Marathi | मराठी
राष्ट्रीय पशुधन मोहीमेच्या अंतर्गत अनुदानासाठी नवे ‘ENSURE’ पोर्टल कार्यरत
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते ‘ENSURE-राष्ट्रीय पशुधन मोहीम-EDEG’ हे संकेतस्थळ आधारित व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले आहे.‘ENSURE-राष्ट्रीय पशुधन मोहीम-EDEG’ पोर्टल राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने (NABARD) विकसित केले आहे आणि पशुधन, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय विभागाकडून परिचालीत केले जाणार.
राष्ट्रीय पशुधन मोहीम विषयी -
राष्ट्रीय पशुधन मोहीम पशुधन क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे. उद्योजकता विकास व रोजगार निर्मिती (Entrepreneurship Development and Employment Generation -EDEG) हा या मोहिमेचा एक घटक आहे.
EDEG मार्फत कुक्कुट, शेळी, डुकर पालनासाठी भारत सरकारकडून दिल्या जाणार्या अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. यात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच हे सुलभ करण्यासाठी NABARD ने ‘ENSURE’ (https://ensure.nabard.org) हे पोर्टल विकसित केले आहे.
या नवीन प्रक्रियेत कर्ज मंजूर झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांत अनुदान मंजूर केले जातील.
तामिळनाडूमधील पर्यटन विकास प्रकल्पासाठी ADB सोबत $ 31 दशलक्षचा कर्ज करार झाला
तामिळनाडूमध्ये राबविण्यात येणार्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इनव्हेस्टमेंट प्रोग्राम फॉर टुरिझम (IDIPT) या प्रकल्पासाठी भारत सरकार, तामिळनाडू राज्य सरकार आणि आशियाई विकास बँक (ADB) यांच्यात $ 31 दशलक्ष इतक्या रकमेसाठी कर्ज करार झाला आहे. कर्जाची रक्कम चार टप्प्यात दिली जाणार आहे.इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इनव्हेस्टमेंट प्रोग्राम फॉर टुरिझम (IDIPT) याच्या माध्यमातून तामिळनाडूमध्ये राज्य पर्यटन उद्योगाचा विकास केला जाणार आहे. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध विकासात्मक प्रकल्प राबवविले जात आहेत.
IDIPT योजना -
सप्टेंबर 2010 मध्ये स्वीकृत केल्या गेलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इनव्हेस्टमेंट प्रोग्राम फॉर टुरिझम (IDIPT) या विकास योजनेसाठी एकूण US$ 250 दशलक्ष इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याकरिता हा कार्यक्रम तामिळनाडू, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये राबवविला जात आहे.
या कार्यक्रमातून नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन केले जात आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने अश्या स्थळांपर्यंत संपर्क व्यवस्था, क्षमता बांधणी आणि पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी कार्य केले जात आहे.
आशियाई विकास बँक (ADB) विषयी -
ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली. मंडालुयोंग (फिलीपिन्स) येथे याचे मुख्यालय आहे. “फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. याचे 67 देश सदस्य आहेत.
नवी दिल्लीत चौथी ‘पार्टनर्स फोरम’ परिषद आयोजित
दि. 12 डिसेंबर 2018 रोजी नवी दिल्लीत ‘पार्टनर्स फोरम’ याच्या चौथ्या बैठकीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.‘पार्टनर्स फोरम’चे कार्यक्रम ‘ग्लोबल स्ट्रॅटजी ऑफ सरव्हाईव्ह-थ्राइव्ह-ट्रान्सफॉर्म’ या उद्देशाखाली तयार केले जातील. या कार्यक्रमात राजकीय नेतृत्व, बहुपक्षीय कृती, उत्तरदायित्व आणि भागीदारीची ताकद या चार उच्च-पातळीवरील घटकांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
मातृ, नवजात आणि बाल आरोग्य भागीदारी (Partnership for Maternal, Newborn and Child Health -PMNCH) यांच्या सहकार्याने भारत सरकारतर्फे दोन दिवस चालणार्या या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले गेले.
परिषदेत 85 देशांमधून सुमारे 1500 प्रतिनिधींचा सहभाग आहे. परिषदेत महिला, बालक व किशोरवयीन मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कल्याणासाठी चर्चा केली जात आहे.
‘पार्टनर्स फोरम’ विषयी -
‘पार्टनर्स फोरम’ ही किशोरवयीन, बाल, नवजात आणि मातृ आरोग्य सुधारण्यासाठी आणि बाल व माता मृत्युदर कमी करण्यासंदर्भात केल्या जाणार्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी सप्टेंबर 2005 मध्ये चालू करण्यात आलेली जागतिक आरोग्यासंदर्भातली भागीदारी आहे.
92 देशांमधील शैक्षणिक, संशोधन आणि शिक्षण संस्था; दाते आणि प्रबोधिनी, वैद्यकीय व्यवसायिक, बहुपक्षीय संस्था, अशासकीय संस्था, भागीदार देश, जागतिक वित्त यंत्रणा आणि खासगी क्षेत्र असे 1000 पेक्षा अधिक या भागीदारीमध्ये आहेत.
म्यानमारमध्ये ‘भारत-म्यानमार राइस बायो पार्क’ उभारले
द्वैपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या प्रयत्नांमधून दोन्ही देशांनी म्यानमारमध्ये ‘भारत-म्यानमार राइस बायो पार्क’ उभारले आहे.भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्यानमारच्या दौर्यावर आहेत. शांती प्रक्रिया, राष्ट्रीय समेट आणि आर्थिक पुनरुत्थानाच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारताचा पाठिंबा वाढविला आहे. दि. 12 डिसेंबर 2018 रोजी नाय पाई ताव येथे झालेल्या एका समारंभात यासंबंधी घोषणा केली आहे.
याशिवाय ‘एडवांस्ड सेंटर फॉर अॅग्रिकल्चरल रिसर्च अँड एज्युकेशन’ हा देखील भारत सरकारच्या आर्थिक सहाय्यामधून उभारण्यात आला आहे.
म्यानमार हा आग्नेय आशियातला एक देश आहे. नॅयपिडॉ हे देशाचे राजधानी शहर असून बर्मीज क्याट राष्ट्रीय चलन आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम आणि मणीपूर या भारतीय राज्यांची सीमा म्यानमारशी सामायिक केली जात आहे.
मेरी कोमचा ‘मिथोइलीमा’ सन्मान देऊन गौरव
दि. 11 डिसेंबर 2018 रोजी इम्फाळमध्ये एका सोहळ्यात मणीपूर राज्य सरकारने विश्वविजेती महिला मुष्टियोद्धा एम.सी. मेरी कोम हिचा ‘मिथोइलीमा’ हा नागरी सन्मान देऊन गौरव करण्यात आला आहे.मणीपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. सन्मानासोबतच दहा लक्ष रुपयांची रक्कम बक्षीस स्वरुपात दिली गेली.
‘मिथोइलीमा’ हा मणीपूर राज्य सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
35 वर्षीय मांगते चुंगनेजंग मेरी कोम या एक भारतीय महिला मुष्टियोद्धा आहेत. मेरी कोमने महिला जागतिक अव्यवसायिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद सहा वेळा जिंकले असून असे यश संपादन करणारी ती पहिली महिला मुष्टियोद्धा ठरली आहे. त्यांनी ‘अनब्रेकेबल’ या शीर्षकाखाली आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांना पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाले आहेत.
'टाइम्स पर्सन ऑफ द ईयर' सन्मान पत्रकार जमाल खोशोगी (मृत) यांना मिळाला
टाईम मॅगझीन या नियतकालिक पत्रिकेकडून हत्या झालेल्या पत्रकार जमाल खोशोगी (मृत) यांना इतर पत्रकारांसह "पर्सन ऑफ द ईयर" हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले आहे.पत्रिकेने फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रेसा, रूटर्स वृत्तसंस्थेचे पत्रकार वा लोन आणि क्याव सोए ओओ यांना देखील त्यांच्या निर्भीड कार्यासाठी सन्मानित केले आहे.
ऑक्टोबर महिन्यात सौदी अरबने पत्रकार जमाल खोशोगी यांना ठार मारल्याची कबूली दिली होती. जमाल खोशोगी यांना तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरात सौदी अरबच्या वाणिज्य दूतावासात ठार मारण्यात आले होते.
खोशोगी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तसंस्थेचे स्तंभलेखक होते आणि ते सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सत्तेबाबत प्रश्न उठवत होते.
‘राज्य विधानसभा निवडणूका 2018’ निकाल
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल दि. 11 डिसेंबर 2018 रोजी जाहीर केली गेलीत.तेलंगणा (एकूण 119 जागा)
तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) | 88 |
काँग्रेस | 21 |
भाजप | 1 |
अन्य | 9 |
भाजप | 1 |
काँग्रेस | 5 |
मिझो नॅशनल फ्रंट (MNF) | 26 |
अन्य | 8 |
काँग्रेस | 114 |
भाजप | 109 |
अन्य | 7 |
काँग्रेस | 68 |
भाजप | 15 |
अन्य | 7 |
काँग्रेस | 99 |
भाजप | 73 |
अन्य | 27 |
शक्तिकांत दास: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे नवे गव्हर्नर
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी वित्त सचिव असलेल्या शक्तिकांत दास यांची तीन वर्षांसाठी RBIच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.शक्तिकांत दास माजी वित्त सचिव आहेत. सध्या ते वित्त आयोगाचे सदस्य आहेत. ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
वित्त विषयात मास्टर्स डिग्रीप्राप्त दास यांनी केंद्र सरकारच्या विविध अधिकाऱ्यांचे सचिवपद भुषवले आहे. त्यांनी वित्त मंत्रालयाचे सहसचिव, तामीळनाडू विशेष महसूल आयुक्त, शिवाय उद्योग खात्याचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. गेल्या वर्षीच ते केंद्रीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. सरकारच्या नोटाबंदी निर्णयात शक्तिकांत दास यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
RBI विषयी -
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.
RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

No comments:
Post a Comment