Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, December 6, 2018

    Evening News : 6 December 2018 Marathi-Current Affairs इवनिंग न्यूज़ 6 डिसेंबर 2018 मराठी_करंट अफेयर्स

    Views

    MSMEसाठी फ्लोटिंग रेट लोन्ससाठी एक्सटर्नल बेंचमार्कचा RBI चा नवा प्रस्ताव


    भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज घेणाऱ्यांसाठी विभिन्न वर्गीकरणाच्या फ्लोटिंग व्याज दरांना एक्सटर्नल बेंचमार्कसोबत लिंक्ड करण्याच्या निर्णय घेतला आहे. RBI ने MCLR ला एक्सटर्नल बेंचमार्कशी बदलण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या निर्णयाचा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राला सर्वाधिक फायदा होणार आहे.


    RBI ने डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी पॉलिसिजच्या आपल्या विधानात म्हटले आहे, की, दि. 1 एप्रिल 2019 पासून बँका सद्यस्थितीत इंटरनल बेंचमार्क सिस्टम जसे प्राईम लेंडिंग रेट, बेस रेट, मार्जिनल कॉस्ट ऑफ बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) च्या जागेवर एक्सटर्नल बेंचमार्क्सचा वापर करणार आहे.


    RBI च्या नव्या प्रस्तावानुसार पुढीलप्रमाणे कोणताही फ्लोटिंग रेट कर्जाचे बेंचमार्क असू शकते -


    RBI चा रेपो रेट


    भारत सरकारच्या 91 दिवसांच्या ट्रेजरी बिलचे उत्पन्न (FBIL द्वारे उपलब्ध)


    सरकारद्वारे 182 दिवसांच्या ट्रेजरी बिलचे उत्पन्न (FBIL द्वारे उपलब्ध) किंवा


    FBIL द्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेले अन्य बेंचमार्क मार्केट इंट्रेस्ट रेट


    RBIने एक्सटर्नल बेंचमार्कचा प्रस्ताव डॉ. जनक राज यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीच्या सूचनांना स्वीकारुन तयार केला आहे. या समितीचे काम मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) प्रणालीच्या विभिन्न पैलुंचा अभ्यास करणे हे होते.


    या नव्या निर्णयामुळे, गृह, वाहन आणि वैयक्तिक व्याजाशी संबंधित नियमात बदल करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार RBIच्या व्याजदरांमध्ये जर काही बदल करण्यात आले तर अन्य बँकांनाही यासंदर्भात पावले उचलावी लागणार आहेत. म्हणजेच जर RBI रेपो रेटच्या दरांमध्ये घट करणार तर बँकांनाही कर्ज स्वस्त करावे लागेल. यामुळे ग्राहकांच्या इक्वेटेड मंथली इंस्टॉलमेंट (EMI) मध्ये घट होणार आहे. हा निर्णय एप्रिल 2019 मध्ये लागू करण्यात येणार आहे. 


    फ्लोटिंग रेट लोन्ससाठी एक्सटर्नल बेंचमार्कच्या RBIच्या या प्रस्तावामुळे न केवळ MSME क्षेत्राला फायदा होणार आहे, तर फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचाही फायदा होणार आहे.


    सध्या RBI कडून रेपो रेटमध्ये घट करण्यात आली तरीही महागड्या फंडचा हवाला देत व्याज दरांमध्ये अपेक्षेनुसार घट करण्यात येत नव्हती. मात्र, पुढे दि. 1 एप्रिल 2019 पासून एक्सटर्नल बेंचमार्किंग सिस्टमचे पालन अन्य बँकाना करावे लागणार आहे. यामुळे RBI कडून व्याज दरांमध्ये घट किंवा वाढ करण्यात आली तर याचा फायदा कर्ज उचलणाऱ्यांना मिळणार.

    गुजरात सरकारकडून नवा 50 कोटी रूपयांचा STI निधी मंजूर

    गुजरात राज्य सरकारकडून 50 कोटी रुपयांचा विज्ञान व तंत्रज्ञान नवकल्पना (STI) निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी तीन वर्षांकरिता आहे. यासोबतच हा असा पुढाकार घेणारा गुजरात हा देशातला पहिला राज्य बनला आहे.

    राज्यातल्या UGC आणि AICTE मान्यताप्राप्त असलेल्या केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे आणि महाविद्यालयांना 50 लक्ष रुपयांपर्यंतची आर्थिक मदत पुरविण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

    राज्य सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने विज्ञान व तंत्रज्ञान नवकल्पना (STI) यासंबंधी योजना राबविण्यासाठी ‘गुजरात कौन्सिल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ (GUJCOST) या संस्थेची निवड केली आहे.

