बाबूराव पेंटर - (३ जून १८९० - १६ जानेवारी १९५४)बाबुराव पेंटर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.
जागतिक दिवस
-
ठळक घटना/घडामोडी
३५० : नेपोटियानसने रोममध्ये घुसून स्वतःला सम्राट घोषित केले.
१०९८ : पहिली क्रुसेड - आठ महिने चाललेल्या वेढ्यानंतर क्रुसेडरांनी अँटियोक शहर जिंकले.
१५३९ : एर्नान्दो दि सोतोने फ्लोरिडा स्पेनचा भाग असल्याचे जाहीर केले.
१६६५ : जेम्स स्टुअर्टने नेदरलँड्सच्या आरमाराला हरवले.
१८३१ : ‘भारतीय महिला विद्यापीठ’ या संस्थेची स्थापना. १९२० मध्ये ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ’ (एस.एन.डी.टी.) असे नामांतर.
१८६४ : अमेरिकन यादवी युद्ध - कोल्ड हार्बरची लढाई.
१८८९ : कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेने कॅनडाचे दोन्ही तीर जोडले.
१९३७ : ड्युक ऑफ विन्डसर व वॉली सिम्पसनचे लग्न.
१९४० : डंकर्कची लढाई - जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.
१९४३ : झूट सुट दंगे - लॉस एंजेल्स नेव्हल रिझर्व आर्मरीतील ६० लोकांच्या टोळक्याने हिस्पॅनिक दिसणार्या लोकांना बडवून काढले.
१९६२ : एर फ्रांसचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिसहून निघताना कोसळले. १३० ठार.
१९६३ : नॉर्थवेस्ट एरलाइन्सचे डी.सी. ७ प्रकारचे विमान ब्रिटिश कोलंबियाच्या किनाऱ्याजवळ कोसळले. १०१ ठार.
१९६८ : अँडी वॉरहोल वर खूनी हल्ला.
१९६९ : व्हियेतनामजवळ ऑस्ट्रेलियाची विमानवाहू नौका एच.एम.ए.एस. मेलबॉर्न व अमेरिकेची विनाशिका यु.एस.एस. फ्रँक ई. एव्हान्सची टक्कर. एव्हान्सचे दोन तुकडे झाले.
१९७३ : सोवियेत संघाचेचे टी.यु. १४४ प्रकारचे विमान फ्रांसमध्ये गुसेनव्हिल जवळ कोसळले. १४ ठार.
१९७९ : मेक्सिकोच्या अखातात इहटॉक १ या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.
१९८४ : ऑपरेशन ब्ल्यु स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्यासुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
१९८९ : थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लश्कर पाठवले.
१९९१ : जपानमधील माउंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. ४३ पत्रकार व संशोधकांचा मृत्यू.
१९९८ : जर्मनीमध्ये आय.सी.ई रेल्वेगाडी रुळांवरुन घसरली. १०१ ठार.
२००६ : सर्बिया आणि माँटेनिग्रोचे विघटन. माँटेनिग्रोला स्वातंत्र्य.
जन्म/वाढदिवस
१८९० : बाबुराव पेंटर, महान चित्रकार व शिल्पकार.
१८९० : खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
१९७७ : आर्चिबाल्ड विवियन हिल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ.
२००० : डॉ. आर.एस. अय्यंगार, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.
२०१० : अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.
Baburao Painter - (3 June 18 9 - 16 January 1954) Baburao Painter was born in Kolhapur. His original name was Baburao Mastri. He got lessons from painting and sculpture from his father. Initially they used to remove the oil paintings. Due to the painting of the Gandharva Drama Company, a different identity was created in Baburao Painter's art area.
No comments:
Post a Comment