एका ओळीत सारांश, 20 जून 2019
दिनविशेष
जागतिक सिकल सेल दिन – 19 जून.
पर्यावरण
भारताने पुढच्या 42 महिन्यांमध्ये या पाच राज्यांमधले नष्ट झालेले वनक्षेत्र पुनर्संचयित करण्यासाठी प्रायोगिक प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली - हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, नागालँड आणि कर्नाटक.
आंतरराष्ट्रीय
संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'द वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019: हायलाइट्स' अहवालानुसार, चीनला मागे टाकून हा देश केवळ आठ वर्षांमध्ये जगातली सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनणार - भारत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'द वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019: हायलाइट्स' अहवालानुसार, 2050 सालापर्यंत जगाची लोकसंख्या दोन दशलक्षने वाढून ती 7.7 अब्जवरून एवढी होणार - 9.7 अब्ज.
फेसबुकची नवी क्रिप्टोकरेंसी - लिब्रा.
ईशान्य भारतात सक्रिय असलेल्या विद्रोही गटांच्या सीमेवरील शिबिरांना नष्ट करण्यासाठी भारत आणि म्यानमार या देशांची संयुक्त मोहीम - ऑपरेशन सनराइझ.
राष्ट्रीय
या शहरात भारतातली पहिली रीजनल रॅपिड ट्रांझिट सिस्टम (RRTS) उभारली जात आहे - दिल्ली.
ही वाहने चालविण्यासाठीची किमान शैक्षणिक पात्रतेची गरज बाद करण्याचा केंद्रीय भुपृष्ठ व महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला - मालवाहतूकीची वाहने.
व्यक्ती विशेष
17 व्या लोकसभेचे नवे सभापती - ओम बिर्ला.
क्रिडा
इतिहासातले चौथ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान शतक नोंदविणारा खेळाडू - इयॉन मॉर्गन(इंग्लंड).
राज्य विशेष
महाराष्ट्र सरकारची नवीन योजना, जी पुढील पाच वर्षांत 10 लक्ष नोकर्या तयार करणार - सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम.
जून 2019 मध्ये नागरिकांना राज्यभरात विविध पद्धतीने प्रवास करण्यास सक्षम करणारे क्विक रिस्पॉन्स (QR) कोड आधारित कॉमन मोबिलिटी कार्ड सादर करण्याची योजना तयार करणारे राज्य सरकार – तेलंगणा.
सामान्य ज्ञान
म्यानमार – राजधानी: नेपिडो; राष्ट्रीय चलन: क्याट.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना वर्ष: सन 1935; मुख्यालय: मुंबई (महाराष्ट्र).
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले भारतीय गव्हर्नर - सर सी॰ डी॰ देशमुख (1943-1949).
महाराष्ट्र राज्याची राजधानी – मुंबई.
संयुक्त राष्ट्रसंघ (UN) - स्थापना वर्ष: सन 1945; मुख्यालय: न्यूयॉर्क (अमेरीका).
No comments:
Post a Comment