Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, December 14, 2018

    Evening News : 14 December 2018 Marathi-Current Affairs | इवनिंग न्यूज़ 14 डिसेंबर 2018 मराठी_करंट अफेयर्स

    Views

    स्वीडनमध्ये घराबाहेर धुम्रपान करण्यावर बंदी


    क्रिडामैदान आणि रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म अश्या काही विशिष्ट सार्वजनिक ठिकाणी स्वीडनमध्ये धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


    ‘रिक्स्डजेन’ या स्वीडिश संसदेने याविषयी प्रस्ताव संमत केला आहे. ही बंदी दि. 1 जुलै 2019 रोजी लागू केली जाणार आहे.


    वर्तमानात बहुतेक कार्यस्थळी आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याची परवानगी आहे. हा नवा कायदा 2025 सालापर्यंत देशाला धुम्रपानमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून करण्यात आला आहे.


    स्वीडन हा एक स्कँडिनेव्हियन राष्ट्र आहे. देशात हजाराहून अनेक छोटे बेटे आहेत. स्टॉकहोम हे देशाचे राजधानी शहर आहे आणि ते 14 बेटांवर वसलेले आहे. स्वीडिश क्रोन हे अधिकृत चलन आहे. स्वीडिश, फिनिश, यिदीश, रोमानी या अधिकृत भाषा आहेत.

    वैश्विक कर्ज $ 184 लक्ष कोटी एवढे सर्वाधिक आहे: IMF

    आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याच्या ताज्या अहवालानुसार, वैश्विक कर्ज $ 184 लक्ष कोटी (ट्रिलियन) इतक्या सर्वकाळ उच्च पातळीवर पोहोचले आहे.

    अहवालात दिसून आलेल्या ठळक बाबी -

    • जगातले शीर्ष तीन कर्जदार देश म्हणजे अमेरिका, चीन आणि जपान हे आहेत. एकूण वैश्विक कर्जाच्या अर्ध्याहून अधिक कर्ज या तीन देशांवर आहे.
    • एकूण वैश्विक कर्जाचे प्रमाण 2017 साली असलेल्या जगाच्या एकूण सकल स्थानिक उत्पन्न (GDP) याच्या 225 टक्क्यांहून अधिक आहे.
    • जगातील सरासरी कर्जाची रक्कम दरडोई $ 86,000 पेक्षा अधिक आहे, जे सरासरी दरडोई उत्पन्नाच्या दुप्पटीहून अधिक आहे.

    आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) बाबत -

    दि. 27 डिसेंबर 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund –IMF) या वित्तीय संस्थेची स्थापना करण्यात आली आणि ही 1945 साली 29 सदस्य देशांसह औपचारिकरित्या अस्तित्वात आली. सध्या IMF चे 188 सदस्य देश आहेत. याचे वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे मुख्यालय आहे.

    देय करावयाची शिल्लक रक्कम भरण्यास येणार्‍या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटात व्यवस्थापनाविषयीच्या बाबींमध्ये ही बँक आपली भूमिका बजावते. तसेच जागतिक आर्थिक सहयोग वाढविणे, आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे, उच्च रोजगार आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीला चालना देणे आणि दारिद्र्य कमी करणे यादृष्टीने ही बँक कार्य करते.


    भारत आणि सौदी अरब यांच्यात द्वैपक्षीय वार्षिक हज 2019 करार झाला

    भारत सरकारचे केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय आणि आणि सौदी अरब यांच्यात द्वैपक्षीय वार्षिक हज 2019 करार झाला आहे. भारतीय हज यात्रेकरूंची सुरक्षा आणि त्यांना चांगल्या सुविधा मिळण्याची खात्री बाळगण्याच्या हेतूने हा करार केला जातो.

    शिवाय गेल्या वर्षापासून कोणत्याही पुरुष मेहरमशिवाय (जवळचे नातेवाईक उदा. वडील, भाऊ किंवा मुलगा) 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला श्रद्धाळू (एकट्याने किंवा चार वा त्यापेक्षा जास्त महिलांच्या गटाने) हज यात्रा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

    या सवलतीमुळे 2100 हून अधिक महिलांनी 2019 सालाच्या हज यात्रेसाठी अर्ज सादर केला आहे. यावर्षाच्या हज यात्रेला सुमारे 1300 भारतीय महिला गेल्या होत्या. यात्रेकरूंना मदत करण्यासाठी भारत सरकारकडून हज समन्वयक आणि हज सहाय्यक तैनात केले जातात.

    हज समितीच्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यापर्यंत 2 लक्ष 47 हजार याहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यात 47% महिला आहेत.

    सौदी अरब हा एक आखाती देश आहे, ज्याने अरब खंडाचा 80% भाग व्यापलेला आहे. हा जगातला सर्वात मोठा तेल निर्यातदार आहे. रियाध ही देशाची राजधानी आहे आणि सौदी रियाल हे चलन आहे.



    ब्रिजेंद्रपाल सिंग: FTII सोसायटीचे नवे अध्यक्ष

    केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने 'FTII' सोसायटीचे नवीन अध्यक्ष आणि प्रशासन परिषदेचे अध्यक्ष म्हणून ब्रिजेंद्रपाल सिंग यांची निवड केली आहे. त्यांची निवड तीन वर्षांसाठी आहे.

    ब्रिजेंद्रपाल सिंग हे या नियुक्तीपूर्वी भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था (FTII) याच्या प्रशासन परिषदेचे उपाध्यक्ष होते.

    ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून FTIIचे अध्यक्षपद रिक्त होते. बी. पी. सिंह हे लोकप्रिय मालिका 'CID'चे निर्माते-दिग्दर्शक आहेत.

    FTII संस्थेविषयी -

    भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था (FTII) ही चित्रपट निर्मिती क्षेत्रातली एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. संस्थेची स्थापना 1960 साली झाली.


    आसाममध्ये पूराचा धोका कमी करण्यासाठी ADBसह $ 60 दशलक्षचा कर्ज करार

    भारत सरकार आणि आशियाई विकास बँक (ADB) यांच्यात आसाममध्ये पूराचा धोका कमी करण्यासाठी $ 60 दशलक्ष इतक्या रकमेचा कर्ज करार झाला आहे.

    ब्रह्मपुत्रा नदीलगतच्या पूर-प्रवण क्षेत्रात संरक्षणात्मक कार्ये, प्रकल्प आणि लोकांच्या सहभागाने पूर-परिस्थिती जोखीम व्यवस्थापन प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

    ऑक्टोबर 2010 मध्ये ADB कडून ‘आसाम इंटिग्रेटेड फ्लड अँड रिव्हरबँक इरॉजन रिस्क मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम’ मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी $ 120 दशलक्ष इतकी रक्कम मंजूर केली गेली. या मंजुरीत कर्जाची ही दुसरी खेप आहे.

    या निधीमधून ब्रह्मपुत्रा नदीलगतच्या पालसबरी-गुमी, काझीरंगा आणि दिब्रूगढ या तीन प्रकल्प क्षेत्रात संरचनात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. वारंवार येणार्‍या पूर परिस्थितीमुळे होत असलेली जमिनीची धूप रोखण्यासाठी आणि व्यवस्थापन प्रणालीची विश्वासार्हता आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी तसेच संस्थात्मक क्षमता बळकट करण्यासाठी विविध कार्ये केली जात आहेत.

    आशियाई विकास बँक (ADBविषयी -

    आशियाई विकास बँक (ADB) ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली. मंडालुयोंग (फिलीपिन्स) येथे याचे मुख्यालय आहे. “फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. याचे 67 देश सदस्य आहेत.


    No comments:

    Post a Comment