Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, March 7, 2019

    Current affairs 7 March 2019 Marathi | 7 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 7 March 2019 Marathi |   7 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी



    हिंदी, इंग्रजीमध्ये पठनासाठी गुगल कंपनीचे 'बोलो' मोबाइल अॅप

    गुगल या तंत्रज्ञान कंपनीने 'बोलो' नावाचा एक नवीन मोबाइल अॅप तयार केला आहे.
    हे अॅप प्रामुख्याने प्राथमिक शिक्षण घेणार्‍या मुला-मुलींना हिंदी आणि इंग्रजीमध्ये वाचन/पठन करण्यास शिकवते. या अॅपमध्ये 'दीया' नावाची एक अॅनिमेटेड व्यक्ती आहे, जी मोठ्याने कथा वाचण्यास उत्तेजन देते आणि शब्द उच्चारण्यात मदत करते.
    हे अॅप गुगलचे ‘स्पीच रिकॉगनिशन’ आणि ‘टेक्स्ट-टू-स्पीच’ या तंत्रज्ञानाचा वापर करते. कंपनी इतर भारतीय भाषांमध्ये याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे.

    केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाची 'वेब वंडर विमेन' मोहीम

    दिनांक 6 मार्च 2019 रोजी नवी दिल्लीत भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने ‘वेब वंडर विमेन’ या मोहिमेसाठीचा सत्कार समारंभ पार पडला. 30 जणांना याप्रसंगी पुरस्कृत करण्यात आले.
    सामाजिक माध्यमांद्वारे सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यात मिळविलेल्या असाधारण यशासाठी महिलांचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. 'वेब वंडर विमेन' हा मंत्रालयाच्या 'विमेन अचीव्हर्स' नावाच्या मोहिमेचा तिसरा घटक आहे.
    असामान्य क्षेत्रात प्रवेश करणार्‍या महिलेचा सन्मान करण्यासाठी सन 2018 मध्ये 'फर्स्ट लेडीज' नावाचा उपक्रम मंत्रालय राबवत आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 7 March 2019 Marathi |   7 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    भारताचा 'जनऔषधी दिन' : 7 मार्च 2019

    जेनेरिक औषधांविषयी अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या औषधांच्या वापराला चालना देण्यासाठी 7 मार्च 2019 हा दिवस ‘जनऔषधी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
    सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, पंतप्रधानांनी घेतलेल्या पुढाकारामुळे भारत सरकारने ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी प्रकल्प’ याच्या माध्यमातून परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
    प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी प्रकल्प (PMBJP) या योजनेच्या अंतर्गत समाजाच्या दुर्बल आणि वंचित घटकांना स्वस्त दरात गुणवत्तापूर्ण औषधी उपलब्ध करून दिले जात आहे. जनऔषधी (वा जनौषधी) केंद्रांवर 600 हून अधिक औषधी आणि शस्त्रक्रियेसाठी लागणार्‍या आणि अन्य आरोग्यविषयक 150 हून अधिक विविध वस्तू उपलब्ध करून दिले जात आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 7 March 2019 Marathi |   7 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    लोकांना वैज्ञानिक दृष्टीकोन देण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संदर्भात नऊ राष्ट्रीय मोहिमा

    डॉ. के. विजय राघवन यांच्या नेतृत्वात असलेल्या ‘प्रधानमंत्री विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनवता सल्लागार परिषद’ (Prime Ministers' Science, Technology and Innovation Advisory Council -PM-STIAC) याच्या मार्गदर्शनाखाली देशभारत नऊ राष्ट्रीय मोहिमा चालविण्यात येणार आहेत. डॉ. के. विजय राघवन हे भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार आहेत.
    या कार्यक्रमांमधून लोकांना शिक्षण, मूलभूत संशोधन, कृषी क्षेत्रातले अनुप्रयोग, आरोग्य, पर्यावरण, ऊर्जा इ. क्षेत्रांमध्ये मूलभूत माहिती दिली जाईल. लोकांच्या सहभागाने किचकट समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यक्रमांवर भर दिला जाईल.
    निश्चित करण्यात आलेल्या मोहिमा
    • नॅचुरल लॅंगवेज ट्रान्सलेशन - इंग्रजीमध्ये उपलब्ध असलेली विज्ञान व तंत्रज्ञान तसेच त्यातील संधी आणि प्रगती याविषयीची माहिती भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करुन देणे.
    • क्वांटम फ्रंटियर - मूलभूत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आव्हानात्मक अश्या क्वांटम मेकॅनिकल सिस्टम या विषयाच्या नियंत्रणाखाली मोठ्या स्वरूपात काम सुरू करणे.
    • आर्टिफिश्यल इंटेलिजेंस - कृत्रिम बुद्धिमत्ता मोहिमेच्या अंतर्गत आरोग्य सेवा, कृषी, स्मार्ट शहर आणि पायाभूत सुविधा, स्मार्ट परिचालन आणि परिवहन अश्या क्षेत्रांमधील सामाजिक गरजा पूर्ण करण्यावर भर देणे.
    • नॅशनल बायोडायव्हरसीटी मिशन – भारतात उपस्थित असलेल्या सर्व प्रकारच्या जैवविविधतेबाबतचे विस्तृत दस्तऐवजीकरण करणे. तसेच संबंधित सांस्कृतिक आणि पारंपारिक प्रथा/पद्धती; जैवविविधतेचे शास्त्रोक्त पद्धतीने मूल्यांकन, विश्वासार्ह माहितीच्या आधारे जैवविविधतेच्या आधारावर अर्थव्यवस्था स्थापित करणे, लोकांचा सहभाग आणि उपजीविकेचे पर्याय अश्या विविध मुद्द्यांवर भर देणे.
    • इलेक्ट्रिक व्हेईकल्स - जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी वीजेवर चालणार्‍या वाहनांना (EV) भारतीय परिवाहनाचा एक प्रमुख घटक बनविणे.
    • बायोसायन्स फॉर ह्यूमन हेल्थ - आरोग्य आणि पोषणावर निसर्गाचा होणारा प्रभाव समजून घेण्यासाठी आरोग्यासंबंधी आणि रोगांचे नमुने वापरणे. तसेच अनुवांशिकतेसंबंधीचे विस्तृत संदर्भ नकाशे तयार करणे.
    • वेस्ट टू वेल्थ - कचर्‍यापासून ऊर्जा निर्मिती, पुनर्निमित पदार्थ/साहित्य तयार करण्यासाठी तसेच कचर्‍यामधून मौल्यवान घटक काढण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे.
    • डीप ओशन एक्सप्लोरेशन – नील संपत्तीबाबत समज तयार करण्याकरिता शास्त्रोक्त पद्धतीने खोल महासागरांचा शोध घेणे. वातावरणातील बदलामुळे महासागरात होणार्‍या दीर्घकालीन बदलांच्या समस्यांबाबत माहिती तयार करणे.
    • अग्नी (AGNIi) – भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार (PSA) कार्यालयाद्वारे ही मोहीम राबवली जाणार आहे. देशातील उद्योग, व्यक्ती आणि तळागळात आढळून येणार्‍या अभिनव कल्पकता ठेवणार्‍या व्यक्तींना एकत्र आणून देशामध्ये नवकल्पना संबंधित वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय प्रयत्नांना समर्थन देणे या मोहिमेचा उद्देश आहे. उद्योगांपर्यंत कल्पक संशोधकांना त्यांचे तंत्रज्ञान तयार उत्पादनाच्या व उपाययोजनेच्या स्वरुपात पोहचवण्यासाठी हे एक व्यासपीठ प्रदान करेल.
    विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी सरकारच्या प्रयत्नात नागरिकांचा सहभाग वाढवा यासाठी शास्त्रज्ञ आणि नागरी-समाज यांच्याशी जवळचा संबंध जोडण्याच्या उद्देशाने या मोहिमा आहेत.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 7 March 2019 Marathi |   7 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    राष्ट्रीय सुशासन केंद्र (NCGG) आणि भारतीय कॉर्पोरेट कल्याण संस्था (IICA) यांच्यात सामंजस्य करार

    राष्ट्रीय सुशासन केंद्र (NCGG) आणि भारतीय कॉर्पोरेट कल्याण संस्था (IICA) यांच्यादरम्यान सामंजस्य करार झाला आहे.
    या कराराच्या अंतर्गत प्रशासनाच्या संदर्भातल्या मुद्द्यांवर अभ्यास करण्यासाठी वा कृतीयोजना आधारित संशोधनाच्या उद्देशाने पाच वर्षांसाठी शैक्षणिक आणि बौद्धिक संवादांसाठी तसेच दिल्लीत आयोजित केल्या जाणार्‍या NCGGच्या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान IICA येथे असलेल्या पायाभूत सुविधांचा NCGG वापर करू शकणार.
    भारतीय कॉर्पोरेट कल्याण संस्था (Indian Institute of Corporate Affairs -IICA) ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत 2008 साली स्थापन करण्यात आलेली संस्था आहे, जी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या जागतिक दर्जाच्या संस्था स्थापन करणे, व्यवस्थापन करणे आणि चालवणे या प्राथमिक उद्देशाने आहे.
    राष्ट्रीय सुशासन केंद्र (National Centre for Good Governance -NCGG) ही एक स्वायत्त संस्था आहे, जी भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रारी विभागाच्या अखत्यारीत आहे. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे आणि मसूरी येथे नोंदणीकृत कार्यालय आहे. 1995 साली स्थापना करण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रशासकीय संशोधन संस्था (NIAR) याच्या कामकाजाचा विस्तार करून वर्तमानातले नाव संस्थेला देण्यात आले, ज्याचे दिनांक 24 नोव्हेंबर 2014 रोजी उद्घाटन झाले.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 7 March 2019 Marathi |   7 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    सलग तिसर्‍यांदा इंदूर हे सर्वात स्वच्छ शहर ठरले

    दिनांक 6 मार्च 2019 रोजी दिल्लीत एका कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 2019 सालासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ पुरस्कारांचे वितरण केले गेले.
    केंद्र सरकारच्या स्वच्छता पाहणीत लागोपाठ तिसऱ्या वर्षी मध्यप्रदेशाच्या इंदूर (ऊर्फ इंदौर) या शहराला राष्ट्रीय यादीत एकूणच प्रथम क्रमांक मिळाला आहे. द्वितीय क्रमांक छत्तीसगडमधील अंबिकापूरला, तर तृतीय कर्नाटकमधील म्हैसूरला मिळाला आहे.
    अन्य पुरस्कार

    सर्वाधिक स्वच्छ मोठे  (10 लक्षाहून अधिक लोकसंख्या) शहर

    अहमदाबाद (गुजरात)

    सर्वाधिक स्वच्छ मध्यम (3–10 लक्ष) शहर

    उज्जैन (मध्यप्रदेश)

    सर्वाधिक स्वच्छ छोटे  (1 - 3 लक्ष) शहर

    नवी दिल्ली महापालिका

    गंगाकाठचे सर्वात स्वच्छ शहर

    गौचर (उत्तराखंड)

    सर्वाधिक स्वच्छ राजधानी/केंद्रशासित शहर

    भोपाळ (मध्यप्रदेश)

    सर्वाधिक वेगाने वाढणारे मोठे शहर

    रायपूर (छत्तीसगड)

    सर्वाधिक वेगाने वाढणारे मध्यम शहर

    मथुरा-वृंदावन (उत्तरप्रदेश)

    क्षेत्र-निहाय भारताचा सर्वाधिक स्वच्छ शहर (<1 लक्ष)

    उत्तर - नवाशहर (पंजाब)
    पूर्व – नहरपूर (छत्तीसगड)
    ईशान्य – थौबल (मणीपूर)
    दक्षिण – पिरियापट्टन (कर्नाटक)
    पश्चिम - कर्हाड (महाराष्ट्र)

    सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य

    छत्तीसगड (प्रथम), झारखंड, महाराष्ट्र
    महाराष्ट्राबाबत
    यंदा स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळाले.
    राज्यातील 27 शहरे कचरामुक्त ठरली आहेत. या अभियानात सवरेत्कृष्ट कामगिरी केलेल्या पहिल्या 100 शहरांमध्ये राज्यातील 24 शहरे आहेत.
    स्वच्छ भारत मोहीम
    स्वच्छ भारत मोहीम (शहरी) या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत केले जाणारे स्वच्छ सर्वेक्षण हा गृह मंत्रालय आणि शहरी कल्याण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. दिनांक 2 ऑक्टोबर 2014 रोजी मोहिमेची सुरूवात केली गेली. आज स्वच्छ भारत मोहिमेला एका देशव्यापी चळवळीचे स्वरुप देण्यात आले आहे. ही मोहीम शहरी आणि ग्रामीण अश्या दोन्ही विभागांमध्ये राबवली जात आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 7 March 2019 Marathi |   7 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    No comments:

    Post a Comment