Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, February 22, 2019

    Current affairs 22 February 2019 Marathi | 22 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219
    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 22 February 2019 Marathi |     22 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    निवृत्त न्या. डी. के. जैन: BCCIचे पहिले लोकपाल

    सर्वोच्च न्यायालयाकडून ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) याचे पहिले लोकपाल (Ombudsman) म्हणून निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हार्दिक पांडय़ा आणि लोकेश राहुल यांच्याविरुद्धच्या याचिकेच्या सुनावणीत BCCIवर लोकपाल नियुक्त करावा अशी मागणी करण्यात आली होती.
    भारतीय क्रिकेट नियामक मंडळासंदर्भात तक्रारींच्या निवारणाची जबाबदारी नव्या लोकपालाकडे असणार आहे.
    भारतीय क्रिकेट निया मंडळ (BCCI) याची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर 1928 मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 22 February 2019 Marathi |     22 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    लॉरियस विश्व क्रिडा पुरस्कार 2019


    दिनांक 21 फेब्रुवारी 2019 रोजी मोनॅको देशाच्या मॉन्टे कार्लो शहरात चौथा ‘लॉरियस विश्व क्रिडा पुरस्कार 2019’ हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
    यंदा नोव्हाक जोकोव्हिचने चौथ्यांदा लॉरियस वर्षातला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. तर लंडनच्या आर्सेनल फूटबॉल क्लबचे व्यवस्थापक असलेले ‘आर्सेन वेंगर’ यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला.
    विजेत्यांची नावे -  
    श्रेणीविजेता
    वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयरनोव्हाक जोकोव्हिच (सर्बियाचा टेनिसपटू)
    वर्ल्ड स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरसिमोने बिल्स (अमेरीकेची जिमनॅस्टीकपटू)
    कमबॅक ऑफ द इयरटाइगर वूड्स (अमेरीकेचा गोल्फपटू)
    टीम ऑफ द इयरफ्रान्स (दोनदा जिंकणार प्रथम राष्ट्रीय संघ)
    स्पोर्टिंग मोमेंट ऑफ द इयरशीआ बोयु (चीनी पर्वतारोही)
    ब्रेकथ्रू ऑफ द इयरनाओमी ओसाका (जपानची टेनिसपटू)
    स्पोर्ट्सपर्सन वीथ ए डिसॅबिलिटीहेनरीएटा फर्कासोव्हा (स्लोव्हाकियाची स्की खेळाडू)
    अॅक्शन स्पोर्टपर्सन ऑफ द इयरक्लोई किम (अमेरीकेची स्नोबोर्ड खेळाडू)
    अकॅडेमी एक्ससेप्शनल अचीवमेंट पुरस्कारएलियुड किपचोगे
    स्पिरीट फॉर स्पोर्ट पुरस्कारलिंडसे वॉन (स्की खेळाडू)
    स्पोर्ट फॉर गुड पुरस्कारयुवा (झारखंडचा भारतीय फूटबॉलपटू)
    पुरस्काराविषयी
    लॉरियस विश्व क्रिडा पुरस्कार हे क्रिडा विश्वात वैयक्तिक वा संघाला त्याच्या वर्षातल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार आहे. हे पुरस्कार लॉरियस स्पोर्ट फॉर गुड फाउंडेशन या अमेरीकेच्या ना-नफा संस्थेकडून दिले जातात. 1999 साली पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 22 February 2019 Marathi |     22 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    OFBने भारतीय लष्करासाठी 114 'धनुष्य' तोफेचे उत्पादन घेण्यास परवानगी दिली

    आयुध कारखाना संचालक मंडळाने (OFB) भारतीय लष्करासाठी 114 'धनुष्य' तोफेच्या निर्मितीसाठीच्या प्रस्तावास आपली मंजुरी दिली आहे.
    'धनुष्य' तोफ
    'धनुष्य' ही भारतातच तयार केली गेलेली पहिली दूरवर मारा करणारी तोफ आहे. 155 MMची ही तोफ वाळवंट, डोंगराळ प्रदेशात सहजरीत्या प्रस्थापित करता येण्याजोगी आहे. ही तोफ OFB आणि भारतीय लष्कराचे संयुक्त उत्पादन आहे.
    स्वदेशी ‘धनुष्य’ तोफ 1980 च्या दशकात भारताने खरेदी केलेल्या स्वीडिश बोफोर्स तोफेची सुधारीत आवृत्ती आहे. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि खाजगी क्षेत्राने एकत्रितपणे विकसित केलेल्या अॅडव्हान्स टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGS) म्हणजेच ‘धनुष्य’ तोफेने 48 किलोमीटर अंतरावरचे लक्ष्य भेदून नवा विक्रम केलेला आहे.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 22 February 2019 Marathi |     22 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी



    ट्रकद्वारे होणार्‍या हरितगृह वायूच्या उत्सर्जनात 30% कपात करण्यास युरोपीय संघ सहमत

    नव्या बस आणि ट्रकद्वारे होणार्‍या हरितगृह वायूच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात 2030 सालापर्यंत 30% कपात करण्यासाठी युरोपीय संघाने आपली वचनबद्धता दर्शविलेली आहे.
    सरासरी कार्बन डाय-ऑक्साइडचे (CO2) उत्सर्जन 2019 सालच्या तुलनेत कमी केले जाईल. शिवाय 2025 सालापर्यंत उत्सर्जनात 15% घट करण्याचे उद्दीष्ट देखील ठेवले आहे आणि उद्योगांना उत्सर्जन कमी करणारे ट्रक बनविण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे. सध्या अमेरीका, चीन, जपान आणि कॅनडासारख्या देशांप्रमाणे युरोपीय संघात जड वाहनांच्या उत्सर्जनाबाबत मानदंड नाहीत.
    युरोपीय संघ (EU) हा 28 सदस्य राज्यांचा राजकीय आणि आर्थिक संघ आहे, जे प्रामुख्याने युरोप खंडात आहेत. युरोपीय संघाची स्थापना 1 नोव्हेंबर 1993 रोजी झाली आणि याचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे.
    संघात असलेले देश – ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लाटविया, लिथुआनिया, लेक्सम्बर्ग, माल्टा, नेदरलँड, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन आणि ब्रिटन.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 22 February 2019 Marathi |     22 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    अमेरीकेच्या सरकारने अंतराळ दल तयार करण्याचे निर्देश दिले

    संयुक्त राज्ये अमेरीकाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळ दल (स्पेस फोर्स) हे देशाचे सहावे सशस्त्र दल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी त्यासंबंधीच्या ‘स्पेस पॉलिसी डायरेक्टिव्ह-4’ (SPD-4) या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली.
    आदेशानुसार पेंटागन आता पायदळ, नौदल, हवाई दल, मरीन आणि तटरक्षक यांच्यासोबतच सैन्याची सहावी शाखा म्हणून स्पेस फोर्सची स्थापना करणार आहे.
    संयुक्त राज्ये अमेरीका (USA/US/अमेरीका) हा उत्तर अमेरीका उप-खंडातला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि अमेरीकी डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 22 February 2019 Marathi |     22 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    सिकारीया मेगा फूड पार्कचे प्रा. लिमि.: त्रिपुरातले प्रथम मेगा फूड पार्क

    दिनांक 19 फेब्रुवारी 2019 रोजी टुलाकोना (आगरतळा जिल्हा) या गावात उभारलेल्या ‘सिकारीया मेगा फूड पार्कचे प्रा. लिमि.’ याच्या परिसराचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे त्रिपुरा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क आहे.
    87.45 कोटी रुपये खर्चून 50 एकरच्या भूखंडावर हा फूड पार्क उभारण्यात आला आहे. येथे 5000 MT (मेट्रिक टन) साठवण क्षमतेसह ड्राय वेअरहाऊस, अननसासाठी कॅनिंग आणि पल्पिंग लाइन, पॅकिंग युनिट, उबवण केंद्र, शीतगृह, संशोधन व विकास केंद्र इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
    भारत सरकारच्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या मेगा फूड पार्क योजनेच्या अंतर्गत प्रत्येक मेगा फूड पार्क प्रकल्पाला 50 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाते. मेगा फूड पार्क ही योजना "समूह" पध्दतीवर आधारित आहे. पार्कमध्ये विशेषत: पुरवठा साखळीसाठी पायाभूत सुविधा, ज्यामध्ये संकलन केंद्रे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, केंद्रीय प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी आणि उद्योजकांसाठी 30-35 पूर्ण विकसित भूखंडासकट अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची सोय असते. मेगा फूड पार्क प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) कडून व्यवस्थापीत केले जाते, जे कंपनी कायद्याच्या अंतर्गत नोंदणीकृत कॉर्पोरेट मंडळ असते. 

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 22 February 2019 Marathi |     22 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment