Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, December 5, 2018

    Current Affairs / Evening News 05 December 2018 - Marathi

    Views

    क्रिकेटपटू गौतम गंभीर निवृत्ती घेणार

    गौतम गंभीर ह्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. गंभीर रणजी करंडकमध्ये क्रिकेटविश्वातील आपला शेवटचा सामना दि. 6 डिसेंबर रोजी आंध्रप्रदेश संघाविरुद्ध खेळणार आहे.

    भारत आणि संयुक्त अरब अमीरात यांच्यात करन्सी स्वॅप करार झाला

    गुंतवणूक वाढविण्यासाठी तसेच डॉलर किंवा अन्य आंतरराष्ट्रीय चलनांचा वापर केल्याशिवाय थेट व्यापार व्हावा यासाठी, भारत आणि संयुक्त अरब अमीरात यांनी 200 कोटी दिरहॅम किंवा 3,500 कोटी रुपये ($496 दशलक्ष) इतक्या रकमेचा करन्सी स्वॅप करार केला.

    कृषी आणि बांधकाम क्षेत्रासाठीच्या वाहनांसाठी दुहेरी-इंधन वापरासंबंधी केंद्राची अधिसूचना

    कृषी आणि बांधकाम क्षेत्रात आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर्स आणि कापणी व मळणी यंत्र अश्या उपकरण-युक्त वाहनांमध्ये डीझल सोबतच CNG, बायो CNG, LNG यासारखी पर्यायी इंधने वापरली जाऊ शकणार.

    'ब्लू वॉटर्स अहोय!': भारतीय नौदलाचा इतिहास सांगणारे पुस्तक

    भारतीय नौदलाचे प्रमुख एडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते 'ब्लू वॉटर्स अहोय!' हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे. वाइस अॅडमिरल (निवृत्त) अनुप सिंग हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

    नागालँडमध्ये पहिल्या-वहिल्या स्वदेश दर्शन प्रकल्पाचे उद्घाटन झाले

    दि. 5 डिसेंबर 2018 रोजी ‘आदिवासी परिक्रमा’ (Tribal Circuit) विकास प्रकल्पामधून विकसित करण्यात आलेल्या ‘पेरेन-कोहिमा-वोखा’ प्रकल्पाचे उद्घाटन झाले. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प नागालँड राज्यातला पहिला-वहिला प्रकल्प आहे.

    नवी दिल्लीत ‘इंडिया वॉटर इंपॅक्ट समिट-2018’ या कार्यक्रमाचा शुभारंभ

    दि. 5 डिसेंबर 2018 पासून नवी दिल्लीत सुरू झालेल्या ‘इंडिया वॉटर इंपॅक्ट समिट-2018’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा एक वार्षिक कार्यक्रम आहे, जेथे देशभरातील सर्वात मोठ्या जल-संबंधित समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी आणि त्यावर आदर्श उपाययोजना विकसित करण्यासाठी भागधारकांना एकत्र आणले जाते.

    जागतिक मृदा दिन: 5 डिसेंबर

    संयुक्त राष्ट्रसंघाची रोम (इटली) स्थित अन्न व कृषी संघटना (FAO) याच्या नेतृत्वात दि. 5 डिसेंबर 2018 रोजी जगभरात जागतिक मृदा दिन (World Soil Day) पाळला जात आहे. या वर्षी "बी द सोल्यूशन टू सॉइल पोल्यूशन" या विषयाखाली हा दिवस पाळला गेला.

    RBIचे मौद्रिक धोरण डिसेंबर 2018: रेपो रेट कायम राखले

    RBIच्या मौद्रिक धोरण समिती (Monetary Policy Committee -MPC) याची पाचवी बैठक दि. 5 डिसेंबर 2018 रोजी पार पडली. या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

    No comments:

    Post a Comment