Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, February 23, 2019

    Current affairs 23 February 2019 Marathi | 23 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219
    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 23 February 2019 Marathi |     23 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    करीना कपूर खान: SIIच्या ‘स्वस्थ इम्युनाईज्ड इंडिया’ मोहिमेची दूत

    अभिनेत्री करीना कपूर खान यांची ‘स्वस्थ इम्युनाईज्ड इंडिया’ मोहिमेची दूत (ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    ‘स्वस्थ इम्युनाईज्ड इंडिया’ मोहिमेच्या अंतर्गत लहान मुला-मुलींच्या लसीकरणाबाबत जागरुकता पसरवून महिलांना शिक्षित केले जाणार आहे.
    लसी तयार करणारी जगातली सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)’ कडून लसीकरण आणि रोगक्षमीकरण संदर्भातली ही राष्ट्रव्यापी जागृती मोहीम चालवली जात आहे.
    सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया
    ही भारतातली लसींचा समावेश असलेल्या रोगप्रतिकारक औषधांचे उत्पादन घेणारी निर्माती कंपनी आहे. ही कंपनी पुनावाला समूहाकडून व्यवस्थापित केली जाते, जी पूर्णपणे सायरस पुनावाला यांच्या मालकीची आहे. 1966 साली या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 23 February 2019 Marathi |     23 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    ‘भारतीय मुद्रांक अधिनियम-1899’ यामध्ये दुरूस्ती करण्यास राष्ट्रपतींची संमती

    भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ‘भारतीय मुद्रांक अधिनियम-1899’ यामध्ये प्रस्तावित दुरूस्ती करण्यास आपली संमती दिली आणि त्यासंबंधी विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.
    प्रस्तावित दुरूस्तीमुळे मुद्रांक शुल्क आकारण्यासंबंधीची यंत्रणा तर्कसंगत आणि सुसंगत करण्यासाठी आणि कर चुकवेगीरीला आळा घालण्यासाठी मदत होणार. 
    कायद्यामधील ही दुरुस्ती ‘वित्त अधिनियम-2019’ याचा एक भाग म्हणून सादर करण्यात आली होती आणि संसदेकडून मंजूर केली गेली. 
    एका इन्स्ट्रुमेंटवर (म्हणजे समभाग, IPO/FPO इ.) एकाच संस्थेद्वारे एकाच जागी सिक्युरिटीज मार्केट इन्स्ट्रुमेंट्सवरील मुद्रांक शुल्क (stamp duty) गोळा करण्यास राज्यांना सक्षम करण्यासाठी कायदेशीर आणि संस्थात्मक यंत्रणा तयार करणे हा या दुरुस्तीचा उद्देश आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 23 February 2019 Marathi |     23 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    मध्यप्रदेश राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना’

    मध्यप्रदेश राज्य सरकारने दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजी 'मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना' लागू करण्यास सुरुवात केली आहे.
    योजनेचे स्वरूप 
    • योजनेच्या अंतर्गत समाजाच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटात मोडणार्‍या शहरी युवक-युवतींना वर्षभरात 100 दिवस रोजगार उपलब्ध करवून देण्याची हमी दिली गेली आहे.
    • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष रुपयांपेक्षा कमी असल्यास आणि 21-30 वर्षे या वयोगटातले युवक-युवती या योजनेसाठी पात्र असतील.
    • योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या युवक-युवतींना नियोजित 100 दिवसांच्या कालावधीत दरमहा 4,000 रुपये अनुदान मिळणार. म्हणजेच 100 दिवसांमध्ये प्रत्येकी एकूण 13,500 रुपयांची कमाई होणार.
    • योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या युवक-युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 23 February 2019 Marathi |     23 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    डॉ. दिव्या कर्नाड यांना नेदरलँडचा प्रतिष्ठित ‘फ्यूचर फॉर नेचर 2019 पुरस्कार’ जाहीर

    अशोक विद्यापीठाच्या पर्यावरण-विषयक अभ्यासाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. दिव्या कर्नाड यांना अन्य दोघांसोबत प्रतिष्ठित ‘फ्यूचर फॉर नेचर 2019 पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
    फर्नांड आब्रा (ब्राझील) आणि ऑलिव्हिएर सेंजीमाना (रवांडा) यांना देखील हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार नेदरलँडमध्ये 3 मे 2019 रोजी एका सोहळ्यात दिला जाणार आहे.
    शार्क आणि ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या शाश्वत मासेमारीसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. डॉ. कर्नाड यांनी ‘इनसिजन फिश’ या त्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताच्या कोरोमंडल तटाजवळ होणार्‍या शार्कच्या अवाजवी मासेमारीला आळा घालण्यात यश मिळवले.
    पुरस्काराविषयी
    ‘फ्यूचर फॉर नेचर पुरस्कार’ वन्य प्राणी-वनस्पती प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यांसाठी नेदरलँडच्या सरकारकडून दिला जाणारा एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. पुरस्कारासोबत 50,000 युरो (जवळपास 40.28 लक्ष रुपये) एवढी बक्षीसाची रक्कम विजेत्याला दिली जाते.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 23 February 2019 Marathi |     23 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    पाकिस्तानात वाहून जाणार्‍या पाण्यातला भारताचा संपूर्ण वाटा उपयोगात आणला जाणार

