Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, August 20, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 20 August Marathi |    20 ऑगस्ट 2019 करेंट अफेयर्स मराठी प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचे निधन

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 20 August Marathi | 
      20 ऑगस्ट 2019 करेंट अफेयर्स मराठी

    प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचे निधन


    ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे 19 ऑगस्ट 2019 रोजी मुंबईत निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी हे खय्याम ह्यांचे पूर्ण नाव होते.


    बालपणापासूनच संगीत साधना करणाऱ्या खय्याम यांनी वयाच्या सतराव्या वर्षी पंजाबमध्ये लुधियाना शहरातून संगीत क्षेत्रातल्या कारकीर्दीला सुरुवात केली. कभी-कभी, उमराव जान, नूरी, रझिया सुलतान, बाजार यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी अविस्मरणीय संगीत दिले.


    सन 1953 ते सन 1990 या कालावधीत त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. 1953 साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण 1961 साली 'शोला और शबनम' या सिनेमाला दिलेल्या संगीतामुळे खय्याम यांना संगीतकार म्हणून एक नवी ओळख मिळाली. आपल्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारही देण्यात आले आहेत. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. 2010 साली खय्याम यांना संगीतक्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी 'फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार' देण्यात आला.


    No comments:

    Post a Comment