    राज्याला भेडसावणार्‍या मोठ्या समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी प्रयत्न केले जाणार. विलक्षण प्रतिभा विकसित करणे आणि धोरणात्मक क्षेत्रात संशोधन व विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा निधी खर्च केला जाणार आहे. यामधून कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, जैव-तंत्रज्ञान, पॉलिमर्स आणि विशेष पदार्थ यासारख्या विविध विषयांवर लक्ष्य केंद्रीत केले जाणार.


    कृषी व्यवसाय, ग्रामीण पुनरुत्थान संदर्भात महाराष्ट्राचा “SMART” कार्यक्रम

    दि. 5 डिसेंबर 2018 पासून महाराष्ट्र राज्य सरकारने "SMART (स्टेट ऑफ महाराष्ट्राज अॅग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन)" नावाच्या एका आगळावेगळा कार्यक्रमाला सुरुवात केली आहे.

    हा प्रकल्प पुढील तीन वर्षांमध्ये 10,000 गावांपर्यंत पोहचवला जाणार, ज्यामुळे तीन लक्ष शेतकर्‍यांना फायदा होणार. यामधूनच, महाराष्ट्र राज्यातल्या वित्त पुरवठा लागणार्‍या प्रकल्पांसाठी जवळपास 50 कंपन्यांनी जागतिक बँकेसोबत 2,000 कोटी रुपये इतक्या रकमेच्या भागीदारी करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

    शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे म्हणून कृषी क्षेत्राचे रूपांतरण करण्यासाठी ही प्रकल्पे राबवली जाणार आहेत. कृषी व्यवसाय आणि ग्रामीण पुनरुत्थान संदर्भात प्रकल्पांमध्ये केल्या जाणार्‍या 2,000 कोटी रुपयांच्या ($300 दशलक्ष) गुंतवणूकीत जागतिक बँकेचा 1,500 कोटी रुपये ($210 दशलक्ष), राज्याचा 430 कोटी रुपये इतका वाटा असणार आहे. तर उर्वरित 70 कोटी रुपये निधी ‘व्हिलेज सोशल ट्रांसफॉर्मेशन फाउंडेशन’ याच्या माध्यमातून मिळणार. भागीदारांमध्ये टाटा समूह, वॉलमार्ट इंडिया, अॅमेझोन, ITC, महिंद्रा एग्रो आणि पतंजली अश्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.


    अमेरिकेनी सोमालियामध्ये कायमस्वरुपी राजकीय मिशन पुनर्स्थापित केले

    गेल्या 27 वर्षांनंतर सोमालियामध्ये अमेरिकेनी आपले "कायमस्वरुपी राजकीय मिशन" कार्यालय पुन्हा एकदा उघडले आहे.

    2013 सालापासून शेजारील राष्ट्र केनिया याची राजधानी नैरोबी या शहरात सोमालियाशी संबंधित त्याचे राजकीय मिशन चालवत आहे. त्या ठिकाणाहून अमेरिका त्यांचे सोमालियाशी असलेले अधिकृत व्यवसाय संबंध टिकवत आहे.

    संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिकेतला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.

    सोमालिया हा ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ या प्रदेशात असलेला एक सार्वभौम देश आहे. मोगादिशू ही या देशाची राजधानी आहे. युनायटेड स्टेट्स डॉलर आणि सोमाली शिलिंग ही चलने येथे वापरली जातात. सोमाली आणि अरबी या येथील अधिकृत भाषा आहेत.

    RBI डिजिटल व्यवहारांसाठी लोकपाल नेमणार

    भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डिजिटल व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी लोकपाल नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर RBIच्या पतधोरण समितीने शिक्कामोर्तब केले आहे. हा निर्णय जानेवारी 2019 पासून अंमलात आणला जाणार.

    अहवालानुसार, सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवहारांमध्ये 2017-18 या वर्षात 44.6% ची वाढ झाली आहे. तर या व्यवहारांद्वारे हस्तांतरण करण्यात आलेल्या निधीत 11.9% ची वाढ झाली आहे.

    लोकपाल म्हणजे काय?

    लोकपाल (Ombudsman) म्हणजे असा अधिकारी जो वैयक्तिक तक्रारीची दखल घेत कुठल्याही कंपनी आणि संस्थेची (विशेषत: सार्वजनिक) चौकशी करू शकतो.

    सन 2014 मध्ये ‘लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम-2013’ या कायद्याला संसदेने मंजुरी दिली होती. लोकपाल संस्था कोणत्याही संविधानाच्या आधाराशिवाय चालणारी एक वैधानिक संस्था आहे, जे पंतप्रधान सहित सर्व लोकांच्या भ्रष्टाचाराबाबत तपास करू शकण्यास सक्षम असणार. लोकपाल हे बहुसदस्य असलेले मंडळ आहे, त्यात एक अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य असतील.


