Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 August Marathi |
11 ऑगस्ट 2019 करेंट अफेयर्स मराठी
लिओनेल मेस्सी: 2018-19 सालासाठी UEFAच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड'चा विजेता
बार्सिलोना फूटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा 2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता ठरला.
2015 आणि 2016 सालीही मेस्सीने हे विशेष पारितोषिक जिंकले होते. गेल्या पाच हंगामात हा पुरस्कार मिळविण्याची ही तिसरी वेळ आहे. त्याने त्याचा प्रतिस्पर्धी क्रिस्टियानो रोनाल्डोला पराभूत केले.
युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) ही युरोपमधली संघ फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रिडाप्रकारांचे प्रशासकीय मंडळ आहे. त्याचे अनेक सदस्य देश प्रामुख्याने किंवा संपूर्णपणे आशियामध्ये देखील आहेत. मंडळामध्ये 55 राष्ट्रीय संघ सदस्य आहेत. त्याची स्थापना 15 जून 1954 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्यॉन (स्वित्झर्लंड) येथे आहे.
युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत जगात भारत चौथा देश: CREDAI व CBRE
भारताची कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) आणि अमेरीकेच्या CBRE या संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालाच्या मते, स्टार्टअप उद्योगांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात तिसर्या क्रमांकाचे गंतव्यस्थान आहे तसेच युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाचा देश आहे.
युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत सध्या अमेरीका हा देश प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ ब्रिटन आणि चीनचा क्रम लागतो.
2018 साली भारतात आठ युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार झाले आहेत, ज्यात झोमाटो, ओयो, बायजूज, पेटीएम मॉल, उडान आणि स्विगी या कंपन्यांचा समावेश आहे.

No comments:
Post a Comment