Current affairs | Evening News Marathi
Current affairs 24 September Marathi |
24 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
178 वर्ष जुनी ‘थॉमस कुक’ ही ब्रिटिश प्रवासी कंपनी बंद पडली
ब्रिटनची 178 वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक आपला व्यवसाय बंद करत आहे, अशी घोषण कंपनीने केली आहे. आर्थिक संकटात सापडल्यामुळे कंपनीने सध्या व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सर्व हॉलिडे, फ्लाईट बुकिंग रद्द केले आहेत. व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी 25 कोटी अमेरिकी डॉलरची गरज आहे.
थॉमस कुक कंपनी अचानक बंद होणार असल्याने जगभरात फिरायला गेलेले जवळपास 1.50 लक्ष लोक जिथे-तिथे अडकले आहेत. याशिवाय जगभरातली 22 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. यामध्ये 9 हजार कर्मचारी ब्रिटनमधील आहेत.
थॉमस कुकची सन 1841 मध्ये स्थापना झाली. 1855 साली कंपनीने पहिली ऐसी ऑपरेटर सुविधा प्रवाशांसाठी सुरु केली, जी ब्रिटिश प्रवाशांना एस्कॉर्ट ट्रिपवर युरोपीयन देशात घेऊन जात होती. त्यानंतर 1866 साली कंपनीने अमेरिका ट्रिप आणि 1872 साली संपूर्ण जगात कंपनीने आपली सेवा सुरु केली.
कारगिल टू कोहिमा (K2K) अल्ट्रा मॅरेथॉन- “ग्लोरी रन”
21 सप्टेंबर 2019 रोजी कारगिल टू कोहिमा (K2K) अल्ट्रा मॅरेथॉन- “ग्लोरी रन” या अत्यधिक कठीण मोहिमेला सुरुवात झाली. ही 25 सैनिकांच्या एका चमूची शर्यत आहे जे 45 दिवसांमध्ये 4500 किलोमीटरपेक्षा जास्तचे अंतर कापतील.
कारगिल युद्धाचे 20वे वर्ष साजरे करण्यासाठी ही मोहीम भारतीय हवाई दलाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम कारगिल वॉर मेमोरियल, द्रास (जम्मू व काश्मीर) येथे सुरू झाली आणि ती कोहिमा (नागालँड) येथे संपणार.
कोहिमा आणि कारगिल हे पूर्व आणि उत्तरेकडील भारतीय चौकी आहेत जिथे अनुक्रमे 1944 आणि 1999 साली दोन लढाया लढल्या गेल्या. लद्दाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि नागालँड अशा विविध भागांमधून चमुचा प्रवास होणार आहे.
No comments:
Post a Comment