Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, March 19, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 19 March 2019 Marathi | 19 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 March 2019 Marathi |   
    1 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी



    ‘योनो कॅश’ पॉइंट: SBIची कार्डशिवाय पैसे काढण्याची सेवा

    ATM मधून कार्डच्या वापराशिवाय ग्राहकांना ‘योनो’ मोबाईल अॅपद्वारे पैसे काढता यावे त्यासाठी भारतीय स्टेट बँकनी (SBI) ‘योनो कॅश पॉइंट’ सेवा सुरू केली आहे.
    SBIच्या तब्बल 16500 ATMमध्ये योनो कॅशसेवेव्दारे पैसे काढणे शक्य होणार आहे. ही सुविधा उपलब्ध करून देणारी SBI ही देशातली पहिली बँक ठरली आहे.
    85 ई-वाणिज्य कंपन्यांकडून कस्टमाईज्ड उत्पादने व सेवा देणारी ही पहिलीच सर्वंकष डिजीटल बँकींग सुविधा आहे. ही UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) पेमेंट सेवेच्या माध्यमातून व QR कोडच्या (क्विक रीस्पॉन्स कोड) सहाय्याने ATM मधून पैसे काढण्याची सुविधा आहे.
    भारतीय स्टेट बँक (SBI)
    ही भारतातली सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे. SBIचे मूळ 1806 साली दिसून येते, जेव्हा बँक ऑफ बंगाल (तत्कालीन बँक ऑफ कलकत्ता) याची स्थापना करण्यात आली होती. बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बंगाल आणि बँक ऑफ बॉम्बे यांचे 1921 साली ‘इंपेरियल बँक ऑफ इंडिया’ तयार करण्यासाठी एकत्रीकरण झाले होते आणि दिनांक 1 जुलै 1955 रोजी त्या बँकेला SBI हे वर्तमान नाव प्राप्त झाले. त्यामुळे 1 जुलै हा 'SBI दिन' म्हणून पाळला जातो. SBIचे मुख्यालय मुंबई या शहरात आहे.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 March 2019 Marathi |   
    1 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    केनियात संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP) कार्यक्रमाची चौथी वार्षिक सभा संपन्न

    11 मार्च ते 15 मार्च 2019 या काळात नैरोबी (केनियाची राजधानी) येथे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP) कार्यक्रमाची चौथी वार्षिक सभा संपन्न झाली.
    “इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्स फॉर एन्विरोंमेंटल चॅलेंजेस अँड सस्टेनेबल कंझ्मप्शन अँड प्रॉडक्शन” या विषयाखाली सभेत विस्तृत चर्चा झाली. या कार्यक्रमात 193 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता.
    सभेविषयी
    सभेत प्लास्टिकच्या प्रदूषणापासून सागरी जीवन संरक्षित करणे, अन्नाची नासाडी कमी करणे, हवामानातल्या बदलांशी लढा देणारे प्रगत तांत्रिक नव संशोधन चालविणे आणि स्त्रोतांचा वापर आणि जैव-विविधतेची हानी कमी करणे अश्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
    • सन 1995 ते सन 2011 या काळात पर्यावरणविषयक सेवांमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीचे प्रमाण 4 ट्रिलियन (लक्ष कोटी) डॉलर्सवरून 20 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आणि हे प्रमाण दरवर्षी सरासरी 3 ट्रिलियन डॉलर्स एवढे होते. तसेच प्रदूषणासंबंधित नुकसान दरवर्षी सरासरी 4.6 ट्रिलियन डॉलर्स एवढे होते.
    • या सभेच्या बरोबरीनेच, जागतिक बँकेच्या सहकार्याने फ्रान्स आणि केनिया या देशांच्या सरकारांनी ‘वन प्लॅनेट शिखर परिषद’ देखील आयोजित केली होती.
    • प्रमुख पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी बिग डेटा, मशीन लर्निंग आणि ग्रीन टेक्नॉलॉजी स्टार्टअप याचा वापर करण्यासाठी ‘UN सायन्स-पॉलिसी-बिझनेस फोरम’ या नव्या उपक्रमांचा शुभारंभ केला गेला.
    संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP) 
    हा दिनांक 5 जून 1972 रोजी स्थापना करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे, जे जागतिक पर्यावरणविषयक मुद्द्यांच्या संदर्भात धोरणे आणि पद्धती यांच्या वैश्विक अंमलबजावणीमध्ये मदत करते. त्याचे मुख्यालय नैरोबी (केनियाची राजधानी) येथे आहे.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 March 2019 Marathi |   
    1 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    स्कॉर्पियन श्रेणीतली ‘INS खांडेरी’ पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार

    ‘INS खांडेरी’ ही स्कॉर्पियन श्रेणीतली दुसरी पाणबुडी लवकरच राष्ट्राच्या सेवेसाठी भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. पाणबुडीने सर्व सागरी चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
    1,564 टन वजनी ‘INS खांडेरी’ ही एक डीजल व वि‍जेवर चालणारी युद्ध-पाणबुडी आहे, ज्याची बांधणी भारतीय नौदलासाठी मझगाव डॉक शिपबिल्‍डर्स लिमिटेड या जहाजबांधणी कंपनीने केली आहे.
    भारतीय नौदलाचा 'प्रोजेक्ट-75
    भारतीय नौदलासाठी स्कॉर्पियन श्रेणीच्या अंतर्गत 6 पाणबुड्या तयार केल्या जात आहे, ज्यांना भारतीय नौदलात सामील करण्यात येणार आहे. INS कलवरी, INS खांडेरी, INS करंज, INS वेला, INS वगीर आणि INS वागशीर या सहा पाणबुड्या भारतीय नौदलाच्या सेवेत असतील. INS वगीर आणि INS वागशीर वगळता इतर पाणबुड्या तयार झालेल्या आहेत आणि त्यांची चाचणी घेतली जात आहे.
    या पाणबुडीची संरचना फ्रान्सच्या ‘DCNS’ या नौदल संरक्षण व ऊर्जा कंपनीने तयार केली. त्याची बांधणी भारतीय नौदलाच्या 'प्रोजेक्ट-75’ अंतर्गत करण्यात येत आहे.
    वैशिष्ट्ये
    • ही पाण्यामुळे पडणार्‍या उच्च तीव्रता हायड्रोस्टॅटिक दबावाखाली काम करण्यास सक्षम आहे आणि महासागरामध्ये खोलपर्यंत प्रवास करू शकते. डीजल आणि विद्युत अश्या दोन्ही इंधनावर ही पाणबुडी चालते.
    • पाणबुडी 6 x 533 मि.मी. टॉर्पेडो ट्यूबने सज्ज आहे, ज्यामधून 18 व्हाइटहेड एलनिया सुस्तमी सुबॅक्की ब्लॅक शार्क हेवीवेट टॉर्पेडो किंवा SM-39 एक्सॉकेट अॅंटी-शिप क्षेपणास्त्र सोडले जाऊ शकते.
    • पाणबुडीचा पाण्याखाली असताना कमाल वेग 20 नॉट (ताशी 37 किमी) तर पाण्याच्या पृष्ठभागावर 12 नॉट (ताशी 22 किमी) आहे.
    भारताला 7500 किलोमीटरहून अधिकचा सागरीकिनारा लाभलेला आहे. याशिवाय भारतीय परिसरात जवळजवळ 1300 छोटे-मोठे बेटे आणि सुमारे 25 लक्ष चौ. किलोमीटरचा विशिष्ट आर्थिक क्षेत्र आहे. या पाणबुड्यांच्या वापराने सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय संरक्षण व्यवस्थेमध्ये बळकटी येणार.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 March 2019 Marathi |   
    1 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    भारताकडे ‘FIFA अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषक 2020’ स्पर्धेचे यजमानपद

    भारताला ‘FIFA अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषक 2020’ स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. मियामीमध्ये झालेल्या FIFAच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
    आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA) हा एक खासगी महासंघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रिडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो. FIFA फुटबॉल या क्रिडाप्रकाराच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या, विशेषत: पुरुष विश्वचषक (1930 सालापासून) आणि महिला विश्वचषक (1991 सालापासून), आयोजनासाठी जबाबदार आहे. 1904 साली FIFAची स्थापना करण्यात आली आणि त्याचे मुख्यालय झुरिच (स्वित्झर्लंड) येथे आहे. त्याच्या सदस्यत्वामध्ये सध्या 211 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 March 2019 Marathi |   
    1 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    26.6% ग्रामीण कुटुंब दुहेरी टाक्यांच्या शौचालयांचा वापर करतात: NARSS 2018-19

    ‘राष्ट्रीय वार्षिक ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण 2018-19’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की केवळ 26.6% ग्रामीण कुटुंब दुहेरी टाक्या असलेल्या शौचालयांचा वापर करतात.
    अन्य ठळक बाबी
    • सेप्टिक टँक हा एक लोकप्रिय पर्याय आहे, भारतातली 28% शौचालये सोक पीटसह सेप्टिक टँकशी जोडली गेली आहेत आणि 6% शौचालये सोक पीटशिवाय आहेत.
    • वापर होत असलेल्या दुहेरी टाक्यांच्या शौचालयांच्या संख्येच्या बाबतीत उत्तरप्रदेश राज्य अग्रेसर ठरले आहे. त्यापाठोपाठ झारखंड राज्याचा क्रम लागला.
    • उत्तरप्रदेश राज्यातली 64% शौचालये आणि झारखंड राज्यातली 58% शौचालये दुहेरी टाक्यांशी जोडलेली आहेत.
    • 70 टक्क्यांपेक्षा जास्त शौचालये दोन खड्ड्यांशिवाय आहेत आणि त्यासाठी मलमूत्र व्यवस्थापन प्रणालीची अत्यंत आवश्यकता आहे.
    • उत्तरप्रदेश राज्यातल्या 87% शौचालयांचे मलमूत्र नदी-तलावात व शेत जमिनींमध्ये सोडले जात आहे.
    स्वच्छ भारत अभियान
    सन 2014 मध्ये आरंभ करण्यात आलेले ‘स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)’ भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून चालवले जात आहे. या मोहिमेच्या अंतर्गत ग्रामीण भारतात ‘दुहेरी टाक्यांचे शौचालय’ तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यावर भर दिला जात आहे.
    विशेषत: ग्रामीण भागासाठी म्हणून भारतात ‘दुहेरी टाक्यांचे शौचालय’ तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे आणि त्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील शिफारस केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण कुटुंबाला एका वर्षात विघटित कचर्‍यापासून NPK (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम) पोषक घटकांनी भरपूर असे खत मिळू शकते.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 March 2019 Marathi |   
    1 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    पिनाकी चंद्र घोष: भारताचे प्रथम लोकपाल

    सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे प्रथम लोकपाल म्हणून निवड करण्यात आली आहे. आता औपचारिकता पूर्ण करून राष्ट्रपती राम नाथ कोविंद न्या. घोष यांची अधिकृत नेमणूक करतील.
    न्या. घोष यांच्या नेमणुकीने लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर पाच वर्षांनी भारताला पहिला लोकपाल मिळणार आहे. न्या. घोष 66 वर्षांचे असल्याने वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे सुमारे चार वर्षे ते लोकपाल संस्थेचे अध्यक्ष राहतील. त्यांना पगार व दर्जा सरन्यायाधीशासमान असेल.
    न्या. घोष सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत. सर्वोच्च न्यायालयातून सन 2017 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांची आयोगात नेमणूक झाली होती.

    लोकपाल म्हणजे काय?

    लोकपाल (Ombudsman) म्हणजे अशी अधिकृत व्यक्ती/मंडळ, जे वैयक्तिक तक्रारीची दखल घेत कुठल्याही कंपनी आणि संस्थेची (विशेषत: सार्वजनिक) चौकशी करू शकते.
    सन 2014 मध्ये ‘लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम-2013’ या कायद्याला संसदेने मंजुरी दिली होती. लोकपाल संस्था कोणत्याही संविधानाच्या आधाराशिवाय चालणारी एक वैधानिक संस्था आहे, जी पंतप्रधान सहित सर्व लोकांच्या भ्रष्टाचाराबाबत तपास करू शकण्यास सक्षम असणार.
    लोकपाल कायद्यानुसार लोकपाल संस्थेवर अध्यक्षांखेरीज किमान आठ सदस्यही नेमण्यात येणार आहेत. यापैकी चार सदस्य न्यायिक व चार सदस्य गैरन्यायिक असतील. दोन्ही प्रकारच्या सदस्यांपैकी किमान 50% सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्य व महिला यांच्यातून नेमण्यात येतील.


     पिनाकी चंद्र घोष कोण? 


    ▪ देशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेले न्या. पी. सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते.
    ▪ ते आंध्र प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत.
    ▪ ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत.
    ▪ न्या. घोष यांना मानवाधिकार कायद्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते.

    अण्णांनी केले स्वागत : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पी.सी. घोष यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. अण्णा म्हणाले, 48 वर्षानंतर जनआंदोलनाला एक ऐतिहासिक विजय मिळाला आहे

    No comments:

    Post a Comment