Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, February 26, 2019

    Current affairs 26 February 2019 Marathi | 26 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219
    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 26 February 2019 Marathi |     26 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी


    केली नाईट क्राफ्ट: संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या नव्या राजदूत

    संयुक्त राज्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली नाईट क्राफ्ट यांची संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या नव्या राजदूत पदासाठी निवड केली आहे.
    केली नाईट क्राफ्ट सध्या कॅनडामध्ये अमेरिकेच्या राजदूत आहेत. ही नवी नियुक्ती संयुक्त राष्ट्रसंघाट पदावर राहिलेल्या निकी हेलीच्या जागी केली गेली, ज्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये पद सोडले.
    संयुक्त राष्ट्रसंघ (UN) बाबत
    1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) 5 कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. स्थापनेच्या वेळी संयुक्त राष्ट्रसंघाची 51 सदस्य राष्ट्रे होती; ही संख्या आता 193 इतकी आहे.
    संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ही आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणारी एक आंतरशासकीय संस्था आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात मुख्य अधिकारी पद ‘महासचिव’ हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगीज अँटोनियो ग्युटेरस यांच्याकडे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.
    संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -
    • UN महासभा (General Assembly)
    • UN सुरक्षा परिषद (Security Council)
    • UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC)
    • UN सचिवालय
    • UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणि
    • UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).
    संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -
    • जागतिक बँक समूह
    • जागतिक आरोग्य संघटना (WHO)
    • द वर्ल्ड फूड प्रोग्राम
    • संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO)
    • संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (United Nations Children's Fund –UNICEF)
    संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्काला प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 26 February 2019 Marathi |     26 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता यांनी ‘कान्स इंटरनॅशनल ओपन चषक’ जिंकला

    फ्रान्सच्या कान्स येथे ग्रँडमास्टर 2018 गुप्ता यांनी ‘कान्स इंटरनॅशनल ओपन चषक 2019’ या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.
    या स्पर्धेच्या अंतिम लढतीत इटलीच्या पियर लुइगी बासो सोबतची खेळी ड्रॉ झाली आणि अधिक गुणांमुळे अभिजीत गुप्ता स्पर्धेचा विजेता ठरला. गुप्ताचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय विजय आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 26 February 2019 Marathi |     26 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    भारतीय रेल्वेच्या उत्तरदायित्वाला चालना देणाऱ्या रेल्वे दृष्टी डॅशबोर्डचा शुभारंभ

    भारतीय रेल्वेत चालणार्‍या सर्व डिजिटलीकरण प्रकल्पांना एकत्रित करणाऱ्या आणि त्यात पारदर्शकता तसेच उत्तरदायित्वाला चालना देणाऱ्या ‘रेल्वे दृष्टी डॅशबोर्ड’ या व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आला.
    या डॅशबोर्डमुळे देशातल्या नागरिकांना एकाच ठिकाणी विविध स्रोतातील माहिती उपलब्ध होणार आहे. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप संगणक, मोबाईल किंवा टॅबलेटच्या माध्यमातून या डॅशबोर्डमधील माहिती सहज मिळवता येईल.
    या डॅशबोर्ड अभियानांतर्गत प्रवासी आरक्षण, अनारक्षित तिकीट, माल वाहतूकीतून मिळणारा निधी तसेच एकूण माल वाहतूक याविषयी माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
    डॅशबोर्डच्या माध्यमातून –
    • देशभरातल्या कुठल्याही रेल्वे स्थानकाची माहिती मिळू शकेल.
    • रेल्वे द्वारे उपलब्ध होणाऱ्या सर्व डिजिटल सेवांची माहिती प्रवाशांना सहज उपलब्ध होईल.
    • भारतीय रेल्वेच्या जाळ्यातील कुठल्याही रेल्वे गाडीची माहितीही मिळू शकेल.
    • येथे प्रवासी आपली तक्रार नोंदवू शकतील.
    • तसेच माल वाहतूकीची माहिती यासह एकूण 15 सेवा उपलब्ध होणार आहेत.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 26 February 2019 Marathi |     26 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    राष्ट्रपतींच्या हस्ते गांधी शांतता पुरस्कारांचे वाटप

    राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 2015, 2016, 2017 आणि 2018 या वर्षांसाठी ‘गांधी शांतता’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.
    पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे आहेत:
    • वर्ष 2015 - विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी
    • वर्ष 2016 - अक्षय पात्र फाऊंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल (संयुक्तरित्या)
    • वर्ष 2017 - एकल अभियान ट्रस्ट
    • वर्ष 2018 - शा योहे ससाकावा
    पुरस्काराविषयी
    अहिंसेच्या मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना प्रदान करण्यात येणाऱ्या गांधी शांतता पुरस्काराची स्थापना 1995 साली करण्यात आली. 1 कोटी रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
    भारताचे पंतप्रधान या पुरस्कारासाठीच्या निवड समितीचे अध्यक्ष असतात, तर सरन्यायाधीश, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, तसेच दोन मान्यवर यांचा निवड समितीत समावेश असतो.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 26 February 2019 Marathi |     26 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी


    भोपाळ व जोरहाट येथे राष्ट्रीय संरचना संस्था (NID) उभारण्यात आल्या

    मध्यप्रदेशाच्या भोपाळ आणि आसामच्या जोरहाट या दोन शहरांमध्ये उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय संरचना संस्था (National Institutes of Design -NID) या संस्थांचे उद्घाटन करण्यात आले आहे.
    जोरहाट येथील राष्ट्रीय संरचना संस्था ही ईशान्य भारतातली पहिलीच संस्था आहे. दोन्ही संस्था भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या उद्योग व अंतर्गत व्यापार प्रचार विभाग (DPIIT) अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वायत्त संस्था आहेत.
    ‘राष्ट्रीय संरचना धोरण-2007’ अनुसार देशात संरचना क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या विविध भागांमध्ये NID संस्था उभारण्याची योजना स्पष्ट केली गेली आहे. त्यानुसार, आंध्रप्रदेश (अमरावती), आसाम (जोरहाट), मध्यप्रदेश (भोपाळ) आणि हरियाणा (कुरुक्षेत्र) येथे चार नवीन संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच गुजरात (अहमदाबाद) येथे देखील अशी संस्था उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 26 February 2019 Marathi |     26 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    दिल्लीत चौथी जागतिक डिजिटल आरोग्य भागिदारी शिखर परिषद पार पडली

    दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्लीत ‘जागतिक डिजिटल आरोग्य भागिदारी शिखर परिषद 2019’ पार पडली. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन करण्यात आले.
    आरोग्य सेवेतील परिवर्तनात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
    भारत तसेच जागतिक पातळीवरील आरोग्य सुविधा प्रणालीत मोठे बदल घडून येत आहेत. वैश्विक आरोग्य समावेशकतेला सहाय्यभूत करण्याची मोठी क्षमता डिजिटल आरोग्य प्रणालीत असून यासाठी भारत सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी आयुषमान भारत या सर्व समावेशक आरोग्य सेवा योजनेचा देखील उल्लेख करण्यात आला.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 26 February 2019 Marathi |     26 फेब्रुवारी 2019 करेंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment