Current affairs | Evening News Marathi
Current affairs 16 September Marathi |
16 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
डिजिटल सामाजिक माध्यमांच्या खात्यांना केंद्रीय डेटाबेसशी जोडण्याची सरकारची योजना
डिजिटल सामाजिक माध्यमांच्या खात्यांना केंद्रीय डेटाबेस म्हणजेच नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) याच्याशी जोडण्यासाठी तयार करण्याची भारत सरकारची योजना आहे.
नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) यावर खात्यांची संपूर्ण माहिती इमिग्रेशन एंट्री, बँकिंग आणि फोन क्रमांक अश्या विविध बाबींविषयीची माहिती संकलित केली जाणार.
NATGRID बाबत
नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) या प्रकल्पाची सुरूवात 2009 साली करण्यात आली. दूरसंचार, करासंबंधी अहवाल, बँक, इमिग्रेशन यासारख्या 21 संघांच्या 10 कार्यालयांकडून या व्यासपीठावर माहिती गोळा केली जाते. गुप्तचर विभाग (IB), रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (R&AW) यासारख्या सुमारे 10 केंद्रीय संस्था त्यामधली साठविलेली माहिती सुरक्षित मार्गाने प्राप्त करतात.
ग्लोबल AMR R&D हब या गटात भारत सामील
ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हब यामध्ये 12 सप्टेंबर 2019 रोजी भारत सामील झाला. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातल्या जैवतंत्रज्ञान विभागाने यासंबंधी घोषणा केली.
जगापुढे असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि जागतिक पातळीवर सहयोगासाठी कार्यरत असलेल्या या भागीदारीत आता 16 सदस्य देश, युरोपियन कमिशन, दोन स्वयंसेवी फाऊंडेशन आणि चार आंतरराष्ट्रीय संस्था (निरीक्षक म्हणून) आहेत.
ग्लोबल AMR R&D हब
मे 2018 मध्ये ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हबची स्थापना करण्यात आली. वैश्विक जिवाणूरोधी प्रतिकारक क्षमतेसंबंधी संशोधन व विकासामध्ये आंतर-क्षेत्रीय सहयोगामधली तफावत, संभाव्यता ओळखून त्यासाठी संसाधनांच्या वाटपासंबंधी वैश्विक प्राधान्यकृत व्यवस्था आणि पुराव्यावर आधारित निर्णयाला हा आंतरराष्ट्रीय गट समर्थन देतो.
या गटाच्या कार्यांना बर्लिनमध्ये स्थापित केलेल्या सचिवालयातून आणि सध्या जर्मनीच्या फेडरल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च (BMBF) आणि फेडरल मिनिस्ट्री ऑफ हेल्थ (BMG) कडून वित्तपुरवठा केला जात आहे.
औषधांच्या विरोधात जिवाणूंची वाढती प्रतिरोधक क्षमता हा आज वैश्विक मुद्दा बनलेला आहे. त्यामुळे औषधांच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत.
No comments:
Post a Comment