Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, July 18, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 18 April 2019 Marathi | 18 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 18 April 2019 Marathi |   
    18 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी


    ADBने भारताचा GDP वृद्धीदराचा अंदाज 7% एवढा कमी केला

    दक्षिण आशियाई क्षेत्राचा विकास दर भक्कम राहणार असून तो 2019 साली 6.6% तर 2020 साली 6.7% असेल असा अंदाज आशियाई विकास बँकेनी (ADB) केला आहे.
    तसेच चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल स्थानिक उत्पन्नाच्या वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवर वर्तवला आहे. तर 2020 या वर्षात हा 7.2% असण्याचा अंदाज बांधला आहे.
    दक्षिण आशियाई क्षेत्रासाठी 2019 या वर्षात विकास दर 6.6% आणि 2020 या वर्षी 6.7% असेल असा अंदाज आहे.
    सकल स्थानिक उत्पन्न (GDP) म्हणजे काय?
    सकल स्थानिक उत्पन्न (Gross domestic product -GDP) हे सर्वसाधारणपणे वर्षभरात उत्पादित केल्या गेलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाचे आर्थिक मोजमाप आहे. GDPला "राष्ट्रीय विकास आणि प्रगतीसाठीचे जगातले सर्वात शक्तिशाली सांख्यिकीय निर्देशक" मानले जाते.
    विलियम पेटी या ब्रिटिश अर्थशास्त्रीने सन 1654-1676 या काळात पहिल्यांदा GDP ची मूलभूत संकल्पना मांडली. पुढे 1695 साली चार्ल्स डेव्हनंट ह्यांनी त्यासंबंधी पद्धती विकसित केली. सन 1934 मध्ये अमेरिकेच्या सायमन कुझनेट्स ह्यांनी GDPची आधुनिक संकल्पना प्रथमताः विकसित केली. नंतर ब्रेटन वुड्स परिषद-1944 मध्ये देशाची अर्थव्यवस्था मोजण्यासाठी GDP ला मुख्य साधन बनविले गेले.
    आशियाई विकास बँक (ADB)
    ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली. मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे. “फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. याचे 67 देश सदस्य आहेत.


    इनक्रेडिबल इंडिया’ अभियानाने PATA गोल्ड अवॉर्ड 2019 जिंकला

    देशभरातल्या पर्यटनासंबंधी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या "फाइंड द इनक्रेडिबल यू" अभियानाने ‘पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (PATA) गोल्ड अवॉर्ड 2019 हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकला.
    "मार्केटींग – प्रायमरी गवर्नमेंट डेस्टीनेशन" श्रेणीच्या अंतर्गत हा पुरस्कार दिला गेला आहे.
    देशभरात आणि विश्वात भारतीय वारसा पर्यटनाच्यादृष्टीने प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने 2002 साली अधिकृतपणे "इनक्रेडिबल इंडिया" या ब्रॅंडखाली एक आंतरराष्ट्रीय उपक्रम सुरू केला. मोहिमांना पुढील स्तरावर नेण्यासाठी, 'इनक्रेडिबल इंडिया 2.0' मोहिम सप्टेंबर 2017 मध्ये सुरू करण्यात आली. या मोहिमेचा भाग म्हणून, मंत्रालयाद्वारे योग, कल्याण, लक्झरी, पाककृती आणि वन्यजीवन यावर पाच नवीन दूरदर्शन जाहिराती तयार करण्यात आल्या, ज्याचे प्रसारण दूरदर्शन आणि सोशल मिडीयावर केले गेले.

    No comments:

    Post a Comment