Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, April 2, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 2 April 2019 Marathi | 2 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 2 April 2019 Marathi |   
    एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी


    30 मार्चला जगभरात 'अर्थ अवर' पाळण्यात आला

    वातावरण बदलांविषयी जागतिक कृतीसाठी म्हणून जगभरातल्या विविध शहरांमध्ये 30 मार्च रोजी रात्री 8.30 वाजता 'अर्थ अवर' पाळण्यात आला. या दिनानिमित्त एका तासासाठी महत्त्वाच्या इमारतींचे दिवे मालवण्यात आले होते.
    यावर्षी ‘रिड्यूस, रियूज, चेंज ड वे व्युई लिव्ह’ ही या दिनाची संकल्पना आहे.
    दिनाचा इतिहास
    वीज वाचवण्यासाठी 'अर्थ अवर दिन' या नावाने एक अभियान सुरू केले गेले आहे. ‘वर्ल्डवाईड फंड फॉर नेचर’ या संस्थेतर्फे दरवर्षी ‘अर्थ अवर’चे आयोजन केले जाते.
    या दिनी लोकांना एक तास वीज बंद ठेवण्याचे आव्हान केले जाते. ठरविलेल्या कार्यक्रमानुसार रात्री 8.30 वाजता एक तास सगळ्यांनी लाइट्स बंद करायचे.
    2007 सालापासून हे अभियान चर्चेत आहे. सिडनीने एक तास सर्व लाइट बंद ठेवले होते. त्यानंतर जगभरातल्या 162 देशांमध्ये दिवे बंद केले गेले. 2017 साली 172 देशांनी या अभियानाचा स्वीकार केला.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 2 April 2019 Marathi |   
    एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी


    मार्च 2019 मध्ये GST महसूल संकलनाने 1 लक्ष कोटी रुपयांचा टप्पा गाठला

    दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत वस्तू व सेवा कर (GST) महसूल संकलन 1,06,577 कोटी रुपये इतके झाले. मार्च 2019 मध्ये GSTचे संकलन हे आतापर्यंतचे सर्वाधिक संकलन आहे.
    त्यामध्ये CGST 20,353 कोटी रुपये, SGST 27,520 कोटी रुपये, IGST 50,418 कोटी रुपये (आयातीवरील 23,521 कोटी रुपयांसह), तर उपकर 8,286 कोटी रुपये (आयातीवरील 819 कोटी रुपयांसह) समाविष्ट आहे.
    केंद्र सरकारला 47,614 कोटी रुपये आणि राज्य सरकारला 51,209 कोटी रुपये निव्वळ महसूल मिळाला आहे.
    वस्तू व सेवा कर (GST)
    हा एक एकछत्री अप्रत्यक्ष कर आहे, जो दिनांक 1 जुलै 2017 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आला, ज्याने केंद्र व राज्य सरकारांनी आकारलेल्या विविध करांचा त्याग केला. ‘संविधान (101 वी दुरूस्ती) कायदा-2017’ म्हणून GST सादर करण्यात आले. GST हे GST परिषदेद्वारे संचालित केले जाते आणि त्याचे अध्यक्ष भारताचे वित्तमंत्री आहेत. GST अंतर्गत वस्तू व सेवांवर 0%, 5%, 12%, 18% आणि 28% या दरांनी कर लागू आहेत. फ्रान्स हा GST ची अंमलबजावणी करणारा जगातला पहिला देश आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 2 April 2019 Marathi |   
    एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी


    रॉजर फेडररने चौथ्यांदा मियामी ओपन टेनिस स्पर्धा जिंकली

    स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर ह्याने जॉन इस्नरला पराभूत करीत ‘मियामी ओपन 2019’ या टेनिस स्पर्धेत पुरुष एकल गटाचे जेतेपद जिंकले. त्याने चौथ्यांदा मियामी ओपन स्पर्धेचा किताब मिळाला आहे.
    सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जिंकणार्‍या फेडररने आपल्या कारकीर्दीतले 101 वे जेतेपद जिंकले. तसेच त्याचे हे 50 वे ATP मास्टर्स जेतेपद ठरले.
    स्पर्धेच्या इतर गटाचे विजेते
    • महिला एकल - अॅशले बार्टी (ऑस्ट्रेलिया)
    • पुरुष दुहेरी - बी. ब्रायन आणि एम. ब्रायन (अमेरिका)
    • महिला दुहेरी - एलिस मॉर्टन्स (बेल्जियम) आणि आर्यना सबलेन्का (बेलारूस)
    स्पर्धेविषयी
    मियामी ओपन (मियामी मास्टर्स) ही अमेरिकेत खेळली जाणारी पुरुष आणि महिला यासाठीची वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. ही स्पर्धा पुरुष गटासाठी हंगामातील ATP वर्ल्ड टूर मास्टर्स 1000 दौरा आहे आणि महिला गटासाठी एक प्राथमिक अशी अनिवार्य स्पर्धा आहे. ही स्पर्धा पहिल्यांदा 1985 साली खेळण्यात आली.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 2 April 2019 Marathi |   
    एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी


    ISROने एमिसॅट आणि 28 नॅनो उपग्रह अवकाशात पाठवले

    ISROच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून PSLV सी-45 या अग्निबाणाचे दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी प्रक्षेपण करण्यात आले.
    या प्रक्षेपणासह ISROने भारताचा एमिसॅट (EMISAT) हा इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रह आणि विविध देशांचे 28 नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
    संरक्षण संशोधन व विकास संस्थेचा (DRDO) एमिसॅट उपग्रह संरक्षण विषयक संशोधनासाठी उपयोगी ठरणार. 436 किलो वजनी एमीसॅट उपग्रह हा विद्युत चुंबकीय मापनासाठी काम करणार आहे. एमीसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे.
    जगभरातले 28 देश या अंतराळ मोहिमेमध्ये सहभागी झाले, त्यामध्ये अमेरिकेतले 24, लिथुआनियातले 11, स्पेनमधील 1 तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे.
    ISRO चा प्रवास
    भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि याचे बेंगळुरू येथे मुख्यालय आहे. दिनांक 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना करण्यात आलेल्या ISRO ने 1962 साली स्थापना झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेला बदलले.
    ISRO ने 1999 सालापासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला. ISRO ने साधलेल्या प्रशंसनीय यशाचा आढावा पुढीलप्रमाणे आहे -
    • 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.
    • 1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.
    • 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेमधून चंद्राच्या ध्रुव क्षेत्रात पाणी असण्याची पुष्टी केली.
    • ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 2 April 2019 Marathi |   
    एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment