आपत्ती व्यवस्थापन ट्रेनचा मागोवा घेण्यासाठी GPS-आधारित उपाययोजना विकसित
भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागाने आपत्ती व्यवस्थापन ट्रेनचे ठराविक स्थान आणि वेग निश्चित करण्यासाठी GPS-आधारित उपाययोजना विकसित केली आहे. मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्वत्र ही सुविधा उपलब्ध होणार.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ही सुविधा सर्व अॅक्सिडेंट रिलीफ ट्रॅन (ARTs), अॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट (ARME) आणि सेल्फ प्रोपेल्ड अॅक्सिडेंट रिलीफ ट्रॅन (SPARTs) मध्ये बसविण्यात आली आहे.
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (GPS) प्रणाली
अंतराळातल्या उपग्रहांच्या साहाय्याने वास्तविक वेळेत एखाद्याचे वास्तविक भौगोलिक स्थान शोधून काढण्यासाठी अमेरिकेने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (GPS) प्रणाली विकसित केली आहे.
सुरूवातीला ही सुविधा अमेरिकेच्या संरक्षण दलाकरिता उपयोगात आणली जात होती आणि आज वर्तमानात ही सेवा व्यवसायिक पातळीवर वापरली जात आहे. 1973 साली अमेरिकेने GPS प्रकल्पाची सुरूवात केली होती आणि 1995 साली पूर्णतः कार्यरत झाली. 1980च्या दशकात नागरिकांच्या वापरासाठी ही सेवा खुली करण्यात आली.
सायकलस्वार वेदांगी कुलकर्णी: सर्वात कमी वेळेत जगभ्रमंती करणारी प्रथम आशियाई व्यक्ती
वयाच्या विसाव्या वर्षी महाराष्ट्राची सायकलपटू वेदांगी कुलकर्णी हिने 29,000 किलोमीटर अंतर सायकलवरून 154 दिवसांमध्ये पार करत 'सर्वात कमी वेळेत जगप्रदक्षिणा घालणारी आशियातली पहिली सायकलपटू' तर 'जगातली तिसरी महिला सायकलपटू' होण्याचा मान पटकावला आहे.
वेदांगी कुलकर्णीने आपल्या या मोहिमेची सुरुवात जेथून केली त्या ऑस्ट्रेलियातल्या पर्थ येथे पुन्हा पोहोचून हा विक्रम पूर्ण केला. वेदांगीने 159 दिवसांमध्ये 14 देशांमधून सायकलिंग केले असून एका दिवसात तिने 300 किलोमीटरहून अधिक अंतर कापले आहे.
महाराष्ट्राच्या या महिलेने आणि सध्या ब्रिटनमधील बोर्नमाऊथ विद्यापीठात शिकणाऱ्या वेदांगीने जुलै 2018 मध्ये पर्थ येथे या परिक्रमेची सुरुवात केली होती.
इटलीची पाओला जिनोट्टी हिने हे अंतर 144 दिवसांमध्ये पार केले असून, डिसेंबर 2018 मध्ये तीन आठवड्यापूर्वीच ब्रिटिश सायकलपटू जेनी ग्रॅहम या सायकलपटूने 124 दिवसांमध्ये पार करण्याचा विक्रम केला होता.
तिरुवईयरू (तामिळनाडू) येथे देशातले पहिले संगीत संग्रहालय उभारले
तिरुवईयरू (तामिळनाडू) येथे भारतातले पहिले संगीत संग्रहालय उभारण्यात आले आहे.
कर्नाटकी संगीताचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व संत त्यागराज यांचे तिरुवईयरू हे जन्मस्थळ आहे. केंद्र सरकारच्या मदतीने हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. संत त्यागराज यांच्याच स्मृतीत दरवर्षी जानेवारी महिन्यात तिरुवईयरू (तामिळनाडू) येथे त्यागराज आराधना संगीत महोत्सव आयोजित केले जाते.
इंडोनेशियाला त्सुनामीचा तडाखा बसल्याने 280 हून अधिक जणांचा मृत्यू
दि. 22 डिसेंबर 2018 रोजी त्सुनामीचा तडाखा बसल्याने इंडोनेशियामध्ये मृतांचा आकडा आतापर्यंत 281 इतका झाला असून एक हजाराहून जास्त लोक जखमी आहेत. आणि अजूनही मृतांचा आकडा वाढत आहे.
