानानुसार भारत कायद्यात निर्दिष्ट नियमांच्या हद्दीत कामकाज करणारा शासित देश ठरलेला आहे.
संसदीय लोकशाही, संघराज्यीय पद्धत, मुलभूत हक्क व त्यासाठी (न्यायालयीन यंत्रणा), मार्गदर्शक तत्त्वे, केंद्र राज्य संबंध, घटना दुरुस्ती ही संविधानातली प्रमुख अंगे आहेत. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक घडविण्याचा व सर्व नागरिकांस समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण देते.
- भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळांचे संविधानात्मक प्रमुख आहेत.
- भारतात संविधानाची अंमलबजावणी दोन घटकांमधून केली जाते: पहिले राजकारणी द्वारे चालवली जाणारी सभागृहे आणि दुसरे म्हणजे कायदा न्यायप्रणाली (भारतीय न्यायालये).
- भारतीय संविधान सार्वभौम राष्ट्रासाठीचे जगातले सर्वात प्रदीर्घ संविधान आहे.
- ‘अलबामा’ देशाच्या संविधानानंतर, भारतीय संविधान 1,45,000 शब्दांसह जगातले दुसरे सर्वात प्रदीर्घ सक्रिय संविधान आहे.
- संविधानाच्या अंमलबजावणीच्या वेळी, संविधानात 22 भागात 395 कलम आणि 8 अनुसूची होते. आज संविधानात प्रस्तावना आणि 25 भागात 448 कलम आणि 12 अनुसूची व 5 परिच्छेद आहेत. संविधानात आतापर्यंत 103 वेळा दुरूस्ती झाली.
- संविधानाचे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत हस्तलिखीत आहे. प्रेम बिहारी नाराइन राईजदा यांच्या सुंदर हस्ताक्षराने लिहिले गेले आणि त्यामधील कलाकृती नंदलाल बोस आणि इतर कलाकार यांच्याकडून केली गेली.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment