Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 12 August Marathi | 12 ऑगस्ट 2019 करेंट अफेयर्स मराठी
राफेल नदालने पाचव्यांदा रॉजर्स चषक टेनिस स्पर्धा जिंकली
स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल ह्याने ‘रॉजर्स चषक 2019’ ही स्पर्धा जिंकली.
स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराच्या अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव केला. या विजयासह त्याने आपले पाचवे रॉजर्स चषक जिंकले.
रॉजर्स चषक विषयी
रॉजर्स चषक (किंवा कॅनेडियन ओपन / कॅनडा मास्टर्स) ही कॅनडामध्ये आयोजित केली जाणारी वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. सर्व टेनिस खेळाच्या जगतातली तिसरी जुनी स्पर्धा आहे. हार्ड कोर्टवर ही स्पर्धा खेळली जाते.
मॉन्ट्रियल आणि टोरोंटो या शहरांमध्ये दरवर्षी आळीपाळीने आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. 1980 सालापासून विषम क्रमात असलेल्या वर्षी पुरूषांसाठीची स्पर्धा मॉन्ट्रियल येथे आयोजित केली जाते, तर त्याउलट महिलांसाठीची स्पर्धा टोरोंटो येथे सम क्रमात खेळवली जाते.
BCCI राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या (NADA) कक्षेत आली
केंद्र सरकारच्या वाढत्या दडपणामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय क्रिडा संघटनेचा दर्जा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे ते आता राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या (NADA) कक्षेत येणार.
केंद्रीय क्रिडा सचिव राधेश्याम झुलानिया, NADAचे महासंचालक नवीन अग्रवाल, BCCIचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जरी मंडळास आर्थिक स्वायत्तता असली तरी अन्य क्रिडा संघटनांप्रमाणेच BCCI ही राष्ट्रीय क्रिडा महासंघाच्या कार्यकक्षेत येणार आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत त्यांची माहिती घेण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
विविध खेळाडूंच्या ठावठिकाणांबाबत वेळोवेळी BCCIला NADA संस्थेकडे माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती न देणाऱ्या खेळाडूंवर NADA संस्थेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीने (WADA) ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याच्या उद्देशाने, आत्तापर्यंत स्वीडन येथे असलेली आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी व्यवस्थापन (International Dope Testing Management -IDTM) ही संस्था क्रिकेटपटूंचे नमुने गोळा करून ते राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी प्रयोगशाळेत (NDTL) जमा करीत आहे. IDTM ही BCCIने नमुने घेण्यासाठी नेमलेली बाह्य-संस्था होती.
BCCI बाबत
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) याची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत 1928 साली एक संस्था म्हणून स्थापना झाली. त्याचे मुख्यालय मुंबई या शहरात आहे. ही भारतातल्या क्रिकेटसाठी असलेली राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. हा राज्य क्रिकेट संघांचा एक महासंघ आहे.
NADA बाबत
राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समिती (NADA) ही एक राष्ट्रीय संस्था आहे, जी भारतात सर्व प्रकाराच्या क्रिडा क्षेत्रात उत्तेजक द्रव्यांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी समन्वय व नियंत्रण राखण्यासाठी जबाबदार आहे. WADAच्या नियमांनुसार उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करणे हे प्राथमिक उद्दीष्ट आहे. त्याची स्थापना 24 नोव्हेंबर 2005 रोजी केली गेली.
WADA बाबत
जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समिती (WADA) ही आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) कडून स्थापना करण्यात आलेली संस्था आहे, ज्याचे मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे असून क्रिडा क्षेत्रात घडणार्या उत्तेजक द्रव्यांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी समन्वय व नियंत्रण राखते. त्याची स्थापना 10 नोव्हेंबर 1999 रोजी डिक पाउंड आणि त्याचे विद्यमान अध्यक्ष क्रेग रीडे यांनी केली.

No comments:
Post a Comment