    ‘सिंधू पाणीवाटप’ करारानुसार भारताच्या वाट्याचे पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी रोखून त्याचा वापर करण्यासंदर्भात केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने आराखडा जाहीर केला आहे.
    तयार केलेल्या योजनेत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कसे पाणी रोखता येईल, याविषयी माहिती देण्यात आली आहे. या पाण्याचा उपयोग जम्मू-काश्मीर आणि पंजाब राज्यासाठी केला जाणार आहे.
    पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी पुढील प्रकल्पांचे बांधकाम केले जात आहे,
    • शाहपूरकंडी प्रकल्प - थेन जलविद्युत प्रकल्पातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करणार. या पाण्यातून जम्मू-काश्मीर व पंजाबमधील 37 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते.
    • रावी नदीची उपनदी असणाऱ्या उझ या नदीवर आणखी एक धरण बांधण्यात येणार आहे. यामध्ये 781 दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्यात येणार असून, त्याचा वापर सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी करण्यात येईल.
    • रावी आणि बियास नद्या एकत्र जोडून त्याचे पाणी अन्यत्र वळविण्याचा विचार आहे.
    या तिन्ही प्रकल्पांमधून सिंधू जलवाटप करारातील भारताच्या वाट्याचे सर्व पाणी वापरता येणार आहे. 
    भारत आणि पाकिस्तान यांचा सिंधू जलवाटप करार
    दिनांक 19 सप्टेंबर 1960 रोजी झालेल्या या करारानुसार, प्रमुख सहा नद्यांपैकी सिंधू, झेलम आणि चिनाब या (पूर्वेकडील) तीन नद्यांचे पाणी (13.5 कोटी एकर फूट) पाकिस्तानला मिळते. तर, रावी, सतलज आणि बियास या (पश्चिमेकडील) तीन नद्यांचे पाणी भारताला वापरता येते. या तीन नद्यांमध्ये सरासरी 3.3 कोटी एकर फूट पाणी असते.
    रावी, सतलज आणि बियास या तीन नद्यांवर भारताने भाक्रासह विविध धरणे बांधली आहेत. तसेच, बियास-सतलज जोडकालवा, माधोपूर-बियास जोडकालवा, इंदिरा गांधी नहर प्रकल्प यांसारख्या प्रकल्पही आहेत. या सर्व प्रकल्पांमधून भारताच्या वाट्याच्या नद्यांपैकी 95% पाण्याचा वापर होतो. दरम्यान, रावी नदीच्या 20 लक्ष एकर फूट पाण्याचा वापर होत नाही आणि हे पाणी पाकिस्तानात वाहून जात आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 23 February 2019 Marathi |     23 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    EESL याचा नवा ‘सुपर-एफिसियन्ट वातानुकूलन कार्यक्रम’

    ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (EESL) कडून दिल्लीच्या BSES या कंपनीच्या कार्यक्षेत्रातल्या रहिवासी आणि संस्थात्मक ग्राहकांसाठी नवा ‘अत्याधिक-कार्यक्षम वातानुकूलन कार्यक्रम’ (Super-Efficient Air Conditioning program) याचा शुभारंभ करण्यात आला आहे.
    या कार्यक्रमाच्या अंतर्गत विक्री केल्या जाणार्‍या अत्याधिक-कार्यक्षम अश्या वातानुकूलक यंत्रणा (Air Conditioners) सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या 3-स्टार वातानुकूलक यंत्रणेच्या (ISEER 3.8) तुलनेत 40 टक्क्यांहून अधिक कार्यक्षम आहे आणि महत्त्वाचे म्हणजे त्याची किंमत देखील कमी परवडण्याजोगी आहे.
    या व्यतिरिक्त, या उपक्रमामुळे दोन्ही ऊर्जा संस्थांमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित करून दक्षिण आणि पश्चिम दिल्लीतल्या सर्वोच्च वीज मागणीत 22 मेगावॉट (MW) ने घट करण्यास मदत होईल.
    कार्यक्रमाचे स्वरूप
    EESL आणि BSES या दोन उपक्रमांनी 12 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘अत्याधिक-कार्यक्षम वातानुकूलन’ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी करार केलेला आहे, ज्याद्वारे BSES राजधानी पॉवर लिमिटेड (BRPL) मागणी आणि स्थानिक विपणन वाढविण्यास तसेच सध्या सेवा देत असलेल्या त्यांच्या क्षेत्रांमध्ये ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानास प्रोत्साहन देण्यासाठी मदत करणार. त्यातून दक्षिण आणि पश्चिम दिल्लीमधील सुमारे 25 लक्ष ग्राहकांना सामावून घेतले जाईल.
    • ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (EESL) स्त्रोत, पुरवठा, तक्रारीचे व्यवस्थापन आणि निराकरण तसेच उत्पादनांसाठी वारंटी उत्तरदायित्वाची पूर्तता यासंबंधित सर्व कार्ये करणार आहे.
    • कार्यक्रमाला आशियाई विकास बँक (ADB) कडून आवश्यक कर्ज पुरवठा केला जात आहे. तर, संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP) कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य प्रदान करीत आहे.
    • कार्यक्रमासाठी ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (EESL) 150 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. कार्यक्रमासाठी लागणार्‍या गुंतवणूकीमध्ये ‘ग्लोबल एन्विरोंमेन्ट फॅसिलिटी’ (GEF) कडून देखील अंशतः वित्तपुरवठा केला जाणार आहे.
    ग्लोबल एन्विरोंमेन्ट फॅसिलिटी (GEF) ही जागतिक पर्यावरण-विषयक समस्येचे निराकरण करण्यासाठी 1992 साली झालेल्या ‘रियो पृथ्वी’ शिखर परिषदेदरम्यान स्थापन करण्यात आलेली एक स्वतंत्र वित्तीय यंत्रणा आहे. देश, आंतरराष्ट्रीय संस्था, सामाजिक संस्था आणि खासगी क्षेत्र असे 183 सदस्य GEFचे आंतरराष्ट्रीय भागीदार आहेत.
    ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (Energy Efficiency Services Limited -EESL) हे भारत सरकारच्या वीज मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या NTPC लिमिटेड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि पावरग्रीड या चार राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा एक संयुक्त उपक्रम आहे. ही जगातली सर्वात मोठी सार्वजनिक ऊर्जा सेवा कंपनी आहे. ऊर्जा कार्यक्षमता संबंधित प्रकल्पांना सुविधा पुरविण्यासाठी भारत सरकारच्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीत या कंपनीची 2009 साली स्थापना करण्यात आली.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 23 February 2019 Marathi |     23 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    सात राज्यांमध्ये 8 विमानतळांचे उद्घाटन करण्यात आले

    केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या सात राज्यांमधील उड्डयन क्षेत्राशी संबंधित विविध पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.
    प्रकल्पांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -
    • केरळ राज्यामधले त्रिवेंद्रम विमानतळ आणि कलिकट विमानतळ
    • कर्नाटक राज्यामधले मंगळुरु विमानतळ
    • तामिळनाडू राज्यामधले मदुराई विमानतळ
    • आसाम राज्यामधले रुपसी विमानतळ
    • राजस्थान राज्यामधले जयपूर विमानतळ
    • पंजाब राज्यामधले अमृतसर विमानतळ
    • मणीपूर राज्यामधले इम्फाळ विमानतळ
    वरील सर्व विमानतळे भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) कडून व्यवस्थापित केली जाणार आहेत. जागतिक दर्जाप्रमाणे विमानतळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी या 8 विमानतळांसाठी 620 कोटी रुपये एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
    यावर्षी जानेवारीत मुंबईत झालेल्या जागतिक उड्डयन शिखर परिषदेत "फ्लाइंग फॉर ऑल" या संकल्पनेवर आधारित “व्हिजन 2040” या शीर्षकाखाली एक दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आले. त्यामध्ये असा अंदाज वर्तवला गेला आहे की, कमीतकमी 1.1 अब्ज प्रवाशांना परदेशाकडे आणि देशांतर्गत हवाई प्रवास करण्यासाठी भारताला 200 विमानतळांची आवश्यकता आहे, ज्यामध्ये अंदाजे 40 ते 50 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आवश्यक आहे. 

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 23 February 2019 Marathi |     23 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    OFBला भारतीय लष्करासाठी 114 'धनुष्य' तोफा तयार करण्यास परवानगी मिळाली

    आयुध कारखाना मंडळाला (OFB) भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून लष्करासाठी 114 'धनुष्य' तोफेच्या निर्मितीसाठीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.
    'धनुष्य' तोफ
    'धनुष्य' ही भारतातच तयार केली गेलेली पहिली दूरवर मारा करणारी तोफ आहे. 155 MMची ही तोफ वाळवंट, डोंगराळ प्रदेशात सहजरीत्या प्रस्थापित करता येण्याजोगी आहे. ही तोफ OFB आणि भारतीय लष्कराचे संयुक्त उत्पादन आहे.
    स्वदेशी ‘धनुष्य’ तोफ 1980 च्या दशकात भारताने खरेदी केलेल्या स्वीडिश बोफोर्स तोफेची सुधारीत आवृत्ती आहे. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि खाजगी क्षेत्राने एकत्रितपणे विकसित केलेल्या अॅडव्हान्स टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGS) म्हणजेच ‘धनुष्य’ तोफेने 48 किलोमीटर अंतरावरचे लक्ष्य भेदून नवा विक्रम केलेला आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 23 February 2019 Marathi |     23 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment