Current affairs | Evening News Marathi
Current affairs 31 March 2019 Marathi |
31 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
वाय. व्ही. रेड्डी लिखित “इंडियन फिस्कल फेडरॅलीझम” पुस्तक
सहलेखक जी. आर. रेड्डी सोबत वाय. व्ही. रेड्डी याचे “इंडियन फिस्कल फेडरॅलीझम” हे शीर्षक असलेले नवे पुस्तक प्रकाशित झाले. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी प्रेस हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.वाय. व्ही. रेड्डी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी केंद्रीय आणि राज्य सरकार अश्या दोन्हीमध्ये विविध पदांवर भूमिका बजावविलेली आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 31 March 2019 Marathi |
31 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
'हिकिकोमोरी': चर्चेत असलेला जपानी शब्द
जपानच्या सरकारच्या अहवालानुसार, देशात 40 ते 64 या वयोगटातले 6,13,000 'हिकिकोमोरी' आहेत. एका सर्वेक्षणानुसार लोकसंख्येच्या 2.4% तरुण जपानी लोकांमध्ये ही स्थिती उद्भवलेली आहे, त्यात स्त्रियांच्या संख्येच्या चौपट पुरुषांचा समावेश आहे.'हिकिकोमोरी' याचा अर्थ काय?
वयोवृद्ध होत चाललेल्या जपानमध्ये एकलकोंडेपणा बळावत चालला आहे. एकलकोंडेपणा या शब्दाला जपानी भाषेत “हिकिकोमोरी” हा शब्द दिला गेला आहे.
या शब्दाचा असा अर्थ होतो की “अशी व्यक्ती जी कुठल्याही शाळेत जात नाही किंवा सहा महिने किंवा अधिक कोणतेही काम करीत नाही आणि त्या काळात ती व्यक्ती कुटुंबाच्या बाहेर कोणाशीही कुठल्याहीप्रकारे संवाद साधत नाही”. दीर्घकाळ सामाजिक संबंधापासून दूर राहणारी व्यक्ती म्हणजे हिकिकोमोरी होय.
हा शब्द पहिल्यांदा तामीकी सैटो ह्यांनी आपल्या “शाकैतेकी हिकिकोमोरी: ओवारानै शिशून्की” हे शीर्षक असलेल्या पुस्तकात वापरला होता. हे पुस्तक ‘सोशल विदड्रॉवल: ए नेव्हरएंडिंग अॅडॉलेसेन्स” म्हणून भाषांतरित करण्यात आले आहे.
जपान प्रशांत महासागर प्रदेशातला एक बेट राष्ट्र आहे. या देशाची राजधानी टोकियो हे शहर आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 31 March 2019 Marathi |
31 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
WMOचा ‘स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट इन 2018’ अहवाल
संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अंतर्गत कार्य करणार्या जागतिक हवामान संघटनेचा (WMO) जागतिक हवामानाची स्थिती सांगणारा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.WMOच्या ‘स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट इन 2018’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी अत्यंत वाईट वातावरणामुळे जागतिक पातळीवर 62 दशलक्ष लोक प्रभावित झाले आणि 2 दशलक्ष लोक बेघर झाले.
बदलत्या हवामानाचा झालेला परिणाम
- औद्योगिक युग सुरू झाल्यापासून पृथ्वीच्या तापमानात सुमारे 1.8 अंश फेरनहाइटने वाढ झाली आहे.
- वीज आणि वाहतूक यासाठी वापरल्या जाणार्या दगडी कोळसा, गॅसोलीन आणि डिझेल इत्यादी ज्वलनशील इंधनामुळे होणारे कार्बनचे उत्सर्जन वैश्विक तापमानवाढीत योगदान देत आहे, ज्यामुळे वादळ, पूर आणि दुष्काळ अधिक तीव्रतेनी येऊ लागली आहेत.
- गेले चार वर्ष हे विक्रमी तापमानासह गेले. त्यामध्ये 2018 हे वर्ष देखील आहे, जे ‘सर्वात गरम ला निना वर्ष’ म्हणून नोंदविले गेले आहे.
- जगभरात आलेल्या पूरांने 35 दशलक्ष लोकांना प्रभावित केले. तर दुष्काळाने आणखी 9 दशलक्ष लोकांना प्रभावित केले.
- महासागराच्या उष्णतेत उच्च नोंद झाली आहे आणि महासागरे अधिकाधीक आम्ल-तत्वात बदलत आहेत आणि पाण्यातले ऑक्सिजन गमावत आहेत.
- हिमनद्या वितळत आहेत आणि ध्रुवीय क्षेत्रातल्या महासागरांमधील बर्फ कमी होत आहे.
- हवेतली कार्बन डाय-ऑक्साईडची पातळी विक्रमी नोंदवली गेली आहे. कार्बन डाय-ऑक्साईड वायूची पातळी सन 2017 मध्ये 405.5 पार्ट्स पर मिलियन (ppm) होती, जी सन 1994 मध्ये 357.0 ppm होती. 2018 आणि 2019 या वर्षांमध्ये हे प्रमाण आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
जागतिक हवामान संघटना (World Meteorological Organization -WMO) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक आंतरसरकारी संघटना आहे. दिनांक 23 मार्च 1950 रोजी संघटनेची स्थापना झाली. जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे संघटनेचे मुख्यालय आहे.
ही हवामान खात्याशी संबंधित असलेली एक वैश्विक संघटना आहे आणि 191 देश व प्रदेश याचे सभासद आहेत. ही संस्था स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार्या 31 देशांमध्ये भारत ही होता. यानंतर जगातल्या सर्व देशांमध्ये केल्या जाणार्या हवामानाच्या नोंदीच्या देवाणघेवाणीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.
पृथ्वीची वातावरणविषयक परिस्थिती आणि महासागरांची स्थिती, जलस्त्रोतांच्या वितरणासंबंधी माहिती याबाबतीत संयुक्त राष्ट्रसंघाची अधिकृत संस्था आहे. वर्तमानात ‘वर्ल्ड वेदर वॉच’ प्रणाली जगभरात हवामानावर लक्ष ठेवणारी जागतिक प्रणाली कार्यरत आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 31 March 2019 Marathi |
31 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
अनिवासी भारतीयांसाठी रूपी इंटरेस्ट डेरिव्हेटिव्ह बाजारपेठ खुली करण्यात आली
भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) अनिवासी भारतीयांसाठी भारतीय रूपयाच्या संबंधित बाजारपेठ खुली केली आहे. रूपी इंटरेस्ट रेट स्वॅप (IRS) बाजारपेठ विस्तारण्याचा दृष्टिकोन पुढे ठेवत हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे.मान्यतेनुसार अनिवासी भारतीय रूपी इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज या विभागात भाग घेऊ शकणार. ते मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि ओव्हर द काउंटर मार्केट (OTCs) यांवरील IRS संदर्भात व्यवहार करू शकतील. शिवाय परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदार (FPIs) एकत्रितपणे 5,000 कोटी रुपयांच्या मर्यादेपर्यंत इंटरेस्ट रेट फ्युचर्स (IRF) यामध्ये व्यवहार करू शकतात.
देशांतर्गत बाजारपेठेत सहभाग घेण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये सुलभता आणण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे.
RBI विषयी
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातली केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी ‘भारतीय रुपया’ चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ याच्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनी त्याच्या कार्यपद्धती संदर्भात शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतला.
RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 31 March 2019 Marathi |
31 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
IUCNच्या रेड लिस्टमध्ये भारतीय ‘महासीर’ मासा समाविष्ट करण्यात आला
आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) याच्या ‘रेड लिस्ट ऑफ थ्रेटंड स्पेसीज’ या यादीत कुबड असलेला भारतीय ‘महासीर’ मासा समाविष्ट करण्यात आला आहे. या यादीत सूचीबद्ध होणे म्हणजे "लुप्त होत असलेली प्रजाती" असा अर्थ होतो.‘महासीर’ मासा ताज्या पाण्यात आढळणारा मोठ्या आकाराचा मासा आहे. त्याला पाण्यातला वाघ म्हणतात. हा मासा केवळ कावेरी नदीच्या खोर्यात (केरळच्या पंबर, काबीनी आणि भवानी नद्यांमध्येही) आढळतो.
नोव्हेंबर 2018 मध्ये ग्रेट हॉर्नबिल या मास्यासह अन्य 12 भारतीय प्रजातींना देखील या यादीत समाविष्ट केले गेले.
संस्थेबाबत
1948 साली स्थापना झालेली आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (International Union for Conservation of Nature -IUCN) ही संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याची अधिकृत सल्लागार संस्था आहे. ही निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात तसेच नैसर्गिक स्त्रोतांचा शाश्वत वापर या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय ग्लॅंड (स्विर्त्झलँड) या शहरात आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 31 March 2019 Marathi |
31 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
गृह मंत्रालयाने बहु-विभागीय दहशतवाद संनियंत्रण गट (TMG) तयार केला
केंद्रीय गृह मंत्रालयाने बहु-विभागीय दहशतवाद संनियंत्रण गट (Terror Monitoring Group) तयार केला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस विभागाच्या CID शाखेचे अतिरिक्त पोलीस महानिदेशक (ADGP) हे TMG गटाचे अध्यक्ष असतील.जम्मू-काश्मीर सह देशात दहशतवादीला होणारा वित्त पुरवठा रोखण्यासाठी आणि संबंधित कारवायांना आळा घालण्यासाठी आठ सदस्य असलेला हा गट तयार करण्यात आला आहे.
या गटात विविध अन्वेषण विभागांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात जम्मू-काश्मीर पोलीस विभाग, गुप्तचर विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग, राष्ट्रीय तपास संस्था, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ हे विभाग आहेत.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 31 March 2019 Marathi |
31 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
भारताचे बोलिव्हियासोबत 8 सामंजस्य करार झालेत
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांनी दिनांक 30 मार्च 2019 रोजी बोलिव्हिया या देशाला भेट दिली. बोलिव्हियाचे राष्ट्रपती इवो मोरालेस ह्यांनी राष्ट्रपती कोविंद ह्यांना बोलिव्हियाचा सर्वोच्च नागरी सन्मान (ग्रँड कॉलर) देऊन गौरव केला.या भेटीत दोन्ही देशांमधील संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात आठ सामंजस्य करार केले गेलेत. सांस्कृतिक, राजकीय मुस्तद्दींसाठी व्हिसा सवलत व्यवस्था, राजकीय प्रशिक्षण संस्था, खनिकर्म, अंतराळ, पारंपारिक औषधी या क्षेत्रांमध्ये तसेच माहिती तंत्रज्ञान व बाय-ओशनिक रेल्वे प्रकल्प विषयक उत्कृष्टता केंद्र याच्या स्थापनेसाठी हे करार करण्यात आले.
सोबतच बोलिव्हिया आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा भागीदार बनण्यासाठी त्यासंबंधी कार्यचौकटीच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यात आली.
बोलिव्हिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातला एक भूपरिवेष्ठित देश आहे. ला पाझ ही देशाची राजधानी आहे आणि बोलिव्हियाई बोलिव्हियानो हे राष्ट्रीय चलन आहे.
No comments:
Post a Comment