Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, November 24, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 24 November Marathi | 24 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 24 November  Marathi |
       24 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स






    नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN) - ‘भारतनेट प्रकल्प

    मार्च 2020 पर्यंत दोन लक्ष ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 1 लक्ष 28 हजार ग्रामपंचायती या सेवांनी सज्ज आहेत.
    ठळक बाबी
    • आतापर्यंत 45,000 ग्रामपंचायतींमध्ये वाय-फाय हॉटस्पॉट प्रस्थापित करण्यात आले आहेत.
    • सध्या, 16 हजार पंचायतींना सेवा पुरविली जात आहे.
    • प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2017 मध्ये पूर्ण झाला ज्याने एक लक्ष ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड जोडणी दिली गेली. द्वितीय टप्प्यात उर्वरित ग्रामपंचायती जोडण्यात येत आहेत.
    प्रकल्पाविषयी
    नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN) - ‘भारतनेट’ या प्रकल्पाच्या माध्यमातून देशातल्या सर्व 2 लक्ष 50 हजार ग्रामपंचायतींना जोडले जात आहे आणि सर्व ग्रामपंचायतींना किमान 2 Mbps ते 20 Mbps गतीसह इंटरनेट सेवा प्रदान केली जाणार आहे.
    हा प्रकल्प भारत सरकारच्या महत्वाकांक्षी डिजिटल भारत कार्यक्रमाचा एक भाग आहे. देशाला डिजिटल रूपाने ज्ञानसंपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये बदलणे हा याचा हेतू आहे.
    • सन 2011 मध्ये प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला होता. प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात 1 लक्ष ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्कवर ब्राडबॅंड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
    • BSNL, रेलटेल आणि पॉवर ग्रीड या तीन सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या संयुक्तपणे हा प्रकल्प राबवावीत आहे.
    • या प्रकल्पाला युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) कडून निधी मिळालेला आहे.
    • इंटरनेट सेवा देण्यासाठी एकच ऑप्टिकल फायबर केबलचा वापर करण्यासाठी गिगाबिट पॅसिव्ह ऑप्टिकल नेटवर्क तंत्रज्ञान वापरले जाते.




    लेफ्टनंट शिवांगी: भारतीय नौदलातली पहिली महिला वैमानिक

    4 डिसेंबर या नौदल दिनाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार आहेत. त्यासोबतच, त्या भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार्‍या पहिल्या महिला वैमानिक ठरणार.
    शिवांगी या मुळच्या बिहारमधील मुझफ्फरपूरच्या आहेत. भारतीय नौदलाकडून घेण्यात आलेल्या 27 NOC अभ्यासक्रमामध्ये त्यांनी एझिमाला इथल्या नौदल अकादमीत प्रशिक्षण घेतले. ज्यानंतर 2018 साली जून महिन्यात वाईस अॅडमिरल ए. के. चावला यांच्याकडून त्यांना नौदलात सामावून घेण्यात आले.
    सध्या भारतीय नौदलाच्या साऊथर्न नेव्हल कमांड येथे प्रशिक्षणार्थी म्हणून शिवांगी कार्यरत आहेत. त्यांना 2 डिसेंबर 2019 रोजी सागरीक्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ‘डॉर्नियर’ विमानाच्या उड्डाणाची अधिकृत परवानगी मिळणार.
    भारतीय नौदलातल्या एव्हिएशन विभागात हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) विभागात अधिकाऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश असतो. 'ऑब्जर्व्हर' म्हणून रुजू असणाऱ्या या महिला अधिकारी या काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी जबाबदार असतात.
    भारतीय नौदलाविषयी
    भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
    छत्रपती राजा शिवाजी भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते. ‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली. त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.
    1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.



    No comments:

    Post a Comment