Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, February 25, 2019

    Current affairs 25 February 2019 Marathi | 25 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    59 Views

    20181211_220219
    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 25 February 2019 Marathi |     25 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    मोहम्मद ताहिर अयाला: सुदानचे पहिले उपराष्ट्रपती आणि नवे पंतप्रधान

    सुदानचे राष्ट्रपती ओमार-अल-बशीर यांनी देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि नवे पंतप्रधान या पदासाठी मोहम्मद ताहिर अयाला यांची निवड केली आहे.
    राष्ट्रपती ओमार-अल-बशीर यांनी दिनांक 22 फेब्रुवारी 2019 पासून देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केले आहे.
    ओमार-अल-बशीर राष्ट्रपती पदावर गेल्या 30 वर्षांपासून आहेत. त्यांच्या सत्तेविषयी उठलेल्या प्रश्नांवरून देशात राजकीय आंदोलन चालले असताना ही आणीबाणी घोषित केली गेली.
    सुदान हा ईशान्य (N-E) आफ्रिकेतला एक देश आहे. सुदान आफ्रिका खंडातला व अरब जगतातला सर्वात मोठा देश आहे. खार्तूम ही देशाची राजधानी असून सुदानी पाउंड हे राष्ट्रीय चलन आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 25 February 2019 Marathi |     25 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    व्हेनेझुएलाने कोलंबियासोबतचे राजकीय संबंध तोडले

    दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मदुरो यांनी व्हेनेझुएलाने कोलंबियासोबतचे आपले राजकीय संबंध तोडण्याची घोषणा केली आहे.
    कोलंबिया सरकारची देशाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये होत असलेली ढवळाढवळ लक्षात घेता मदुरो यांनी हा निर्णय घेतला आहे.
    पार्श्वभूमी
    मे 2018 मध्ये व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीपदी निकोलस मदुरो यांची पुन्हा एकदा सहा वर्षांसाठी निवड झाली. मात्र त्यांची ही निवड अवैध आहे, असे देशाच्या संसदेने ठरविले. त्यानंतर विरोधी पक्षनेते खुआन ग्वाइडो यांनी स्वत:ला देशाचे राष्ट्रपती घोषित केले. त्यामुळे देशात अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे.
    त्यानंतर प्रथमताः अमेरिकेसह अनेक देशांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी पक्षनेते जुआन ग्वेडो यांना दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला या देशाचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून आपली मान्यता दिली.
    व्हेनेझुएलामधील या राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीत अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी व्हेनेझुएलाचे विरोधी पक्षनेते खुआन ग्वाइडो यांना व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्रपती म्हणून मान्यता दिली आहे.
    व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. काराकास ही देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. या देशाची राष्ट्रीय भाषा स्पॅनिश आहे. व्हेनेझुएलन बोलिव्हर हे राष्ट्रीय चलन आहे.
    कोलंबिया हा दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातला 26 वा आणि दक्षिण अमेरिका खंडामधील चौथा मोठा देश आहे. बोगोटा ही देशाची राजधानी आहे आणि कोलंबियाई पेसो हे राष्ट्रीय चलन आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 25 February 2019 Marathi |     25 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    माहितीचा अधिकार कायद्याच्या अंतर्गत EVM ला 'माहिती' या गटात ठेवले

    मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) याला माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कायदेशीर चौकटीत "माहिती" या संज्ञेच्या गटात ठेवण्यात आले आहे.
    केंद्रीय माहिती आयोगाच्या (CIC) या निर्णयानुसार, 10 रुपयांच्या शुल्कासह अर्जदार आता निवडणूक आयोगाकडे EVM यंत्राची मागणी करू शकतो.
    माहितीचा अधिकार अधिनियम-2005
    माहितीचा अधिकार (Right to Information -RTI) हा भारतीय संसदेचा एक अधिनियम आहे, ज्याचा वापर करून नागरीकांसाठी माहितीच्या अधिकाराच्या व्यावहारिक नियमांची अंमलबजावणी केली जाते. हा कायदा पूर्वीच्या ‘माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम-2002’ (Freedom of information) याच्या जागी आणला गेला. संपूर्ण प्रभावाने दिनांक 12 ऑक्टोबर 2005 रोजी हा कायदा देशात लागू झाला.
    केंद्रीय माहिती आयोग
    भारतात केंद्रीय माहिती आयोग (CIC) याची स्थापना 2005 साली ‘महितीचा अधिकार अधिनियम-2005’ अन्वये करण्यात आली. केंद्रीय माहिती आयोग सरकारच्या यंत्रणेत पारदर्शकता राखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभवते. या प्रकारची पारदर्शकता भ्रष्टाचार, शोषण आणि दुरुपयोग यांना आळा घालण्यासाठी आवश्यक आहे.
    केंद्रीय माहिती आयोगात एक मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त आणि 10 माहिती आयुक्त असतात. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधानाच्या अध्यक्षतेत समितीकडून शिफारसीनंतर भारताचे राष्ट्रपती करतात.
    एखाद्या प्रकरणाला योग्य आधार असल्यास आयोग तपासाचे आदेश देऊ शकतो. आयोगाकडे सार्वजनिक प्राधिकरणाद्वारा आपल्या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरक्षित करण्याचे अधिकार आहेत. जर सार्वजनिक प्राधिकरण या कायद्याच्या तरतुदींना पूर्ण करीत नसेल तर आयोग समानता आणण्यासाठी पावले उचलण्याची शिफारस करू शकतो.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 25 February 2019 Marathi |     25 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    संदिग्ध हालचालींचा मागोवा घेण्यासाठी IAF ची नवी हवाई निगरानी यंत्रणा

    आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्र व घनदाट वन क्षेत्रात संदिग्ध हालचालींचा मागोवा घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने (IAF) एक हवाई निगरानी यंत्रणा (aerial surveillance system) तयार करण्यास सुरुवात केली आहे.
    हवाई निगरानी यंत्रणा हा हवाई दलाचा हायपर स्पेक्ट्रल इमेजरी कार्यक्रम आहे. देशासाठी प्रथमच हा असा कार्यक्रम पुढील दोन वर्षांत कार्यरत करण्याचे अपेक्षित आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 25 February 2019 Marathi |     25 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    बांधकाम उद्योग क्षेत्रावरील GST दर 5% एवढा केला: 33वी GST परिषद

    वस्तू व सेवा कर परिषदेच्या 33 व्या बैठकीत बांधकाम उद्योग क्षेत्राबाबत (रिअल ईस्टेट) GST दर ठरविण्यात आले आहेत.
    नव्या दरानुसार, बांधकामाखाली असलेल्या घरांसाठी हा दर सध्याच्या 12 टक्क्यांवरून 5 टक्के (इनपुट टॅक्स क्रेडिट शिवाय) एवढा कमी करण्यात आला आहे. तर स्वस्त घरांसाठी हा दर सध्याच्या 8 टक्क्यांवरून 1% एवढा करण्यात आला आहे.
    याव्यतिरिक्त, मेट्रो शहरांमध्ये 60 चौरस मीटरचे चटई क्षेत्र (carpet area) असलेले आणि 45 लक्ष रुपयांपर्यंतचे घर स्वस्त घराच्या श्रेणीत मोडतील. नॉन-मेट्रो शहरांमध्ये 90 चौरस मीटरचे चटई क्षेत्र (carpet area) असलेले आणि 45 लक्ष रुपयांपर्यंतचे घर स्वस्त घराच्या श्रेणीत मोडतील.
    नवे दर आणि निर्णय दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी लागू केले जाणार आहेत.
    बांधकाम उद्योग क्षेत्राबाबत कराची रचना
    एखादी सुंदर व अवघड इमारत, एखादे प्रचंड बांधकाम किंवा त्यांचा एखादा भाग संपूर्ण किंवा तुकड्यात विकायला काढला तर इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) नुसार 12% कर आकारून विकावा लागतो, तसेच जर ITC वाढला तर कराचा परतावा मिळत नाही. निवासी बांधकाम सेवेनुसार वस्तू सेवा कर हा 12% लावला जात आहे.
    सर्व परवडणाऱ्या घरांना वस्तू सेवा कर हा 8% आहे, तो इनपुट खरेदी नुसार समायोजित केला जातो. क्रेडिट क्लेम इनपुट केल्यानंतर जर अपार्टमेंटच्या किमती कमी केल्या तरच गृह खरेदीदारावर वस्तू सेवा कर लादला जाऊ शकतो.
    वस्तू व सेवा कर (GST)
    हा एक अप्रत्यक्ष कर आहे, जो 1 जुलै 2017 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आला, ज्याने केंद्र व राज्य शासनांनी आकारलेल्या विविध करांचा त्याग केला. संविधान (101 वी दुरूस्ती) कायदा 2017 म्हणून GST सादर करण्यात आले. GST हे GST परिषदेद्वारे संचालित केले जाते आणि त्याचे अध्यक्ष भारताचे वित्तमंत्री आहेत. GST अंतर्गत वस्तू व सेवांवर 0%, 5%, 12%, 18% आणि 28% या दरांनी कर लागू आहेत. फ्रान्स हा GST ची अंमलबजावणी करणारा जगातला पहिला देश आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 25 February 2019 Marathi |     25 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    91वे अकादमी पुरस्कार (ऑस्कर)

    अमेरिकेच्या इनिडा येथे हॉलीवुड चित्रपट सृष्टीतला सर्वात प्रतिष्ठित अश्या 91 व्या अकादमी (ऑस्कर) पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.
    त्यात बोहेमियन रॅप्सोडी या चित्रपटाला मुख्य भूमिकेतला सर्वोत्कृष्ट अभिनेता, फिल्म एडिटिंग, साऊंड डिझाइन, साऊंड एडिटिंग हे सर्वाधिक चार पुरस्कार प्राप्त झाली आहेत.
    पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -
    • सर्वोत्कृष्ट चित्रपट : ग्रीन बुक 
    • सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट : रोमा 
    • मुख्य भूमिकेतला सर्वोत्कृष्ट अभिनेता : रामी मालेक (बोहेमियन रॅप्सोडी)
    • मुख्य भूमिकेतली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : ओलिविया कोलमन (द फेवरेट)
    • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अलफॉन्सो क्यूरॉन (रोमा) 
    • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म : स्पाइडर-मॅन: इनटू द स्पाइडर-वर्स 
    • सर्वोत्कृष्ट लघुपट शॉर्ट सब्जेक्ट : पिरीयड. एंड ऑफ सेंटेस 
    • सर्वोत्कृष्ट विज्यूयल इफेक्ट : फर्स्ट मॅन 
    • सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : स्किन 
    • सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : ग्रीन बुक 
    • सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रीनप्ले : BLACKkKLANSMAN 
    • सर्वोत्कृष्ट ऑरिजनल स्कोर : ब्लॅक पॅन्थर 
    • सर्वोत्कृष्ट ऑरिजनल सॉन्ग : शालो 
    • सर्वोत्कृष्ट पेहराव : रुथ कार्टर 
    • सर्वोत्कृष्ट सिनेमटॉग्राफी : रोमा 
    ऑस्कर पुरस्काराबद्दल
    "ऑस्कर पुरस्कार" या नावाने ओळखला जाणारा अकादमी पुरस्कार हा अमेरिकेतल्या चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा आणि चित्रपटांचा सन्मान करण्यासाठी ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ (AMPAS) तर्फे 24 कलात्मक आणि तांत्रिक पुरस्कार श्रेणींमध्ये दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. पुरस्काराच्या स्वरुपात विजेत्याला पुतळ्याचे सन्मानचिन्ह (अकॅडेमी अवॉर्ड ऑफ मेरिट) दिले जाते.
    दिनांक 11 मे 1927 रोजी ‘अकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. प्रथम पुरस्कार सोहळा 1929 साली आयोजित केला गेला होता. 1930 साली पुरस्कार सोहळा पहिल्यांदा रेडिओ वर प्रसारित केला गेला होता आणि 1953 साली याचे प्रथमच दूरदर्शन (TV) प्रक्षेपण केले गेले होते.
    सन्मानचिन्हाचा इतिहास
    • "ऑस्कर” ची मूळ रचना MGM कला दिग्दर्शक सेडरीक गिबोन्स यांच्याकडून करण्यात आली होती. प्रारंभीक चिन्हात एक नाइट (सैनिक) हातात तलवार आणि चित्रपटफिती घेऊन उभा आहे असे दृश्य असलेला पुतळा होता.
    • नवीन चिन्ह शिकागो मधील पुरस्कार बनवणारी RS ओवेन्स अँड कंपनी कडून 1982 सालापासून बनवण्यात येत आहे. प्रतिमेची उंची 13½ इंच आहे आणि वजन 8½ पाउंड असते. प्रतिमा ब्रिटानिया धातूपासून बनविली जाते. त्यावर तांबे, निकेल, चांदी आणि शेवटी 24 कॅरेट सोन्याचा मुलामा चढविण्यात येतो.
    91वे अकादमी पुरस्कार (ऑस्कर)

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 25 February 2019 Marathi |     25 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    दिल्लीत ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ राष्ट्राला समर्पित

    शहीद सैनिकांच्या सन्मानार्थ देशाचे पहिले ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ तयार करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत इंडिया गेटजवळ 40 एकरच्या क्षेत्रफळातले हे स्मारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2019 रोजी राष्ट्राला समर्पित केले.
    देशरक्षणासाठी शहीद झालेल्या 25 हजार 942 पेक्षा जास्त वीर जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक बनवले आहे. त्याला लागूनच प्रस्तावित राष्ट्रीय युद्ध संग्रहालयाचे बांधकाम केले जाणार आहे.
    षटभुज आकारातल्या या स्मारकाच्या केंद्रस्थानी 15 मीटर उंच स्मारक स्तंभ तयार केला आहे. त्यावर भित्तीचित्र, ग्राफिक पॅनल, शहिदांची नावे आणि 21 परमवीर चक्र विजेत्यांच्या मूर्ती आहेत. स्मारक चार चक्रांवर केंद्रित आहे - अमर चक्र, शौर्य चक्र, त्याग चक्र, रक्षक चक्र. त्यात भूदल, नौदल आणि वायुदलाच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. शहिदांची नावे भिंतीच्या विटांवर कोरली आहेत.
    इंग्रजांनी पहिल्या महायुद्धात शहीद भारतीयांच्या स्मृतीत 1931 साली इंडिया गेट बनवले होते. 1971 सालच्या युद्धात शहीद झालेल्या 3843 सैनिकांच्या सन्मानार्थ अमर जवान ज्योत बनवली होती.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 25 February 2019 Marathi |     25 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    No comments:

    Post a Comment

    Menu

    Contact Form

    Name

    Email *

    Message *