‘संविधान (103 वी दुरूस्ती) अधिनियम-2019’ यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ‘संविधान (103 वी दुरूस्ती) अधिनियम-2019’ यावर स्वाक्षरी करून त्याला मान्यता दिली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सार्वजनिक क्षेत्रात नोकर्या आणि उच्च शिक्षणामध्ये आरक्षण प्रदान करण्याचा या कायद्याचा हेतू आहे. या कायद्यामधून संविधानाच्या अनुच्छेद क्र. 15 आणि 16 मध्ये कलम (6) जोडले गेले.
सार्वभौमिक सुवर्ण कर्जरोखे योजना 2018-19 (शृंखला 5)
भारत सरकारने ‘सार्वभौमिक सुवर्ण कर्जरोखे योजना 2018-19 (शृंखला 5)’ अधिसूचीत केली आहे. प्रति ग्रॅम एकूण 3,214 रुपये इतकी किंमत असलेल्या सार्वभौमिक सुवर्ण कर्जरोख्यांची दि. 14 ते 18 जानेवारी 2019 या कालावधीत विक्री केली करण्याची योजना आहे.
अरुणाचल प्रदेशात भारतातला सर्वात दीर्घ एकपदरी स्टील केबल ब्रिज उभारले
अरुणाचल प्रदेशात भारतामधील 300 मीटर लांबीचा सर्वात दीर्घ असा एकपदरी स्टील केबल सस्पेंशन ब्रिज (पूल) उभारण्यात आले आहे. हा पूल चीनजवळ सियांग जिल्ह्यात सियांग नदीवर उभारण्यात आला आहे. या पूलाला ‘ब्योरुंग पूल’ म्हणून देखील ओळखले जाते.
डिसेंबर 2021 पर्यंत भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम राबवली जाणार: ISRO
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) देशाची पहिली मानवी अंतराळ मोहीम राबविण्याच्या आपल्या योजनेची घोषणा केली आहे. रुबीकॉन प्रकल्पाच्या सहाय्याने ‘गगनयान’ प्रकल्प राबविला जाणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2021 पर्यंत राबविण्याची योजना आहे. गेल्यावर्षी 28 डिसेंबरला केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘गगनयान’ प्रकल्पाला मंजुरी दिली होती आणि या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 10,000 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता.
उझबेकिस्तानात प्रथम ‘भारत-मध्य आशिया संवाद’ संपन्न
दि. 13 जानेवारी 2019 रोजी उझबेकिस्तानच्या समरकंद या शहरात ‘भारत-मध्य आशिया संवाद’ याची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती. भारताचे परराष्ट्र कल्याण मंत्री सुषमा स्वराज या दोन दिवसांच्या उझबेकिस्तान दौर्यावर आहेत. उझबेकिस्तानाचे परराष्ट्र मंत्री अब्दुलाझेझ कमिलोव्ह यांच्या समवेत त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले.
‘EIU लोकशाही निर्देशांक 2018’ यात भारत 41 व्या क्रमांकावर
ब्रिटनमधील ‘इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट’ (EIU) या संस्थेनी त्याचा वार्षिक ‘EIU लोकशाही निर्देशांक 2018’ प्रसिद्ध केला आहे. यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत भारत 7.23 गुणांसह 41 व्या क्रमांकावर आहे. अहवालाच्या या वर्षीच्या अकराव्या आवृत्तीत हे दिसून येते की जगातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात राजकीय भागीदारी वाढत आहे. संपूर्ण आशिया-प्रशांत क्षेत्रामध्ये केवळ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड हे "संपूर्ण लोकशाही" गटात समाविष्ट करण्यात आलेले देश आहे.
अॅल्बी मॉर्केलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू अॅल्बी मॉर्केल याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेटमधील त्याच्या सुमारे 20 वर्षांच्या व्यवसायिक कारकीर्दीत त्याने 58 एकदिवसीय सामने, 50 टी-20 सामने आणि एक कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेकडून खेळला आहे. त्याने एकूण 1,412 धावा काढल्या आणि 77 बळी घेतले आहेत.
No comments:
Post a Comment