    ‘साहित्य अकादमी पुरस्कार 2018’ जाहीर: मराठीचा पुरस्कार म. सु. पाटील यांना

    भारतीय साहित्यविश्वात दिल्या जाणार्‍या ‘साहित्य अकादमी पुरस्कार 2018’ ची घोषणा झाली. साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये यंदा सात कवितासंग्रह, सहा कादंबऱ्या, सहा लघुकथा, तीन समीक्षा आणि दोन निबंध या साहित्यकृतींना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

    पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत -

    • मराठी भाषा - म. सु. पाटील (‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या समीक्षा ग्रंथासाठी)
    • कोंकणी भाषा – परेश नरेंद्र कामत (‘चित्रलिपी’ कविता संग्रह)
    • हिंदी भाषा - चित्रा मुद्गल (‘पोस्ट बॉक्स नं. 203 – नाला सोपारा’ कादंबरी)
    • इंग्रजी भाषा - अनीस सलीम (‘द ब्लाइंड लेडीज डीसेंडेंट्स’ कादंबरी)
    • संस्कृत भाषा - रमाकांत शुक्ल (‘मम जननी’ हा कविता संग्रह)
    • उर्दू भाषा - रहमान अब्बास (‘रोहजीन’ कांदबरी)
    • पंजाबी भाषा - मोहनजीत
    • मैथिली भाषा - वीणा ठाकुर (‘परिणीता’ कथासंग्रह)
    • राजस्थानी भाषा - राजेश कुमार व्यास (‘कविता देवै दीठ’ कविता संग्रह)
    • बांग्ला भाषा - संजीव चट्टोपाध्याय (‘श्रीकृष्णेर शेष कटा दिन’ कहानी संग्रह)
    • गुजराती भाषा – शरीफा विजलीवाला (‘विभाजननी व्यथा’ निबंध संग्रह)
    • सिंधी भाषा – खीमण यू. मुलाणी (‘जिया में टांडा’ कथासंग्रह)
    • बोडो भाषा – ऋतुराज बसुमतारी (‘दोंसे लामा’ कथासंग्रह)
    • डोंगरी भाषा – इंद्रजीत केसर (‘भागीरथ’ कादंबरी)
    • आसामी भाषा – सनंत तांती (‘काइलेर दिनटो आमार हब’ (कविता संग्रह)
    • कन्नड भाषा – के.जी. नागराजप्पा (‘अनुश्रेणी-यजामणिके’ (समीक्षा ग्रंथ)
    • कश्मीरी भाषा – मुश्ताक अहमद मुश्ताक (‘आख’ कथासंग्रह)
    • तामीळ भाषा – एस. रामकृष्णन (‘संचारम’ कादंबरी)
    • तेलगु भाषा – कोलकलुरी इनोक (‘विमर्शिनी’ निबंधमाला)
    • संताली भाषा – श्याम बेसरा (‘जीवी रारेक’ को ‘मारोम’ कादंबरी)
    • ओडिया भाषा – दाशरथी दास (‘प्रसंग पुरूणा भावना नूआ’ (समीक्षा ग्रंथ)
    • नेपाळी भाषा – लोकनाथ उपाध्याय चापागाईं (‘किन रोयौ उपमा’ कथासंग्रह)
    • मल्याळम भाषा – एस. रमेशन नायर (‘गुरुउपउर्णमी’ कविता संग्रह)
    • मणीपुरी भाषा – बुधिचंद्र हैस्नाम्बा (‘डमखैगी वाडमदा’ कथासंग्रह)
    • ‘भाषा सन्मान’ पुरस्कार - डॉ. शैलजा बापट (पुण्याच्या लेखिका)

    डॉ. शैलजा बापट या पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. त्यांनी ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची ‘प्रोफेसर एमिरेट्‌स’ म्हणून निवड करण्यात आली होती.

    पुरस्काराविषयी -

    साहित्य अकादमी पुरस्कार हा 22 अनुसूचित भाषांसह इंग्रजी आणि राजस्थानी अश्या विविध 24 प्रमुख भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. दि. 29 जानेवारी 2016 रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एक लक्ष रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हिंदी, मराठी, उर्दू, आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, इंग्रजी, गुजराती, कोंकणी, कन्नड, मैथिली, मल्याळम, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संताली, सिंधी, तामिळ, तेलगु या भाषांमधील साहित्यांना हा पुरस्कार दिला जातो.



    No comments:

    Post a Comment