Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, February 27, 2019

    Current affairs 27 February 2019 Marathi | 27 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219
    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 27 February 2019 Marathi |     27 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी


    नायजेरियाच्या राष्ट्रपतीपदी मुहम्मदू बुहारी पुन्हा एकदा निवडून आलेत

    नायजेरियाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणूकीत हंगामी राष्ट्रपती म्हणून पदावर असणार्‍या मुहम्मदू बुहारी यांची पुन्हा एकदा निवड आली आहे.
    76 वर्षांचे मुहम्मदू बुहारी आता हे पद त्यांच्या द्वितीय कार्यकाळासाठी पुढील चार वर्षांसाठी सांभाळतील.
    नायजेरिया प्रजासत्ताक हा आफ्रिकेतला एक देश आहे. याच्या दक्षिणेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. अबुजा ही नायरजेरियाची राजधानी आहे. नायजेरियन नाइरा (NGN) हे देशाचे राष्ट्रीय चलन आहे. ही आफ्रिका खंडातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. येथे इंग्रजीसोबतच हौसा, इग्बो, योरुबा या भाषा बोलल्या जातात.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 27 February 2019 Marathi |     27 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी


    जैवतंत्रज्ञान विभागाची “अटल जय अनुसंधान जैवतंत्र मोहीम-UNaTI” उपक्रम

    भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा 33 वा स्थापना दिन 26 फेब्रुवारीला नवी दिल्लीत साजरा करण्यात आला.
    सेलिब्रेटिंग बायोटेक्नॉलजी: बिल्डिंग इंडियन अॅज अॅन इनोव्हेशन नेशन’ (म्हणजेच ‘जैव तंत्रज्ञान: कल्पकता आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देणारे राष्ट्र म्हणून भारताची उभारणी करणे) या संकल्पनेखाली हा दिन साजरा करण्यात आला.
    यावेळी “अटल जय अनुसंधान जैवतंत्र मोहीम – अन्डरटेकिंग नॅशनली रेलेव्हंट टेक्नॉलॉजी इनोव्हेशन” (UNaTI) या राष्ट्रस्तरीय उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आरोग्य, कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पाच वर्षासाठी हा उपक्रम चालवला जाणार आहे.
    या मोहिमेत समाविष्ट असलेले घटक -
    • GARBH-ini : मातृ व बाल आरोग्य यास तसेच मुदतीपूर्वी जन्माबाबत अंदाज बांधणार्‍या साधनांचा विकास करण्यास प्रोत्साहन देणारी मोहीम
    • IndCEPI : विशिष्ट ठिकाणी किंवा त्या ठिकाणी असलेल्या लोकांना होणारा रोगांसाठी स्वस्त लस विकसित करण्यासाठीची मोहीम
    • पोषण अभियानासाठी जैविक-दृष्ट्या पोषक आणि प्रथिनेयुक्त गहूचा विकास करणे
    • परवडणारे निदान आणि चिकित्सा यासाठी सूक्ष्म रोगजंतूंच्या प्रतिकार संबंधी रोधक मोहीम (Mission on Anti Microbial Resistance)
    • स्वच्छ ऊर्जा मोहीम (Clean Energy Mission) – ‘स्वच्छ भारत’ पुढाकारासाठी नवकल्पना-आधारित तंत्रज्ञानक्षम हस्तक्षेप
    याप्रसंगी जैवतंत्रज्ञान संशोधन नाविन्यता आणि तंत्रज्ञान सर्वोत्कृष्टता (Biotechnology Research Innovation and Technology Excellence -BRITE) पुरस्कार देखील प्रदान केले गेलेत.
    जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) हे भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे, जे भारतात आधुनिक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकास व व्यवसायिकीकरणासाठी जबाबदार आहे. 1986 साली या विभागाची स्थापना झाली.
    आरोग्य, सुधारीत पीक जाती, पशु निदान, स्वच्छ ऊर्जा, उत्पादनासाठी तंत्रज्ञान यासाठी मापक दरातल्या उपायांचा विकास आणि व्यावसायिकीकरणाद्वारे अनेक क्षेत्रात व्यापक प्रमाणात प्रभाव निर्माण करण्यात जैव तंत्रज्ञान विभागाने 33 वर्ष महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 27 February 2019 Marathi |     27 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    डिजिटल आरोग्य विषयक 'दिल्ली घोषणापत्र' स्वीकारले गेले

    दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्लीत ‘वैश्विक डिजिटल आरोग्य भागिदारी शिखर परिषद 2019’ पार पडली. परिषदेअंती डिजिटल आरोग्य विषयक 'दिल्ली घोषणापत्र' स्वीकारले गेले.
    या घोषणापत्रात जागतिक आरोग्य संघटनेकडे त्याच्या सदस्य देशांना मदत करण्यासाठी डिजिटल आरोग्याच्या क्षेत्रात मध्यवर्ती पद्धतीने समन्वय साधण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि वैश्विक डिजिटल आरोग्य भागीदारी (GDHP) यांच्या सहकार्याने ही वार्षिक जागतिक आंतर-सरकारी बैठक भारत सरकारचे आरोग्य मंत्रालयाने आयोजित केली होती.
    भागीदारीविषयी
    वैश्विक डिजिटल आरोग्य भागिदारी (Global Digital Health Partnership -GDHP) हा डिजिटल आरोग्य सेवांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सहकार्याची पद्धत तयार करण्यासाठी सरकार, सरकारी संस्था आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांचा एक सहकार्यासंबंधी उपक्रम आहे. याची स्थापना फेब्रुवारी 2018 मध्ये करण्यात आली. या क्षेत्रात सर्वोत्तम सराव पद्धती आणि धोरण सामायिक करणे तसेच भागीदारांसाठी चर्चेसाठी एक आंतरराष्ट्रीय मंच प्रदान करणे हे या पुढाकाराचे उद्दिष्ट आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 27 February 2019 Marathi |     27 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    “संप्रिती 2019”: भारत आणि बांग्लादेश यांचा संयुक्त लष्करी युद्धसराव

    दिनांक 2 मार्च 2019 पासून भारत आणि बांग्लादेश यांच्या “संप्रिती 2019” या नावाने वार्षिक संयुक्त लष्करी युद्धसरावाला सुरुवात केली जाणार आहे.
    बांग्लादेशाच्या तंगैल येथे हा सराव चालणार आहे. यावर्षी या सराव मालिकेची आठवी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे. 14 दिवस चालणार्‍या या सरावात दोन्ही देशांचे दल धोरणात्मक कार्ये, पद्धती आणि सहकार्यासंबंधी पैलूंवर अनुभवांचे आदानप्रदान करणार आहेत.
    बांग्लादेश हा बंगालचा उपसागरालगत असलेला भारताच्या पूर्वेकडे असलेला दक्षिण आशियाई देश आहे. ढाका ही देशाची राजधानी असून चलन बांग्लादेशी टाका हे आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 27 February 2019 Marathi |     27 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    स्वदेशी ‘क्विक रिअॅक्शन सर्फेस-टू-एयर’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

    दिनांक 26 फेब्रुवारी 2019 रोजी ओडीशा राज्याच्या चंदीपूर येथील चाचणी केंद्रावरून देशातच संरचित ‘क्विक रिअॅक्शन सर्फेस-टू-एयर’ क्षेपणास्त्राची (QRSAM) चाचणी यशस्वीपणे पार पाडण्यात आली.
    जमिनीवरून हवेतले लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेले हे क्षेपणास्त्र एकाच उड्डाणादरम्यान लागोपाठ बहू-लक्ष्यांसाठी मार्गदर्शित केले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) संरचित आणि विकसित केले आहे.
    भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आलेले हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र 30 किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 27 February 2019 Marathi |     27 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी


    नवी दिल्लीत 'उड्डयन परिषद 2019' पार पडली

    दिनांक 26 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्लीत "फ्लाइंग फॉर ऑल" या विषयाखाली 'उड्डयन परिषद 2019' (Aviation Conclave) पार पडली.
    भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), AAICLAS आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) यांच्या सहयोगाने ही परिषद भारत सरकारच्या केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आली होती.
    परिषदेत भारतीय उड्डयन क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा करण्यात आली. या क्षेत्रासंबंधी धोरणे, विमानासह संबंधित उपकरणांचा विकास, भारताकडून चालवल्या जाणार्‍या ‘प्रोजेक्ट रूपी रफ्तार-एयरक्राफ्ट’ या कार्यक्रमाला वित्तपुरवठा आणि त्यासंबंधी कंत्राटी पद्धत, राष्ट्रीय हवाई मालवाहतुकीचे धोरण तसेच भारतीय विमानतळांना पुढील पिढीचे एव्हिएशन हब बनविण्यासाठी मोहीम अश्या विविध बाबींवर चर्चा केली गेली.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 27 February 2019 Marathi |     27 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment