OPEC तेल उत्पादन कमी करण्यास सहमत
9 डिसेंबर 2018 रोजी पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना (OPEC) या कच्च्या तेलाचे उत्पादन घेणार्या देशांच्या समूहाची बैठक ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना शहरात संपन्न झाली. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत सर्व देशांनी याबाबत निर्णय घेतला की, उत्पादनात किती अब्ज बॅरलची कपात करायला पाहिजे.
घेतलेल्या निर्णयानुसार, OPEC संघात उत्पादनात दररोज 10-13 लक्ष बॅरलची कपात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र या निर्णयावर रशिया आणि इराण सारखे देश सहमत नाही आहेत.
सद्यपरिस्थिती काय आहे?
कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये एकट्या नोव्हेंबर महिन्यात जवळपास 22% ची घट झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, अलीकडेच अमेरिकेत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढले आहे आणि OPEC देखील मागील 6 महिन्यांमध्ये उत्पादन जवळपास 4% ने वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत कच्चे तेलाचे उत्पादन जवळपास 30% एवढे झाले.
शिवाय ऊर्जासंपन्न असलेल्या कतार या अरब देशाने OPEC मधून जानेवारी 2019 मध्ये बाहेर पडण्याचे जाहीर केले आहे.
जागतिक तेल व्यापारात कतार हा रशिया व इराणनंतर तिसऱ्या क्रमांकावर आला. तेलामुळे कतारची संपत्ती जास्त असून त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थान मिळत गेले. सौदी अरब हा OPECचा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे.
संघटनेविषयी
पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना (Organization of the Petroleum Exporting Countries -OPEC) ही 15 देशांची एक आंतरसरकारी संघटना आहे. या संघटनेची स्थापना पहिल्या पाच सदस्य देशांकडून बगदाद शहरात 1960 साली करण्यात आली. याचे मुख्यालय 1965 सालापासून व्हिएन्ना (ऑस्ट्रीया) या शहरात आहे. ही राष्ट्रे जागतिक तेल उत्पादनाच्या अंदाजे 43% उत्पादन घेतात आणि येथे जगात आढळून येणार्या एकूणच्या 73% तेल साठा आहे.
वर्तमानात असलेले OPECचे सदस्य देश पुढीलप्रमाणे आहेत - अल्जेरिया, अंगोला, इक्वाडोर, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन, इराण, इराक, कुवैत, लिबिया, नायजेरिया, कतार, काँगो प्रजासत्ताक, सौदी अरब, संयुक्त अरब अमीरात आणि व्हेनेझुएला.
खंडानुसार, दोन दक्षिण अमेरिकन, सात अफ्रिकन आणि सहा आशियाई (मध्य पूर्व) देश या समूहात आहेत.
शुभंकर शर्मा: ‘आशियाई टूर ऑर्डर ऑफ मेरिट’ जिंकणारा सर्वात तरुण भारतीय
22 वर्षीय भारतीय तरुण गोल्फर शुभंकर शर्मा यांना ‘आशियाई टूर ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब प्राप्त झाला आहे आणि यासोबतच ते हा किताब प्राप्त करणारे सर्वात तरुण भारतीय गोल्फर ठरले आहे.
शुभंकर शर्मा यांच्या पूर्वी ज्योती रंधावा (सन 2002), अर्जुन अटवाल (सन 2003), जीव मिल्खा सिंग (सन 2006 आणि सन 2008) आणि अनिर्बान लाहिरी (सन 2015) या खेळाडूंनी हा किताब मिळविलेला आहे.
शर्मा या सत्राच्या अजून शेवटच्या दोन स्पर्धा खेळणार आहेत. यापूर्वी त्यांनी हाँगकाँग ओपनमध्ये संयुक्त सहाव्या स्थानी होते. तर त्यांनी क्वींस चषक, मॉरीशस ओपन आणि दक्षिण आफ्रीका ओपन खेळले नव्हते.
‘हेल्थ कॅनडा’च्या शोधानुसार टॅल्कम पाउडर 'विषारी' ठरीत आहे
‘हेल्थ कॅनडा’ या कॅनडा देशामधील सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे करण्यात आलेल्या एका शोधाभ्यासामधून असे दिसून आले आहे की, शरीरावर विशेषत: चेहर्यावर लावला जाणारा टॅल्कम पाउडर गंभीर आरोग्याच्या समस्येला कारणीभूत ठरीत आहे.
हा अहवाल आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC), डॅनिश एनवायरनमेंट प्रोटेक्शन एजन्सी आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) या संस्थांनी तयार केला आहे.
हा अहवाल कॅनडाच्या सरकार पुढील उपाययोजना करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे, ज्यामधून खनिजांचा वापर थांबविण्यास प्रयत्न केले जातील.
अभ्यास काय म्हणतो?
श्वासोच्छवासाद्वारे शरीरात पोहचणारा टॅल्कम पाउडर फुफ्फुसांना हानिकारक आहे तसेच महिलांकडून जननेंद्रियाच्या भागात वापरल्या जाणार्या पाउडरमुळे त्यांच्यामध्ये ‘अंडकोश’ संबंधी कर्करोग उद्भवण्याची शक्यता असते, अश्या संदर्भात एक शोधात्मक अहवाल तयार करण्यात आला आहे.
