Current affairs | Evening News Marathi
Current affairs 28 September Marathi |
28 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
इराक भारताचा मुख्य तेल पुरवठादार देश
भारत सरकारच्या वाणिज्यिक गुप्तचर व सांख्यिकी महासंचालनालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत संयुक्त राज्ये अमेरिका या देशाकडून होणार्या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये 72 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
सध्या इराक, सौदी अरब, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) हे भारताचे मुख्य कच्चे तेल पुरवठादार देश आहेत. पश्चिम आशियातल्या या पारंपारिक पुरवठादारांच्या पलीकडेही तेलाच्या खरेदीत विविधता आणण्याची योजना भारताने आखलेली असून आता अमेरिकेकडूनही तेलाची आयात केली जात आहे.
अन्य ठळक बाबी
- एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अमेरिका या देशांनी सुमारे 4.5 दशलक्ष टन कच्चे तेलाचा पुरवठा भारताला केला.
- इराक हा देशाची कच्च्या तेलाची आवश्यकतेच्या जवळजवळ एक चतुर्थांश भाग पूर्ण करतो आणि तो देश भारताला तेल पुरवठा करणारा मुख्य देश आहे. इराकने एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारताला 21.24 दशलक्ष टन वजनी तेलाची विक्री केली.
- एप्रिल-ऑगस्ट 2019 या कालावधीत भारताने 91.24 दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केली, जेव्हा की गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण 93.91 दशलक्ष टन एवढे होते.
- सौदी अरब हा देश पारंपारिकपणे भारताचा तेलासाठीचा सर्वोच्च स्रोत राहिला आहे, परंतु 2017-18 मध्ये त्याची जागा प्रथमच इराकने घेतली. सौदी अरब कडून भारताला 17.74 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा झाला.
- अमेरिकेने मे महिन्यात आर्थिक निर्बंध घातल्यामुळे भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात करणे थांबविलेले असून तेथून केवळ 2 दशलक्ष टन तेलाचीच आयात केली गेली.
- नायजेरियाने इराणची जागा घेत भारताकडे तेल पुरवठा करणार्या देशांमध्ये तिसरे स्थान मिळविले. एप्रिल-ऑगस्टमध्ये त्याने 7.17 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला. त्यापाठोपाठ UAE (6.4 दशलक्ष टन) आणि व्हेनेझुएला (6.17 दशलक्ष टन) या देशांचा क्रम लागतो.
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत: चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे (COSC) नवे अध्यक्ष
भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी 27 सप्टेंबर 2019 रोजी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात चीफ ऑफ स्टाफ कमिटी (COSC) या विभागाच्या अध्यक्ष पदाचा औपचारिक भार स्वीकारला.
एअर चीफ मार्शल बीरेंदर सिंग धनोआ ह्यांच्या जागेवर जनरल रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनरल रावत सेवानिवृत्त झाल्यावर यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत हे पद सांभाळणार.
जनरल बिपिन रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य दलात नियुक्त झाले. नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA) येथून शिक्षण घेतल्यानंतर त्यांची सैन्याच्या 11 गोरखा रायफल्स या तुकडीत नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याकडे भूमीवरील संघर्ष आणि मुद्द्यांबाबत उपक्रमांचा प्रचंड अनुभव आहे.
चीफ ऑफ स्टाफ कमिटी (COSC)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जाहीर केले होते की, देशासाठी एक संरक्षण प्रमुख म्हणजेच ‘चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’ (CDS) असणार. देशाच्या हवाई, पायदळ, नौदल, तटरक्षक, सीमा पोलीस अश्या सर्व सुरक्षा दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी हे पद निर्माण करण्याची योजना आहे.
चीफ ऑफ स्टाफ कमिटी (COSC) याचे अध्यक्ष हे पद तीनही दल प्रमुखांमध्ये प्रथम मानले जाणार आणि हे ‘प्राइमस इंटर पेरेस’ किंवा सर्वप्रथम बरोबरीचे स्थान गृहीत धरले जाते.

No comments:
Post a Comment