22 डिसेंबरला रात्री ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्सुनामी उसळली. या त्सुनामीचा सर्वाधिक फटका जावा व सुमात्रा बेटांदरम्यानच्या सुंदा पट्ट्याला बसला. रात्री 9:30च्या सुमारास समुद्रात अनॅक क्रॅकोटा या ज्वालामुखीचा स्फोट होऊ लागला. त्यानंतर काही वेळातच या बेटांना त्सुनामीचा तडाखा बसला. समुद्रात उसळलेल्या उंच लाटांनी किनाऱ्यांवर धडक दिली. तसेच जागोजागी भूस्खलन झाल्यामुळे अनेकजण अद्याप बेपत्ता असल्याचे समजते.
इंडोनेशिया (दिपांतर प्रजासत्ताक) आग्नेय (दक्षिण पूर्व) आशिया आणि ओशिनिया येथील एक देश आहे. हा 17508 बेटांचा राष्ट्र आहे आणि सुमारे 109 कोटी लोकसंख्येसह जगातला तिसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. जकार्ता या देशाची राजधानी आहे आणि इंडोनेशियन रुपिआह हे चलन आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीत 100 रुपयांचे नाणे
दि. 24 डिसेंबर 2018 रोजी भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीत 100 रुपयांचे नाणे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी दिल्लीत निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांनी 1998-2004 या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारचे नेतृत्व करणारे आणि देशाचे पंतप्रधान बनणारे भारतीय जनता पक्षाचे पहिले व्यक्ती होते. पंतप्रधान पदावर त्यांनी तीनदा (1996 साली काही काळ, 1998-2004 या काळात दोनदा) काम केले.
त्यांचा जन्मदिन 25 डिसेंबरला येतो आणि हा दिवस भाजपाकडून 'सुशासन दिन' म्हणून पाळला जातो. 2014 साली भारत सरकारकडून त्यांना भारत रत्न सन्मान देण्यात आले.
‘अग्नी-4’ क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी
दि. 23 डिसेंबर 2018 रोजी भारताने ‘अग्नी-4’ या अण्वस्त्रक्षम आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले.
जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी-4 या क्षेपणास्त्राचा पल्ला 4000 किलोमीटर असून ते दोन टप्प्यांचे आहे. त्याची लांबी 20 मीटर तर वजन 17 टन आहे.
‘अग्नी’ ची मालिका
स्वदेशी ‘अग्नी’ क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) कडून विकसित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राच्या मालिकेमध्ये आतापर्यंत मारा करण्याच्या शक्तीनुसार 5 प्रकार विकसित करण्यात आले आहेत. ते आहेत –
- अग्नी 1 - 700 किलोमीटरचा मारा पल्ला
- अग्नी 2 - 2000 किलोमीटरचा मारा पल्ला
- अग्नी 3 - 3000 किलोमीटरचा मारा पल्ला
- अग्नी 4 - 4000 किलोमीटरचा मारा पल्ला
- अग्नी 5 - 5000 किलोमीटरचा मारा पल्ला
अग्नी क्षेपणास्त्र याआधीच लष्करामध्ये सामील करण्यात आले असून अत्यंत आधुनिक अशा यंत्रणेने सज्ज आहे.
पॅट्रिक शनाहन: अमेरिकेचे नवे संरक्षण सचिव
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅट्रिक शनाहन यांची अमेरिकेच्या संरक्षण सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे.
ही नियुक्ती जेम्स मॅटिस यांच्या जागी झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जेम्स मॅटिस यांना संरक्षण सचिव पद सोडण्यास भाग पाडले होते.
संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिकेतला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिन: 24 डिसेंबर
ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक कल्याण विभागाकडून देशभरात 24 डिसेंबर ही तारीख ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून पाळला जातो.
यावर्षी "टाइमली डिस्पोझल ऑफ कंझ्युमर कम्पलेंट्स" या संकल्पनेखाली हा दिन पाळला जात आहे.
24 डिसेंबरला राष्ट्रपती यांनी ‘ग्राहक संरक्षण अधिनियम-1986’ याला मान्यता दिली होती. या घटनेच्या स्मृतीत दरवर्षी हा दिन पाळला जातो.
No comments:
Post a Comment