शिवाय, लहान मुलांसाठी वापरल्या जाणार्या बेबी पाउडर बाबतही ही समस्या आहे. पाउडरमुळे शरीरावरील रोम छिद्रे बुजतात आणि त्यामुळे विविध त्वचेसंबंधी आजार उभवतात.
आज सौंदर्यप्रसाधने, रंग आणि सिरेमिक अश्या विविध क्षेत्रात अश्या खनिजांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतात टॅल्कम पाउडर संबंधी व्यापार जवळपास 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. शोधानुसार, पाउडर असलेल्या उत्पादनांमुळे खोकला, श्वास घेण्यात अडथळा, फुफ्फुसातील पेशी कमी होण्यास कारणीभूत ठरू शकते.
कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्याबाबत तामिळनाडूची मागणी
कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाला (CWMA) पूर्णवेळ अध्यक्ष देण्याबाबत याचिका तामिळनाडूने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
सध्या, केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) अध्यक्षांनी म्हणजेच मसूद हुसैन यांनी कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाचा (CWMA) अतिरिक्त भार सांभाळलेला आहे.
कावेरी नदीच्या तीरावर वसलेल्या कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुदूचेरी यांच्यात न्यायपूर्ण पाणी वाटपासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारकडून ‘कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरण’ याची स्थापना करण्यात आली आहे. कर्नाटकातील तळकावेरीत उगम पावणारी कावेरी नदी 322 किलोमीटर प्रवास करून तामिळनाडूत प्रवेश करते. पुढे तामिळनाडूत 483 किलोमीटर अंतर प्रवास करून बंगालच्या उपसागरास मिळते. कावेरी नदी कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांसाठी पाण्याची पूर्तता करण्यासाठी एक प्रमुख स्त्रोत आहे.
SAARC सनद दिन: 8 डिसेंबर
8 डिसेंबर 2018 रोजी यावर्षीचा 34 वा ‘SAARC सनद दिन’ (SAARC Charter Day) साऊथ एशियन युनिव्हर्सिटी यांच्या नेतृत्वात साजरा केला गेला आहे.
दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघ (South Asian Association for Regional Co-operation -SAARC) समुहाच्या सदस्य राष्ट्रांनी 1985 साली याच दिवशी संघाच्या सनद वर स्वाक्षरी केली होती. या घटनेच्या स्मृतीत हा दिन साजरा केला जातो, ज्यावेळी सर्व देश एकत्र येतात आणि प्रादेशिक प्रश्नांना उजाळा देतात.
साऊथ एशियन युनिव्हर्सिटी (SAU) हे SAARC समुहाच्या आठ सदस्य राष्ट्रांच्या सरकारांनी स्थापन केलेले आणि त्यांच्याकडून व्यवस्थापित केले जाणारे एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे. शैक्षणिक वर्ष 2010 पासून या विद्यापीठाने आपले काम सुरू केले. विद्यापीठ विविध सात विषयक्षेत्रात मास्टर्स आणि एम.फिल/पीएचडी कार्यक्रम चालवते. वर्तमानात याचा एक कायमस्वरूपी परिसर भारतात मैदानगडी (दिल्ली) येथे उभारला जात आहे.
समुहाविषयी -
दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघ (South Asian Association for Regional Co-operation -SAARC) ही एक प्रादेशिक आंतरसरकारी संघटना आहे आणि दक्षिण आशियातल्या देशांची भौगोलिक संघटना आहे. या संघाची 8 डिसेंबर 1985 रोजी ढाकामध्ये स्थापना करण्यात आली. याचे काठमांडू (नेपाळ) येथे मुख्यालय आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश, भुटान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे या संघाचे सदस्य आहेत.
‘मिस वर्ल्ड 2018’: व्हेनेसा पोन्स डी लिऑन (मेक्सिको)
‘मिस वर्ल्ड 2018’चा मुकुट मेक्सिकोच्या व्हेनेसा पोन्स डी लिऑनहिने जिंकला आहे. तर थायलंडची निकोलेन पिशापा उपविजेती ठरली.
व्हेनेसा पोन्स डी लिऑन ही मिस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी पहिलीच मेक्सिकन तरुणी आहे.
चीनच्या सान्या शहरात 68 वी ‘मिस वर्ल्ड 2018’ स्पर्धा आयोजित केली गेली होती. गतवर्षी भारताची सौंदर्यवती मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली होती. त्यामुळे छिल्लरने व्हेनेसाला मिस वर्ल्डचा मुकुट घातला. या स्पर्धेत विविध देशांतील 118 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धेविषयी -
एरिक मोर्ले यांनी ब्रिटनमध्ये ‘मिस वर्ल्ड पिजंट’ नामक स्पर्धा 1951साली सुरू केली. ही सर्वात जुनी हयात असलेली आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धा आहे. ही जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मिस वर्ल्ड विजेती ‘ब्युटि विथ ए पर्पज’ या बोधवाक्यासह अॅम्बेसीडर म्हणून कार्य करते.
No comments:
Post a Comment